Wednesday, July 4, 2012


तुझ्या नीखळ सौंदर्याकडे बघून
सुंदरताही लाजलीय,
तुझे हास्य एकूण
खुद्द हास्यही हीरमुसलय,
त्या खळखळनार्या नीरझराने
तुझीच प्रेरणा घेतलीय,
वेणूंच्या सप्त सुरांनीही
तुलाच साद घातलीय,
तुला बघीतल्यापासून
माझे शब्दच हरवलेत,
पण माझ्या हृदयाचे गीत
माझे ओठ गुणगूणत आहेत.
तुझ्या प्रेमाने माझ्यावर
एक वेगळीच जादू केलीय,
देवाकडे काय मागू तुला
तो स्वतः माझ्याकडे तुला मागायला आलाय...

मैत्री वरील आपले प्रेम
नेहमी असेच फुलत रहावे
तू नेहमी हसत रहाविस
आणि तुला हसवत मी रहावे..
-
कधी तू रुसून बसाविस
कधी मीही रुसून राहीन
रुसूनही सुद्धा मग आपण
एकाच वेळी सॉरी बोलावे..
-
कधी तू खोटं बोलावेस
मी ऐकत राहीन तुला
कधीतरी मीही बोलेन
तेंव्हा माफ़ कर मला..
-
डोळ्यांतुनी तुझ्या कधी
मी अश्रु ढाळू देणार नाही
आले जरी कधी चुकून
मातीमोल होवू देणार नाही..
-
पुढे काळही संपून जाईल
आणि शेवटी वेळही संपेल,
पण तरीही निरंतर राहील,
ती फक्त आपली मैत्री.
मी म्हंटल 'अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसविण्यासाठी,तुझी अश्रू पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा'
तीनेही लाजत म्हंटल 'हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे
मग कसं कोण जाने, ती माझ्या मिठीत विरून गेली,
वीरगळून गेली, अगदी माझ्याही नकळत
आता मी; मी राहिलो नव्हतो, न ती; ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती.
मग न जाने का, नजर माझीच लागली.
मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत
त्या भाबडीने हात तिचा कापला होता
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता
पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची
सोंग केलं होतं ग मी सारं
फक्त तुला जळवण्यासाठी
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी
आज तिच्या सोबत माझही प्रेत जळतंय
जीव सोडला आहे
तरीही काळीज रडतंय
काळीज रडतंय...
"प्रेयसी :- दादर स्थानकावर
मुलीच्या चेहर्यावर असिडटाकण्याची बातमी वाचलीस का ?
किती भयानक ना ?
प्रियकर :- होना ...
खूप दुखदायक घटना,
म्हणून तू सांभाळून व हुशारीने रहात जा.
प्रेयसी :- हो रे,
कित्ती प्रेम करतोसमाझ्यावर ♥ ......
बर मला सांग,
असे असिडजर माझ्या चेहर्यावर कोणी टाकले
आणि जर मी त्यात मरण पावले तरआयुष्यभर काय करशील ?
प्रियकर :- मी आयुष्यभर तुरुंगात असेन.
प्रेयसी :- म्हणजे ???
प्रियकर :-तुला दुखावणार्या माणसाला मी जिवंतसोडेन का ?" ♥ ♥
मस्त गाणे श्रावणाचे

आज मी गाणार आहे मस्त गाणे श्रावणाचे
पावसा तू ये न ये मी श्राध्द केले आसवांचे

कोरडा दुष्काळ आहे पाचवीला पूजलेला
का म्हणूनी आसवांना मी सदा गाळावयाचे?

नाचणे तालावरी मी पावसा बघ बंद केले
बंद कर तू दु:ख भाळी आमुच्या कोरावयाचे

धुंद आनंदात रमणे रीत माझ्या जीवनाची
मी न आहे मोर ज्यानी सोडले नाचावयाचे

वाट बघती लोक जेंव्हा देवही धावून येतो
श्रेष्ठ का देवाहुनी तू पावसा ठरवावयाचे

पावसा रे ! ओल उरली फक्त आता आसवांची
त्रास दे वाटेल तितका गाव माझे वेदनांचे

वेधशाळा मोजते पाऊस तो झाला किती,
पण
कृष्ण पैशांच्या सरींना मी कसे
मोजावयाचे?

घोषणा पॅकेजची भरगोस झाली, पण
निधीला
पाय फुटले पीडितांनी फास
आता घ्यावयाचे

बंडखोरी शोभते
"निशिकांत"च्या का शायरीला!
रान आता पेटवावे का कुणाला भ्यावयाचे ?
Every Girl Wants A Guy,
Who Hugs Her When They're Watching A Scary Or Romantic Movie,
Who Gives Her His Jacket Even When He Himself Is Feeling Cold,
Who Will Always Be The One To Make Her Laugh,
Most Importantly He Will Love Her For Who She Is !
That Guy Is What Google Calls "No Result Found" ..!!
तीचीच वाट बघत बसतो मी...........! 



दीवसा स्‍वप्‍ने बघतो मी, 
आणि रात्री जागत असतो मी.

ती येणार तीला भेट काय द्यावी.
या विचाराने तिचावरच
कविता करत बसतो मी.

उगाच काहीही लिहीत असतो मी,
मित्रांनी पाहील्‍यावर त्‍यांचा
करमनुकीचा विषय बनतो मी.

एकटाच तिच्‍या विचारात
बरबडत बसतो मी,
आणि स्‍वतहुन जगात
वेडा ठरत असतो मी.

ती ज्‍या ठीकाणी मला सोडुन गेली.
त्‍याच ठीकाणी जाऊन
बसतो मी,
ती गेलेल्‍या रस्‍त्‍याकडे
एकटकिने पाहत असतो मी.

मला माहीती हे ती येणार नाही.
तरीही तीचीच वाट बघतो मी,
संध्‍याकाळ झाल्‍यावर
मन तीथेच सोडुन घरी परतत असतो मी.

रोज रात्री देवाजवळ तीला
भेटण्‍याची प्रार्थना करत असतो मी,
आणि सकाळ झाल्‍यावर
त्‍या जागेवर जाऊन वेड्यासारखा
पुन्‍हा तीचीच वाट बघत असतो मी.
पुन्‍हा तीचीच वाट बघत असतो मी. —
तो तिला म्हणाला “ डोळ्यात तुझ्या पाहू दे ”


ती म्हणाली 
“ पोळि करपेल,,
थाम्ब जरा राहू दे ”

तो म्हणाला
“ काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर ”

ती म्हणाली
"आई रागावतील,
दूध उतू गेल तर ”

“ ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ ”

“ पिल्लू येईल शाळेतून,
पाणी यायची तीच वेळ ”

“ बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू ”

“ नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू ”

“ तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट ”

“ बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट ”


आता मात्र तो हिरमुसला,
केली थोडी धुसफूस एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस सिगरेट पेटवत,
एकटाच तो निघून गेला.

चिडून डोळे भरून बघत राहिली,
ती त्याला खिड़की आडून दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना, सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली..
अमृतांजनची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली..

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
“ रागावलास न माझ्यावर ? ”

आणि तो विरघळला... “ थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग..

ती म्हणाली
“ बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग ”

“ माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस...?”

“ बोललास हेच पुरे झाल…
एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते,
मी-तू पण तेव्हाच गळलं....
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं....?
स्वप्ना सारखा सहवास नाही,

सावली
सारखी सखी नाही,

प्रेमासारखी संजीवनी
नाही,

एकटेपणाची
जाणीव,

असताना"मैत्रीसारखी"सा थ
नाही...!!! :)
फक्त एकदा हो म्हन,
फक्त एकदा हो म्हन,
तुझ्यासोबत सात पावल चालायचय,
अन त्या पावलातल अंतर मनात ठेवायाचय,
फक्त एकदा हो म्हन,
तुझा हात माझ्या हाती घ्यायचाय ,
अन त्यातला ओलावा मनात जपायचाय,
फक्त एकदा हो म्हन,तुझ्या डोळ्यांत डोळे घालून बघायचय,
अन त्यातल प्रेम अनुभावयाचय ,
फक्त एकदा हो म्हन,
तुझ्या ओठाना मला स्पर्ष करायचाय,
अन त्यातल्या नि : शब्द भावना जाणून घ्यायाच्याय ,
फक्त एकदा हो म्हन,
तुला जवळ घ्यायचय,
अन तुझ्या - माझ्यातला दुरावा सम्पवयाचय,
फक्त एकदा हो म्हन,
सप्त रंगताले सातही रंग तुला द्यायाचेत,
अन त्यातला आनंद मला जपून ठेवायाचय,
फक्त एकदा हो म्हन,
तुझ्या मनात होणार्या भावनांचा शोध घ्यायचाय ,
अन त्याना माझ्या मनाशी जोडायाचय,
फक्त एकदा हो म्हन,
तुझ्या साथीत सात जन्म रहायचय,
अन गोड संसाराच सुख उपभोगयाचय ,
म्हणुन तर...
फक्त एकदा हो म्हन