Tuesday, April 5, 2011

Prem

प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी
ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ....................

जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे
मनाला जाणवलं तेव्हा हे हसणार मन
दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत
कदाचित दोघानाही सांगायचे होते काही
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

जे जमले नाही मला या जन्मी
कदाचित मिळविण मी तुला पुढच्या
जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या
जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला
खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ...

Kavita

ती म्हणते...बदल...

विचार बदल...आचार बदल...स्वत:लाच पूर्णपणे बदल...
अरे सगळंच बदलायचं तर माझ्यातला मी राहणार काय?
आणि इतकंच जर बदलायची गरज असेल
...तर प्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच होतेस काय?

नक्की माझ्यावर प्रेम करतेस की त्यात काही व्यवहार शोधतेयस?
एखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.
नसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.
आता हे तुझं तूच ठरव.तुला नक्की मी हवा आहे

की माझ्यातील बदल