Tuesday, June 5, 2012

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा आणि तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!!
क्षण......
एक क्षण महत्वाचा
हृदयात जपून ठेवण्याचा


या क्षणाची किंमत
तेव्हाच कळते जेव्हा
निघून गेलेला असतो हा
क्षण आपल्या आयुष्यातून

आयुष्य सुरु होत ते या क्षणातूनच
आणि संपतही या एका क्षणातच

हा क्षणच घेऊन जातो
आपल्याला प्रत्तेक क्षणापासून दूर

क्षणाची किंमत करण्यासाठी
तो क्षण अनुभवावा लागतो...!!!!!!
रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो...
अन हळूच भरलेले डोळे पुसतो...
आई ने विचारलं,"काय झाल?",
तर तिला काहीतरी थाप मारतो...
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो...
माझी नसणार्या तिला,
रोज मी कवितेत बघतो...
अन सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...♥♥♥
मन गुंतायाला हि
वेळ लागत नाही
आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही...
वेळ लागतो फक्त
ते गुंतलेले मन आवरायला
आणि तुटलेले मन सावरायला...!!!
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸.•´* ♥
☆ º ♥ `•.¸.•´ ♥ º ☆
♥ "घड्याळा मध्ये तीन काटे असतात, ते तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात आणि ते
सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच, पण
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड भेटी साठी हे काटे
एकमेकांना धरून राहिले आहेत, नाहीका ? .......................
प्रिये, आपले प्रेम व आपली मैत्री अशीच आहे, आपण
एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही मनाने आपण एकमेकांना धरून
राहिलो आहोत" .......... ♥

त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड
आठवणीसाठी ♥
प्रेमाची सर अधुन मधुन रिम-झिम पडणार,
गड-गडनारया हदयाला अजुन काय पाहिजे?
भिजलेल्या प्रेमाला हेच तर पाहिजे,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….


दिवसा अचानक अंधारी पाहुन,
मनातला दिवा पेटतोय कसा?
एकमेकाला भेटण्याची आस होणारच ना,
मुसलदार पावसाला पाहुन थोडी आहे थांबनारे,
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….


रंगेबी-रंगी छत्र्याच्या आड़ आधार वाटतो,
न भिजन्याचा तो एक बहाना वाटतो,
गरवा पडलाय मग अस तर होणारच ना!
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

कुड-कुडनारया जोडप्याना कुड- कुडणारी ठंडी,
कुड-कुडनारया होटावर कुड-कुडणारे शब्द,
उबेची सर येणारच ना!
गच मिठीत कुर-कुर होउनच रहाणार,
तो किवा ती…!म्हटले आहे ना,
ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….

पाउस जरी थांबला तरी ओलावा तसाच राहतो,
कल्पना करावी तितकीच कमी आहे,
आठवण म्हणुन काही क्षण
मात्र आयुष्यभर असेच रिम-झिम करतात…
@"मुलगी :- जर मी तुला म्हणाले कि तू मला आवडतोस तर तुला चेष्टा वाटेल कि खर वाटेल ?
मुलगा :- चेष्टा !!
मुलगी :- काsss ? 
मुलगा :- कारण खर हे आहे, कि तुला मी नुसता आवडतच नाही तरतू माझ्यावर प्रेम सुद्धा करतेस......!!!" ♥ 
मन कधी फ़सत,मन कधी रुसत... कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत.. हसताना मनात बरंच काही असतं... सांगायला मात्र काही जमत नसत... समजुन घ्यावं असं खुप वाटतं.... समजतय त्याला हेही कळत.... शब्दांच्या शोधात मन हरवत... न बोलताच मग डोळ्यांना समजत.. गालावरच्या खळीत उत्तर मिळतं.... पापन्यांखाली ते हळुच लपतं.........