कधी एके काळी मनाच्या बेटावर त्यात
निर्माण होणार्या सार्या भावना राहत होत्या.......
आनंद , दुखः , ज्ञान , समाधान , प्रेम ......सगळेचं...
एकदा काय झाले ... आकाशवाणी झाली की काही दिवसात ते बेट बुडणार...
म्हणून सगळ्यांनी नावा बनवा आणि निघा..... फक्त प्रेमाला सोडून सारे कामाला लागले....
फक्त प्रेम राहीले.... प्रेमाला वाटले आपण शेवट पर्यंत राहू...
जेव्हा बेट बुडायला लागले .... तेव्हा प्रेमाला वाटले की कोणाची मदत घ्यावी....
श्रीमंती समोर आपल्या नवेतचं बसत होती....
प्रेम म्हणाले " श्रीमंती तु मला मदत करशील का मला पण घेवून चल ? "
" शक्य नाही ,माझ्या नावेत आधीचं सोने ,चांदी, जड्जवाहीर
आहेत त्यात तुला अजिबात जागा नाही ......"
तीथेचं जवळ गर्व पण होता त्याच्या रुबाबदार नावेत
प्रेमाने त्याकडे मदतीची याचना केली.....
" प्रेमा मी तुला मदत नाही करु शकत... कारण प्रेमाचा ओलावा
माझ्या नावेचे नुकसान करेल..........!" गर्व उत्तरला
दुखः ही तेथेचं होते प्रेम म्हणाले .....
" दुखाः माला सोबत येवू दे ......."
" मी एकाकीचं चांगला ....... " दुखः म्हणाले........!
आनंदाला विचारायला प्रेमाने हाका मारली पण
आनंद स्वतःत मशगूल होता... त्याला ऐकूही आले नाही......
तेवढ्यात आवाज आला " ये प्रेमा माझ्या सोबत ये "
प्रेमाने पाहीले तर अतिउत्साह होता........
कुठे जाणार हे न विचारताचं प्रेम त्या सोबत निघाले ...
ते एका रखरखीत निर्जन बेटापर्यंत आले आणि
अतिउत्साह अचानक गायब झाला...
त्या बेटापासून काही अंतरावर ज्ञान होते
प्रेमाने त्याल विचारले " माझी मदत कोण करेल ?"
" तुझी मदत फक्त वेळचं करु शकेल " ज्ञान म्हणाले
" वेळ करेल ........ पण वेळ माझी मदत का करेल ?" प्रेमाने विचारले ?
ज्ञान थोडे हसले मग गंभीरतेने बोलले .......
" कारण वेळ हाच असा एक आहे जो प्रेमाचे महत्व आणि मुल्य जाणतो
आणि त्याला जपतो....... कधी आज बनुन वर्तमानात.........,
कधी आठवण करत भूतकाळात.................
तर कधी स्वप्न होवून भविष्यात ..........!!!!!!!!!
No comments:
Post a Comment