मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..
मलाही ती प्रचड आवडायची
जेव्हा ती मला आपला "best friend" म्हणायची ,
मनातल गुपित फोडायची ,
लाडत येऊन बोलायची ,
लटक रागवायाची ,
माज्याशी भान्डायची ,
गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,
त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माज्यावर प्रेम करायची ..
पण मला माहित नव्हत ती मला
फ़क्त आपला "best friend " मानायची ..
मला खुप यातना जाल्या, जेव्हा ती म्हणाली .
"मी प्रेमात पडले रे त्याच्या...."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको जालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!"
ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!"
मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .
मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला "best friend" मानायची ..
ती गेल्यावर मी सुन्न जालो ,
आतल्या आत मी मग्न जालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची..
मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,
कारण ती मला तिचा " best friend " मानायची .
मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,
माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,
मुकपणे आपले अश्रु गिळत असायचो
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .
त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..
माज्या बोलन्यापेक्षा माज्या असन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची ..
आधेमधे तिलापण काही तरी हुक्की यायची ,
कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची .
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,
तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून तिला खुष करायचो .
माज्या वेदना आणि दुःख कधीच दाखविले नाही ,
एका शब्दाने ही तिला कलु दिले नाही .
त्या दिवशी त्याची आणि माजी भेट जाली..,
माजी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली ..
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली .
मी भेट दिलेल्या "माज्या कविताची वही" त्याला दाखविली.
दुसरयाच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली..
कारण त्याला कदाचित तिच्या बद्दल असुरक्षितता भासली .
तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची .
तिच्या लग्नामधे तिने मला आवर्जुन बोलावले..
"लग्नाला नक्की यायचे " असे पत्रिकेत लिहून पाठविले .
माज्या ह्रुदयाची शकले मीच गोला केली ,
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली ..
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची .
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..
तिच्या लग्नानंतर मात्र मी एक गोष्ट केली
कटाक्षाने तिची भेट टाळली .
माज्या वागन्यातला फरक .
तिला कलू द्यायची माजी तयारी नव्हती ..
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माज्या अश्रुंची मुळीच कदर नव्हती .
मी इतके दिवस असे काही दाखवले नाही
कारण ती मला फक्त तिचा"best friend " मानायची ..
आयुष्यभर एकट राहून जगत आलो,
तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो
माज्या बिजी लाइफचा चांगला बहाना माज्या कड़े होता..
तिच्याही व्यापनमुले तिला आजिबत वेळ नव्हता ..
तरी पण माज्या एक दोन ओळीना ती उत्तर पाठवायची ..
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..
तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो ,
इतके दिवस थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो ..
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही ..
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही .
तरीही एका वाक्यात तिने सांगितले ..
"तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले "
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली ,
ती मला तिचा "best friend " मानायची..
आता माजाही प्रवास संपत आला आहे ,
मागे बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत आहे ,
आताच पोस्टमन येवुन हे पारसल देवून गेला ..
माज्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला .
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जुन माज्या साठी काही ठेवायची ...!
पण नाही , कारण ...
ती मला तिचा "best friend " मानायची..
तिच्या डायर्यांमधे सापडले ,
माजे हरवलेले क्षण, आठवणी ,
खोडया, थट्टा, हसने, बोलणे, रडणे..,
गुपित, गोष्टी, गाठी, भेटी ...
मैत्री आणि बरच काही ..
आणि पटत गेले की ..,
खरच ती मला तिचा "best friend " मानायची..
जेव्हा शेवटच्या पानावर तिच्या ओळी वाचल्या ..
ह्रुदयातिल अश्रूना जणू वाटा मोकाळ्या जाल्या..
"मला वाटायच त्याच माज्यावर जीवापाड प्रेम आहे ..
फक्त त्यांन मला विचारायची देरी आहे ...
मला तर तो प्रचंड आवडतो ..
मी त्याला " best friend " म्हटल्यावर ..
गालातल्या गालात हसतो ....
मनातल गुपीत सांगतो . माजे ऐकतो ...
माज्याशी भांडतो ....
त्याच्या कविता ऐकवून , माज्या कड़े अर्थपूर्ण कटाक्ष टाकातो ..
माज्या वर प्रेम करतो ....
खरच का तो माज्या वर खर प्रेम करतो ... ?
जणू माज्या ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो ..
मरन्यापूर्वी सरणावर जळत होतो..
काय गरज होती मरण शय्येवर नियतीनेही
माजी अशी क्रूर थट्टा करायची ...
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून दयायची की ...
वेड्या ती तुला तीच "true love " मानायची
Thursday, June 30, 2011
Wednesday, June 29, 2011
प्रेमाचे गुणधर्म......
१) प्रेम हे रंगहीन किवा गुलाबी असून त्याला आल्हाददायक सुगंध असतो .
२) खरे प्रेममानासला आनदी किवा उत्साही बनवीते.
३) प्रेम हे अत्यंत ज्वालाग्राही आहे .
४) प्रेम हे विनाशकाले विपरीत बुद्धि आहे .
सूत्र -----
१) प्रेम + मनुष्य = स्वर्ग
२)मनुष्य + प्रेम + नकार (प्रेयसिचा , प्रेय्कराचा ) = आत्महत्या किवा निराशा (एकतर्फी)
३)मनुष्य - प्रेम = नर्क
प्रेमाचे उपयोग ---
१)अन्नाची मोठ्या प्रमाणात बचत होते, कारण प्रेमात मनुष्याची तहान-भूक हरपते.
२)प्रेमामुले प्रेय्सीचा पैसा वाचतो. तर प्रीयकाराचा कीसा रिकामा होतो .
३)प्रेमामुले गिफ्टशॉप तूदुब चालतात, परिणामी अर्थे व्यवस्थेला चालना मिळते .
४) प्रेमामुले लग्नाची मानसिक तयारी होते; कुणासोबत तरी करण्यासाठी ...

Tuesday, June 28, 2011
साले हे मित्र असतात बाकी मस्त
"काय आयटम चाललीय बघ......!!!!!!!!"
"वहीणी आहे तुझी साल्या,दुसरीकडे बघ...."
हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त
"नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त
पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं
निर्लज्ज असतात ते,त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त
शाळेचा result असो या प्रेमाचा,ह्यांचाच धिंगाना जास्त
तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं
पण काहीही म्हणा,
साले हे मित्र असतात बाकी मस्त
प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं
उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं.
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.
शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं
breakup नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.
प्रेमाचे नाही वाजले तरी मत्रीचे नाणं नक्की वाजतं,
तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी
दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.
मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा
Thanks To All Of My Friends For Being In My Life

Monday, June 27, 2011
ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही....
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही....
"प्रेम" म्हणजे काय ते
...स्वत: केल्याशिवाय समजत नाही....
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही....
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही....
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही...
जीव लावल्याशिवाय समजत नाही....
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही....
"प्रेम" म्हणजे काय ते
...स्वत: केल्याशिवाय समजत नाही....
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही....
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही....
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !

खूप वर्षांनी ती परत आली...........
खूप वर्षांनी ती परत आली
मी किंचितसा हसलो
ती ’हाय’ म्हणाली
...- जेव्हा खूप वर्षांनी ती परत आली
मी म्हटलं ’योगायोगाने भेटलो
ठरवून नव्हे’
तिने तोवर बघून घेतलं
’जाड झालाय्स की रे!’
तिचा सेल वाजला
’एकच मिनिट’ म्हटली मला
’इट्स ओके’ म्हणत मी
कानात दाबलं इयरफोनला
सगळ्या गर्दीत दोघांना अंडरलाईन
केल्यागत वाटलं
तिला बोल्ड, मला
कलंडल्यागत वाटलं
ती म्हणाली ’इथे कसा?’
मी म्हटलं ’असतो इथेच’
’काय चालूए? काय विशेष?’
(कविता, गाणी)’सगळं तेच’
ती थॅंक्सगिव्हिंग आणि स्नोफॉल मध्ये होती
मी प्रश्नांचा विचार करत भारतामध्ये होतो
ती ख्रिसमस पर्यंत पोचल्याचं कळलं
मी प्रश्नांमध्येच अडकलेलो होतो
तिचं प्लेन लॅन्ड झालं तेव्हा
माझ्या सेल मध्ये पाणी गेलं होतं
ती निघून गेल्यापास्नं खरं तर
पाणी बरंच निवळलं होतं
...आता पुन्हा माझ्या तळ्यात बघू नकोस
खडे मारून टप्पे मोजू नकोस
आपले टाईमझोन आता वेगळे झालेत
एकाच वेळी भेटण्याच्या गोष्टी बोलू नकोस
ज्या ज्या गोष्टींवर हसतो आपण
त्यांनीच कधीतरी रडवलेलं असतं आपल्याला
जसं भेटल्यावर हसतो आपण
एकमेकांना
किंवा तू तुला, मी मला.
खूप वर्षांनी ती परत आली
मी किंचितसा हसलो
ती ’हाय’ म्हणाली
- जेव्हा खूप वर्षांनी ती परत आली..!

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी
आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,
दुखवले कितीही तिने
तरी हसून तीच्या परत समोर जायचे असते,
कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने
प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,
म्हणूनच नाही मिळाले परत तरी
निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते...

रस्त्यावर वेगाने गाडी चालवत असताना गतिरोधके येतात तेव्हा आपण गाडीचा वेग कमी करतो. आपण कधीही गतिरोधकावरून वेगाने गाडी चालवून ते ओलांडत नाही. कारण अपघात होण्याची जास्त शक्यता असते. असेच काहीसे अपयशाबाबत असते. तेसुद्धा आपल्या जीवनात एका गतिरोधकाचेच काम करत असते. ते आपल्याला सावधान करते की नेहमी एकसारखा वेग ठेवणे योग्य नाही. असे गतिरोधक आल्यानंतर आपल्याला थांबावे लागते. मात्र खाचखळगे किंवा गतिरोधके आल्यावर वेग कमी करणे आवश्यक असते. असे केल्यास आपल्या आयुष्यात होणारे अपघात आपण टाळू शकतो. अशा प्रकारे तुम्ही आपला प्रवास चालू ठेवून पूर्ण करू शकता.
काही अडथळा न येता तुम्ही आपल्या ध्येयापर्र्यंंत पोहोचू शकता. हे शक्यही आहे. मात्र तेथे पोहोचल्यानंतर आपण जीवनाचा एक चांगला चालक आहोत असे समजणे योग्य ठरणारे नाही. शिवाय अपयश आल्यास ढासळून जाऊ नये. कारण अपयश तुम्हाला परत एकदा तुमची शक्ती एकवटण्यास सांगते. त्यातूनच आपल्याला आपल्या शक्तीचा किंवा कार्यक्षमतेचा अंदाज येत असतो. मात्र त्यानंतर येणाºया संकटांना आपण केव्हाही तयार असतो. त्यामुळे अपयश पचवूनच पुढे जायचे असते.
किंबहुना या अपयशालाच आपली शक्ती समजायचे असते. त्यातूनच प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार होणे म्हणजेच खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करणे होय. वास्तविक पाहता अयशस्वी होण्याअगोदरच आपल्या मनात त्याविषयी भीती निर्माण होते. अशी स्थिती निर्माण होताच आपल्या शरीरात अॅण्ड्रेनेलिन हार्मोनचा स्राव सुरू होतो. हा स्राव आपल्याला येणारे अपयश स्वीकारण्यास प्रेरित करतो. एकदा आपल्या डोक्यातून अपयशाचे भूत पळाले की परत आपण पूर्वस्थितीमध्ये येतो. या भीतीवर जय मिळवणे हेच आपले पहिले लक्ष्य असायला हवे.
यावर एका छान गोष्टीचा दृष्टांत देता येईल. एका जंगलात वाघांची संख्या जवळजवळ शंभर होती. पण मेंढ्यांची संख्या हजारोंमध्ये होती. त्यामुळे वाघाच्या पिलांना त्या मेंढ्या खूप त्रास देत असत. मग वाघ वैतागून बदला घेण्याचे ठरवतात. माकडाला ते पंच बनवतात. वाघ व मेंढ्यांमध्ये युद्ध जाहीर केले जाते. यात माकड वाघांना एक कल्पना सुचविते. ते म्हणते, मेंढ्यांच्या सैन्याचा सेनापती एका वाघाला बनवा व वाघाच्या सैन्याचा सेनापती एका मेंढ्याला बनवा. यावर वाघ विचार करतात व त्याला संमती देतात.
युद्धाच्या मैदानात दोन्ही सैन्ये समोरासमोर येतात. त्यात वाघांचा सेनापती एक मेंढा असतो, तर मेंढ्यांचा सेनापती एक वाघ. माकड युद्ध सुरू होण्याचे बिगुल वाजवते. युद्ध सुरू होते. सुरुवातीलाच मेंढ्यांचा सेनापती असलेला वाघ जोराची डरकाळी फोडतो. ते पाहून वाघांचा सेनापती गारदच होतो व तेथून पळ काढतो. त्यामुळे त्या सेनापती मेंढ्याच्या मागे असलेल्या वाघांना वाटते, आपले सेनापती हरण्याच्या व मरण्याच्या भीतीने पळत सुटले आहेत. त्याप्रमाणे आपणही आता पळायला हवे असे समजून तेही तेथून पळ काढतात. झाले काय, वाघांचीच हार झाली ना? त्यांच्यात एवढी शक्ती असूनही हरण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे त्या शक्तीचा त्यांना साक्षात्कारच झाला नाही. अशा प्रकारे ते या युद्धात हरले. आपलेही अगदी तसेच असते. आपल्याला कुणी हरवूच शकत नाही हा आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत होत
होत नाही तोपर्यंत यशाचे शिखर दूरच आहे, असेच म्हणावे लागेल.

Friday, June 24, 2011
असं असतं का प्रेम?
एका डॉक्टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय.
डॉक्टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. ""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे का?''
""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.'' ""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?'' ""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.'' ""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?'' ""नाही डॉक्टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले.
डॉक्टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्ता करायला इतक्या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?'' त्यावर पुनः तितक्याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.'
ऐकता ऐकता डॉक्टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.'' अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्टरांना आठवला- ""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं
नाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.'' यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं... खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन् जमेल का असं प्रेम करणं आपल्याला

Subscribe to:
Posts (Atom)