Tuesday, July 5, 2011

कसं काय .......
कसं काय मित्रांनो, काय चाललयं, अन आहात कसे ?

i knw सगळे आपापल्या कामत busy असतील, कामातनं वेळ मिळत नाहीये, जरा देखिल नाही....
पण यार असं busy होउन कसं चालेल स्वत:साठी जरा वेळ काढ़ायलाच हवा, नाही तर आपणही त्या भिंतीवरल्या घड्याळlसारखे वेळा पाळण्यात व्यस्त होउन जाऊ...

आजकाल आपण सहज म्हणून कुणाशी बोलत नाही, काम असेल तरचं....

कधी तरी सहज म्हणून कुणाची विचारपूस करुन पहा, मनाला किती समाधान मिळतं....

कधी सहज कुणा लहान मुलाशी बोलून पहा, दोन मिनिटे तुम्हाला स्वत:चाच विसर पडेल...

कधी कुणा एकट्या आजीशी बोलून पहा, तिचा क्षणभर एकटेपणा घालवल्यासाठी तुम्हाला आयुष्यभराचा आशीर्वाद देऊन जाइल ती....

कधी कुणा पत्ता शोधणाऱ्या काकांना, त्यांनी विचारायच्या आधी स्वत:हून मदत करा, ते फार काही बोलणार नाहीत पण त्यांचं तुमच्या विषयी निदान चांगलं मत तर नक्कीचं बनेल....

कधी शेजारच्या काकुला, उगाच, 'कालच्या भाजीचा वास छान येत होता कुठली भाजी होती हो काकू ?' असं विचारून पहा त्याच दिवशी संध्याकाळी काकू स्वत: भाजीची वाटी ( ती भाजी पुन्हा करुन ) घेउन येईल........

कधी एखाद्या जुन्या खुप दिवसांपासून contact मधे नसलेल्या मित्राला फ़ोन करुन मनसोक्त शिव्या घालून पहा, लगेच धावत येईल भेटायला...

किंवा जुन्या मैत्रिणीला फोन करुन थोडा pause घेउन 'कशी आहेस ?' विचारून पहा, ती स्वत:ही रडेल अन तुमचेही डोळे ओले करेल...

कुणाला लक्षात आहे का की मी स्वत:साठीच्या वेळावर बोलणार होतो....

मला सांगा आपण स्वत:साठी वेळ काढतो कशाला मनाला प्रसन्न वाटावं, शांत वाटावं म्हणून ना ?
मग हे सारं एकदा करुन पहा काय वाटतं, सहज म्हणून कुणाशी बोलून पहा, तो वेळ त्यांच्या नाही तुमच्याच कामी लागेल....

तर मित्रांनो सहज म्हणून कधी विचारत चला .....

कसं काय.......

No comments:

Post a Comment