Thursday, September 13, 2012




एक सुंदर प्रेमकथा

आजच्या कहाणीचा हिरो आहे सागर आणि हिरोईन आहे नमिता.
दोघांचाही जन्म एकाच दिवशी एकाच हॉस्पीटलमध्ये झाला,त्या हॉस्पीटलमध्ये अडचणीच्या कारणास्तव एकाच बेडवर ठेवण्यात आलं,तेव्हाच त्याने तिच्या हाताला पहील्यांदा स्पर्श केला.तेव्हा ते दोघेही एका वेगळ्या उर्जेने थरथरले.कदाचित त्याने तिच्यावरचं प्रेम त्याने व्यक्त केलं असावं।सागरचे आईवडील हे मुळचे पुण्याचे आणि नमिताचे कोल्हापुरचे।आज त्या 
दोघांचाही तिसरा वाढदिवस आहे.आणि यामुळेच तर सागरचे वडील सागरच्या ऊदंड आयुष्यासाठी कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या दर्शणाला घेऊन आलेत.नमितालासुद्धा तिचे आईवडील याच कारणास्तव महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन आलेत.दर्शन घेऊन निघताना त्या छोट्या नमिताच्या हाताला सागरच्या त्या बोटांचा स्पर्श होतो जो पहील्यांदा दवाखान्यात झाला होता.तीने त्याच्याकडे बघुन एक गोड स्माईल केली,तेव्हा कदाचित त्याला वाटलं असावं की कदाचित हीने मला ओळखलंय.ही त्यांची दुसरी भेट.वरचासुद्धा काय काय घडवुन आणतोय हे कोणाला कधी कळलंय का?पुढे वाचा तिसरी भेट तर याहीपेक्षा intresting आहे.त्या दोघांचं एकाच कॉलेजमध्ये अॅडमिशन झालंय.आज कॉलेजचा पहीला दिवस दोघांनाही यायला खुप उशीर झालाय(उशीर तर व्हायचाच ना नाहीतर नशीब पुढचा खेळ कसा खेळणार).दोघेही क्लासकडे धावताहेत,आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते.त्या धक्क्यामुळे तिच्या हातातुन पडलेलं पुस्तक तो तिच्या उडणार्या केसाकडे बघत तिच्या हातात देत असतो.त्याच्या हाताचा तिला स्पर्श होताच,दोघांनाही एका वेगळ्या उर्जेची जाणीव होते जी आम्ही आधी कधीतरी अनुभवलीय.नमिता न राहुन सागरला विचारतेय,आपण आधी कधी भेटलोय का?माहीत नाही पण मलाही तसंच वाटतं.आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते.मग हळुहळु हीच मैत्री प्रेमात बदलते.एकमेकांना चोरुन भेटणं,भेटवस्तु देणं,तिला फुले आणुन देणं हे तर कायमचंच झालं.त्यांच प्रेम जोरावर असताना मग अचानक नशीबाने आपली चाके उलट्या दिशेने फिरवली.तिची काळजीखातर विचारली गेलेली प्रश्ने याला dominating वाटु लागली.परीक्षेमुळे त्याचं अभ्यासात बुडणं नमिताला तो मला टाळतोय असं वाटु लागलं.एकमेकांच्या वाटेवर डोळे लावुन बसणारे ते आज एकमेकांच्या वाटेवरुन जाणे टाळु लागले.आज त्या दोघांनी अधिकृतपणे breakup केला.जो मनातुन आधीच झाला होता.नशीब आज त्यांच्यावर हसत होतं,होतं काय आणि झालं काय?शिक्षण संपल्यानंतर दोघांचही वेगवेगळ्या वक्तींशी लग्न झालं आणि तेही एकाच दिवशी.आज ते त्यांच्या वेगवेगळ्या संसारात सुखी आहेत असं म्हणता तर येणार नाही पण त्यांना जे हवं ते त्यांनी साध्य केलंय.आज 1993 त्यांनी आपल्या वयाची साठी ओलांडलीय.नशीबाने त्यांना पुन्हा एकदा जवळ आणलंय असं म्हणायला हरकत नाही.कारण ते दोघेही आज मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करतायेत.पण वेगवेगळ्या डब्यात बसलेत.दोघांनाही एकमेकांच्या अस्तीत्वाची जाणीव नव्हती.तेवढ्यात ट्रेनमध्ये धडाम करुन स्फोट झाला.होत्याचं नव्हतं झालं.अतिरेक्यांनी घडवुन आणलेल्या त्या बॉम्बस्फोटामध्ये मृत लोकांची जी लिस्ट जाहीर करण्यात आली त्यामध्ये सागर आणि नमिता यांची नावंही होती.त्यांचे शव बचावकार्यातील कर्मचारी दोघेजण दोन विरुद्ध दिशेला नेत असताना.त्यांचा हातांचा स्पर्श जेव्हा एकमेकांना होतो तेव्हा,त्याच स्पर्शातील उर्जेने त्यांची शरीरं पुन्हा एकदा थरथरतात.तेव्हा ते शव नेणार्यांना वाटते की हे जीवंत असावेत.पण पुर्ण तपासणीअंती कळतं की खरंच त्यांचा मृत्यु झालाय...... जन्माची सुरुवात त्या एका गोड स्पर्शाने होते,शेवटही अशाच स्पर्शाने होते,मात्र यावेळी त्यातली जाणीव वेगळी असते.खरंच नशीब एखाद्याच्या आयुष्यात काय काय करतं.मित्रांनो नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या creativity वर विश्वास जास्त ठेवावा.कारण तुम्हालाच या गोष्टीची कधी जाणीव नसते की तुम्ही काय काय करु शकला असता किँवा करु शकता.आणि मग नंतर नशीबाला दोष देत बसता.
मित्रांनो या कथेतल्या नायिकेचं नाव आहे नंदिता.पण नायक कोण आहे हे पुढे तुम्हाला कळेलच. नंदिता ही सेंट फ्रान्सिस या कॉलेजमध्ये शिक्षण घेते.आणि त्याच क्लासमधे तिचा एक मित्र आहे भास्कर.दाढी वाढलेली,केस वाढुन मागे बांधलेले सलवार घालणारा,खुपच शांत,एकलकोंडा असा तो नंदितावर खुप प्रेम करायचा.एक दिवस त्याने हिँमत करुन नंदीताला प्रपोझ केलं.नंदीता त्याला म्हणाली,मला माफ कर भास्कर पण मी तुझ्यावर कधीही प्रेम क
रु शकणार नाही.कारण तु खुप एकलकोँडा,खुपच साधा आहेस.तु तर एखाद्या मशिनप्रमाणे काम करतोस,तुझं वेगळं व्यक्तिमत्व म्हणुन असं काही नाहीच.यांवर भास्कर खुपच निराश होऊन कॉलेज सोडुन निघुन गेला.काही दिवस तसेच जातात,नंदिताला भास्करचा विसर पडतो.आणि आता इथे कथेच्या नायकाची entry होते रोमियो त्याचं नाव.एक स्टाईलिश पर्सन.सुट,जीन्स स्टाईलिश गोगल,बुट.एकदम attractive हेअरस्टाईल.असा तो रोमिओ.नंदिताला पाहताच त्याला ती आवडते,सर्व मुलीँच्या मधुन तो तिच्या जवळ जातो आणि म्हणातो,"आपकी खुबसुरती को मेरी आँखो से पिलु,एक पल आपके प्यार का दे दो,उस पल में सो जनम भी जिलु".....काय?(नंदिता म्हणाली) तोःकाही नाही,हे फुल घे आणि माझ्या मैत्रीचा स्वीकार कर...तिला थोडा वेळ काही समजलच नाही.पण त्याची ही शायरी तिला खुप आवडली.तिनं ते फुल घेतलं आणि त्याच्यी मैत्री स्वीकारली.नंतर त्यांची हीच मैत्री वाढु लागली.रोमियट नंदिताला आवडु लागला,त्याची स्टाईल त्याचं बोलणं एकदम खुप वेगळं होतं.मग एक दिवस रोमियोने त्याच्या स्टाईलमध्ये नंदिताला प्रपोझ केलं.तिनं वेळ न लावता त्याला होकार दिला.मग त्यांचं हे प्रेम नंतर कॉलेजभर पसरलं.एक दिवस ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली,घरच्यांना तर रोमियोबद्दल तिने आधीच सांगीतलं होतं.पण ते सगळे बाहेर गेले होते.घरात फक्त दोनच दिवसापुर्वि अमेरिकेहुन आलेले तिचे मामा होते जे एक मानसोपचार तज्ञ होते.त्यांनि रोमियोशी काही प्रश्न विचारले.त्याने त्या प्रश्नाची सराईतपणे उत्तरे दिली.त्यांना ते आवडलं पण त्याच्या बोलण्यातील दुट्प्पीपणा त्यांना जाणवला.त्यांनी नंदिताला चहा करण्यास सांगितलं.ती किचनमध्ये गेल्यावर ते रोमियोला म्हणाले मला तुझ्याविषयी काही सत्य जाणुन घ्यायचंय,म्हणुन मला तुला संमोहीत करायचंय,त्याने त्यांना काहीही न विचारता होकार दिला.त्यांनी त्याला संमोहित केलं,काही प्रश्न विचारले आणि पुन्हा रोमियोला भानावर आणलं.तोपर्यँत नंदिता चहा घेउन आली,तिच्या मामांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला.ते दोघं खुश झाले नंतर तिने रोमियोला बाहेरपर्यँत ड्रोप केलं.ती घरात आल्यावर मामांनी नंदितालला प्रश्न विचारला,तुला काही दिवसांपुर्वी कोणी भास्कर नावाच्या मुलग्याने लग्नाची मागणी घातली होती? नंदिताला हे ऐकुन आश्चर्याचा धक्काच बसला कारण ही गोष्ट भास्कर आणि फक्त तिलाच माहीती होती,मग तिने मामांना त्याबद्दल सगळं सांगुन टाकलं.मामां हे ऐकुन त्यावर म्हणाले,तो मुलगा आता कोण आणि कुठे आहे माहीतीये तुला? नाही मला नाही माहीती.तुझा हा रोमियो म्हणजे तोच भास्कर आहे.तीःहे कसं शक्य आहे मामा तुम्ही काहीही काय बोलताय?मामाःसांगतो सगळं सांगतो,हा भास्कर बालपणापासुन एकटाच राहतो.त्याचे आईवडील त्याच्या बालपणीच गेले.त्यामळे त्याचा बाहेरच्या जगाशी फारच कमी संबंध आला.त्यामुळे तो स्वतःच्या जगात मग्न झाला.तो स्वतःशीच बडबडु लागला.स्वतःशीच खेळु लागला.माणसामध्ये चेतन आणि अचेतन असे मनाचे दोन भाग असतात.ते जसं कम्प्युटरचा ram आणि harddisc काम करतात ना तसेच काम करतात.भास्कर एकटा पडु नये म्हणुन त्याला गरज असलेला मित्राची गरज त्याच्या अचेतन मनाने त्याच्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करुन भागवली.यालाच सायंटिफिक भाषेत split personality(दुभंगित व्यक्तिमत्व)म्हणतात.जो एक मानसिक आजार आहे.तो मोठा झाला तुझ्या प्रेमात पडला तु त्याला नाही म्हटलंस.यामुळेच भास्कर आत्महत्या करणार होता.स्वतःला या परिस्थीतीतुन बाहेर काढण्यासाठी त्याच्या अचेतन मनाने एक स्टाईलिश व्यक्तिमत्व accept केलं.भास्करचा romio झाला.पण तुला हे ऐकल्यावर तर जास्त आश्चर्य वाटेल की भास्कर आणि रोमियो या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असंच भास्करला वाटतं.भास्करच्या अचेतन मनाने स्वतःमध्ये अशी सेटींग लावलीय की तो जेव्हा तुला बघतो तेव्हा तो आपोआपच भास्करचा रोमियो होतो.हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा एखाद्या गोष्टीप्रती तुम्ही तुमच्या मनाला पुर्णपणे वाहुन नेता.आणि तुझ्या प्रेमामध्ये भास्करने स्वतःला खुप वाहुन नेलंय.
नंदिताचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता,म्हणुन तिने मामाला विचारलं,हे तुम्हाला कसं माहीत?मी एक प्सायकॅट्रीस्ट आहे.मघाशी त्याला प्रश्न विचारताना,त्याच्या स्वभावातील दुट्प्पीपणा मला जाणवला.म्हणुन मी तुला चहाच्या बहाण्याने आत पाठवलं,त्याच्या परवानगीने त्याला संमोहीत केलं,आणि त्यानेच ही सर्व हकीकत सांगितली...मामा काहीही करा मी त्याच्यावर खुप प्रेम करते हो.तो कोणीही असो पण माझं त्याच्यावर खुप प्रेम आहे,त्याला यातुन बरं करा.मामा म्हणाले,घाबरु नकोस बेटा,तो फक्त एक मानसिक आजार आहे जो नक्की बरा होईल।मामांच्या सांगण्यावर तिने रोमियोला सांगितलं,कि तु रोमियो नसुन भास्कर आहेस.ही गोष्ट त्याच्या मनाला पटली नाही,त्याला वाटत होतं हे तर अशक्य आहे भास्कर कुठे आणि मी कुठे?पण फक्त नंदिताच्या प्रेमाखातर तिच्या सांगण्याने त्याने तिच्या मामाकडे संमोहन उपचार चालु केले.आणि एका महीन्यातच तो बरा झाला.नंदिता खुपच आनंदी दिसायची.रोमियोचा कधी भास्कर झाला हे त्याला कळलंच नाही.पण नंदिताला नक्की कळलं की,स्टाईल,गुडलुक हे फक्त एक आकर्षण असतं.जे कधी ना कधी संपतच.पण माणसाचा स्वभाव त्याचं मन हे कधीच बदलत नाही....त्यामुळे एखादा मुलगा रोमियो असो वा भास्कर त्याची स्टाईल नाही त्याचं मन त्याचा स्वभाव बघा.स्वभाव चांगला असेल तर आयुष्यभर तुम्ही त्याच्यासोबत सुखी राहाल,मग भलेही तो दिसायला साधा का असेना


बाप्पांच्या आशीर्वादा ने दिवसाची सुरवात करूया
सुंदर दिवसाची
सुंदर सुरवात,
नाजुक उन्हाची
प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची
हळुवार हालचाल,
रोज तुमच्या
आयुष्यात येवो
सुंदर सकाळ...
!! श्री गणेशाय नमः !!
* शुभ प्रभात *
 — 
बाकि........ मी मस्त आहे ...

हो, तू नाहीस म्हणुन
मन जरा अस्वस्थ आहे
होऊ दे त्याला काहीतरी

मी माझ्या कामात व्यस्त आहे
बाकि........ मी मस्त आहे ........
हो, श्वासही कोंडतो कधी कधी
त्याच्यावारही एकतेपनाचा ताण आहे
होइल कधीतरी सरळ,
त्यालाही वस्तुस्थितिचे भान आहे
बाकि, मी एकदम छान आहे .........
तू आठवण करून द्यायचिस
की मला झोप येत आहे
आता नाही येत, नकोच ती!
भलत्या स्वप्नांवर ही मात आहे
बाकि, मी मजेत आहे ................
गालांवर, डोळ्यांच्या खालि,
ओलावा आहे, फार बोचरा आहे
पण असू दे, कारण त्याच्या प्रत्येक थेम्बात
तुझाच हसरा चेहरा आहे
म्हणुन मी तसा बरा आहे .............
.
मी कसा का असेना,
बोलुन चालून एक विझलेली राख आहे
तू कशी आहेस ग??
बस्स, तेवढीच एक रुखरुख आहे