"आयुष्य....."
============================
चांगले वाईट प्रसंग आणि
......कडू गोड आठवण...
आयुष्य म्हणजे अनुभवांची
एक मोठी अनमोल साठवण..
"माझे आयुष्य कष्टाचे"..
असे प्रत्तेकाला वाटे..
दिसत नाहीत जोपर्यंत..
दुसर्याला बोचलेले काटे...
आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर,
असतो एक धोका...
सावध रहा - संधी पहा..
मगच मारा चौका...
आयुष्यावर प्रेम करणे...
हे लक्षात ठेवा महत्वाचे तत्व,
कारण, शेवटी मृत्यू आहे ,
म्हणूनच आयुष्याला आहे महत्व.
आयुष्यावर प्रेम करावे..
असे सांगतात विचारवंत..
काहीतरी जगायचं राहून गेलं....अशी
कदाचित राहिली असावी खंत..
आयुष्य राहिले तर .. पैसा मिळवण्याची
देऊ शकाल हमी...
पण पैशामागे धावून धावून..
नका करू .. आयुष्य कमी..
आयुष्यात कधीही कायम नसते,
सुख-दुःखाची वेळ..
म्हणूनच संकटांना भिवून .. संपवू नका,
आपल्याच आयुष्याचा खेळ..
कठीण आहे सांभाळणे,
प्रत्तेक माणसाचे मन...
म्हणूनच...आयुष्यात जोडलेली माणसं..
हेच खरे धन..
जीवनावर चिंतन करायला....
माणसाला आज वेळच नाही..
म्हणूनच संदीप-सलील सुचवतात...
No comments:
Post a Comment