Friday, July 15, 2011

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी........."खबरदार जर टाच मारुनी याल पुढे, चिंधड्या उडवीन.... राई ...राई एवड्या ...जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र! भारत माता कि जय .....!!!!!!!!!!!!
म्हणता म्हणता वर्ष झाले
आई तुला जाऊन
तरीही एकही दिवस न गेला
तुझ्या आठवणी वाचून
आई गेली ती पुन्हा कधीच येणार नाही
आईचा शब्द हि कानी पडणार नाही
आई विना निवारा उरणार नाही
दु:ख आईच्या जाण्याचे कधी विसरणार नाही
तुझी मूर्ती, तुझ हसणं, तुझ बोलणं, तुझ वागणं
लक्षात आहे कस भरभरून दिलस प्रेम
एवढी हि आशा न करिता
आम्हालाच नव्हती पर्वा
कळल मोल तू जाता जाता
एकदाच मार हाक आई
कधीच नकार देणार नाही
माझी व्यथा आईलाच कळणार होती
दुसऱ्या तिसऱ्याला कळणार नाही
काय मागू देवाजवळ आता
त्याला माझी मागणी कळणार नाही
आईरूपी देवता माझी हरवली
देवाला ते कळणार नाही
आई असे अनमोल रत्न
जगाच्या बाजारात विकत मिळणार नाही
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत
जाते,
प्रश्न कधी कधी
कळत नाहीत
आणि उत्तर चुकत
जाते,
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता,
पण
प्रत्येक वेळी
नवनवीन गाठ
बनत जाते,
दाखविनाऱ्याला
वाट माहित नसते,
चालणाऱ्याचे ध्येय
मात्र हरवून
जाते,
दिसतात तितक्या
सोप्या नसतात
काही गोष्टी,
"अनुभव"
म्हणजे काय
हे तेव्हाच कळते

Tuesday, July 5, 2011

कसं काय .......
कसं काय मित्रांनो, काय चाललयं, अन आहात कसे ?

i knw सगळे आपापल्या कामत busy असतील, कामातनं वेळ मिळत नाहीये, जरा देखिल नाही....
पण यार असं busy होउन कसं चालेल स्वत:साठी जरा वेळ काढ़ायलाच हवा, नाही तर आपणही त्या भिंतीवरल्या घड्याळlसारखे वेळा पाळण्यात व्यस्त होउन जाऊ...

आजकाल आपण सहज म्हणून कुणाशी बोलत नाही, काम असेल तरचं....

कधी तरी सहज म्हणून कुणाची विचारपूस करुन पहा, मनाला किती समाधान मिळतं....

कधी सहज कुणा लहान मुलाशी बोलून पहा, दोन मिनिटे तुम्हाला स्वत:चाच विसर पडेल...

कधी कुणा एकट्या आजीशी बोलून पहा, तिचा क्षणभर एकटेपणा घालवल्यासाठी तुम्हाला आयुष्यभराचा आशीर्वाद देऊन जाइल ती....

कधी कुणा पत्ता शोधणाऱ्या काकांना, त्यांनी विचारायच्या आधी स्वत:हून मदत करा, ते फार काही बोलणार नाहीत पण त्यांचं तुमच्या विषयी निदान चांगलं मत तर नक्कीचं बनेल....

कधी शेजारच्या काकुला, उगाच, 'कालच्या भाजीचा वास छान येत होता कुठली भाजी होती हो काकू ?' असं विचारून पहा त्याच दिवशी संध्याकाळी काकू स्वत: भाजीची वाटी ( ती भाजी पुन्हा करुन ) घेउन येईल........

कधी एखाद्या जुन्या खुप दिवसांपासून contact मधे नसलेल्या मित्राला फ़ोन करुन मनसोक्त शिव्या घालून पहा, लगेच धावत येईल भेटायला...

किंवा जुन्या मैत्रिणीला फोन करुन थोडा pause घेउन 'कशी आहेस ?' विचारून पहा, ती स्वत:ही रडेल अन तुमचेही डोळे ओले करेल...

कुणाला लक्षात आहे का की मी स्वत:साठीच्या वेळावर बोलणार होतो....

मला सांगा आपण स्वत:साठी वेळ काढतो कशाला मनाला प्रसन्न वाटावं, शांत वाटावं म्हणून ना ?
मग हे सारं एकदा करुन पहा काय वाटतं, सहज म्हणून कुणाशी बोलून पहा, तो वेळ त्यांच्या नाही तुमच्याच कामी लागेल....

तर मित्रांनो सहज म्हणून कधी विचारत चला .....

कसं काय.......
किती दिवस झाले तुझं पत्र नाही………फोन नाही………..अगदी साधा यस एम यस नाही.
रागावलीस ना माझ्यावर ? कशासाठी पण ? आजवर तुझ्या माझ्या ज्या नात्याला तू ‘
मैत्री ‘ म्हणत होतीस त्याच नात्याला मी ‘ प्रेम ‘ म्हणालो म्हणून ? तसं असेल
तर मला कीवच करावीशी वाटते तुझी. कारण ना तुला ‘ मैत्री ‘ चा अर्थ कळलाय आणि ना
‘ प्रेमा ‘ चा. अगदी तू म्हणतेस त्याप्रमाणे तू मैत्रीण असतीस ना माझी तर मी ‘
तुझ्या माझ्या नात्याला ‘ ‘ प्रेमा ‘ चं नाव दिल्यावर तू अशी रागावली नसतीस
माझ्यावर.

प्रेम आणि मैत्रीत काय फरक आहे माहिती आहे तुला ? मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ
शकतं बऱ्याचदा पण प्रेमातून मैत्रीचा सूर उमटेलच असं नाही सांगता येत काही.
प्रेमातून बऱ्याचदा आकाराला येतो अधिकाराचा अंकुर. आता तू म्हणशील, ” मग
श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?”

खरं सांगू ! असं नाही सांगता यायचं काही. पण एवढ नक्कीच सांगेन कि प्रेमाच्या
पातळीपर्यंत जाऊन केलेली मैत्री नक्कीच श्रेष्ठ.

तू म्हणशील, ” म्हणजे कशी ? “

आभाळासारखी आणि मातीसारखी. क्षितिजाशी पाहिलं तर एकरूप झालेली. प्रत्यक्षात
मात्र नेहमीच एक अंतर राखून असलेली. कुणाच्या भीतीनं नव्हे………..एक मर्यादा
म्हणून.

आता तू म्हणशील, ” मग प्रेम कसं असतं ? “

प्रेम असतं असतं नदी आणि समुद्रासारखं………मिलनाची आस असलेलं.

मला माहिती आहे यावर तू काय म्हणणार आहेस ते. आता तू म्हणशील, ” बस्स s s s !!!
एवढंच ! प्रेम म्हणजे मिलनच का फक्त ? “

नाही ! प्रेम म्हणजे मिलनच नाही काही. प्रेमाला आणखी एक पदर असतो. श्रद्धेचा
!!!!

होय !!!! श्रद्धेचा. ईश्वरावर असावी तशी श्रद्धा.

म्हणूनच मला मीरा हीच खरी प्रेयसी वाटते कृष्णाची.
प्रसंगी कृष्णासाठी वीष प्राशन करणारी ………पण कृष्णाशी एकरूप होऊ पहाणारी . आपण
मात्र म्हणतो, मीरेची भक्ती होती कृष्णावर. पण श्रद्धा आणि भाक्तीतला फरक
स्पष्ट करता येईल कुणाला ?

पण आजकाल प्रेमातल्या श्रद्धेच्या या जरतारी पदराची जाणीवच नसते कुणाला.
सौन्दर्य……….त्याची ओढ………त्याचं आकर्षण…………त्याची आसक्ती………आजकालच्या प्रेमाची
एवढीच झेप.

मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते, हेच ना, ” तू जर मीरेला प्रेयसी म्हणतोस
कृष्णाची तर मग राधा कोण ? “

मी राधेला मैत्रीण मानतो कृष्णाची………रासक्रीडे पासून शृंगारापर्यंत कृष्णाला
सोबत करणारी , साथ देणारी……….प्रत्येक पावलाला त्याला समजून घेणारी. आणि
म्हणूनच राधेन मैत्रीची सीमा कधी ओलांडली आणि ती कृष्णाची सखी कधी झाली हे
कळंलच नाही आपल्याला. आणि आपण करत राहिलोत एकंच जप , ” राधे – शाम………राधे –
शाम……..राधे – शाम.”

कळलाय तुला प्रेम आणि मैत्रीतला फरक ?

Monday, July 4, 2011

When you were only 5 years old, I said I love you..
You asked me: "what is it?"

When you were 15 years old, I said I love you..
You blushed.. You look down and smile..

When you were 20 years old, I said I love you..
You put your head on my shoulder and hold my hand.. Afraid that I might dissapear..

When you were 25 years old, I said I love you..
You prepare breakfast and serve it in front of me, and kiss my forhead and said : " you better be quick, is's gonna be late.."

When you were 30 years old, I said I love you..
You said: "if you really love me, please come back early after work.."

When you were 40 years old, I said I love you..
You were cleaning the dining table and said: "ok dear, but it's time for you to help our child with his/her revision.."

When you were 50 years old, I said I love you..
You were knitting and you laugh at me..

When you were 60 years old, I said I love you..
You smile at me..

When you were 70 years old. I said I love you..
We sitting on the rocking chair with our glasses on.. I'm reading your love letter that you sent to me 50 years ago.. With our hand crossing together..

When you were 80 years old, you said you love me!
I didn't say anything but cried..

That day must be the happiest day of my life! Because you said you love me ♥ ♥

पण तो क्षणच खूप वेडा असतो

.........पण तो क्षणच खूप वेडा असतो............
=======================================
केलाय का कधी तुम्ही कुणाला propose ?
केलाच कधी जर तुम्ही suppose
तो क्षण नेहमी आठवणीत राहतो
नकळत कधीतरी मनात डोकावून पाहतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

ती "हो" बोलेल कि "नाही" बोलेल
कि,जे मैत्रीचे नाते आहे तेहि तोडेल
मनात सगळ्या विचारांचा काहूर माजतो
पुरुषा सारखा पुरुष पण साला प्रेमात लाजतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच वेडा असतो.

एरव्ही जराही वेळ नसलेले आम्ही
propose करायला मात्र बरोबर वेळ साधतो
होकार तिचा ग्राह्य धरून मनात स्वप्नाचा बंगला बांधतो,
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

परीक्षेच्या result ची वाटली नाही भीती
तेवढा तो या प्रेमाच्या result ला घाबरतो,
दुसरे काही नको हवे असते त्याला
तो फक्त तिच्या एका होकारानेच सावरतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

तिचे उत्तर मिळेपर्यंत वेळ पण थांबतो,
घड्याळ्याच्या काट्यावर बहुतेक चिखल साठतो
चेक करा जरा ब्लड प्रेशर
propose करताना म्हणे तो शिखर गाठतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

साठवून ठेवा ठेवा तो आयुष्यभर,कारण
तो क्षण खूप वेगळा असतो
ती नसली तरीहि तो नेहमी साथ असतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

Friday, July 1, 2011

माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

जीवनात माझ्या शंका कुशंका ना नेहमी थार राहला राव ,
शाळेत प्रवेश घेताना पन्नास दा विचार केला आम्ही raao,
बेस्ट शाळेतच मी प्रवेश घेत आहे ना कि आहे एक फडतूस शाळा राव ??
...माझी निवड चुकली तर नाही ना राव ???

शाळेत मित्र जोडताना त्याच संभ्रम अवस्थेत जगलो आम्ही राव,
मित्र धोका देणार तर नाही ना हा विचार करत राहलो राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

दहावीत मेरीट मध्ये येवून पण शंका काही पाठलाग सोडेना राव,
घेतला प्रवेश सायन्स ला विचार करत करत राव,
कोठल्या कोलेज मध्ये प्रवेश घ्यावा हा विचार करत रात्री जागून काढल्या राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

बारावी ला पण मेरीट गाठलं पण विचाराचे थैमान सुरु झाल राव,
मेडिकल कि अभियांत्रिकी, वेडे झालो काय करावे सुचत नव्हत राव,
हिम्मत करून घेतली अभियांत्रिकी....... पण मन काही मानत नव्हत राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

कोलेज निवडी मध्ये पण तीच गत.... कुठल करू सेलेक्त यात लागली वाट आमची राव,
संभ्रम आवस्थेत केले कोलेज सेलेक्त एक खास,
आता शाखा कोठली घ्यायची यात लागली आमची वाट,
यांत्रिकी अभियांत्रिकी घेवून केली तर चूक नाही ना राव ,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

कोलेज मध्ये एवढ्या मुलीत गर्ल फ्रेंड सेलेक्सन पण होत अवघड काम,
सौंदर्य कि बुद्धिमता, विचार करून करून थकून गेलो आम्ही राव,
थकवा आला तर डोळे बंद करून निवडली एक ललना राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??


अंतिम वर्षी केम्पस मुलाखतीती कोणती कंपनी सेलेक्त करावी याचा डोक्याला ताण,
चांगला पगार आणि नावाजलेली कंपनी सेलेक्त केली आम्ही राव,
कंपनी जावून जोब प्रोफाईल काय घ्यावा यावर पण झाले आम्हला कान्फुजन राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??

नौकरी मिळाली आता बायको हवी होती आम्हाला राव,
पन्नास जागी कांद्या पोह्याचा प्रोग्राम केला आम्ही राव,
थकून मग निवडली एक सभ्य आणि सुगरण लावण्यवती आम्ही राव,
माझी निवड चुकली तर नाही ना राव ??
मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा

मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा
कारण प्रेमात हो किंवा नाही असते
प्रयत्नात ही नाहीतर ती असते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते
मित्राणो मागणी घालू नका प्रपोज़ मारा
कारण मागणी नंतर एकतर पती श्रीराम नाहीतर राम राम
प्रोप्से मधे लवरशिप मिळाली तर ठीक
नाहीतर फ्रेंडशिपतर असतेच असते
फ्रेंडशिप मधे काही दिवसानी का होईना पोरगी फसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते
मित्राणो मूलीना सीरियस घेऊ नका टाइम पास करा
सिरियस व्हाल तर हमखास मराल
टाइम पास कराल तर राहाल ऑल टाइम सुखी
भेटली तर पा रो नाहीतर चंद्र मुखी
शेवटी पा रो आणि चंद्र मुखी कोणीच कायमची नसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते
एकच कांन मंत्र पाळा मित्राणो
जय देवी जय देवी जय बायको
तू सांगेल ते ते मी आयको
जग म्हणेल काय बायकोचा चमचा आहे
सांगा जगाला तो प्रश्‍न आमचा आहे
शेवटी बायकोच आपल्याला आयुष्य भर सोसते
मित्राणो बायको फक्त आपलीच बायको चांगली असते