Saturday, August 6, 2011

अशीच रोज ती मला लपून पाहते...
पहावया नको कुणी जपून पाहते...
मनातले अनेकदा लिहून फाडले
तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...

...हृदयात तिच्या कोण राहते..
सारखे ती त्याला विचारते..
वाटते तिला बोलावे मजशी,
पण न जाणे का बावरते..

मनात तिच्या मूर्ती कुणाची..
सांगड घालत सारखी राहते..
डोळे मिटताच ती स्वप्नात...
निशब्द पणे त्यालाच पाहते..

कळेल का मला कधी..
गूढ तिच्या मनातले..
स्वतःच्या स्वप्नात ती...
अशी कुणाला शोधते..

No comments:

Post a Comment