Tuesday, June 5, 2012

रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो...
अन हळूच भरलेले डोळे पुसतो...
आई ने विचारलं,"काय झाल?",
तर तिला काहीतरी थाप मारतो...
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो...
माझी नसणार्या तिला,
रोज मी कवितेत बघतो...
अन सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...♥♥♥

No comments:

Post a Comment