अंधारी असते रात्र पण
कधीचं अडखळत नाही
दुखः आहे फार मनात पण
कधीचं रडत नाही
ना कधी आपुलकीने
कुणी काही विचारले
ना कधी प्रेमाने
कुणी काही सांगीतले
कुणीचं नव्हते कधी माझे
जगताना माला साथ देई
मावळत्या सुर्यासोबत
दिवस आहे जात
सोबतीला मात्र ही
गर्द काळोखी रात
सारे काही अंधारात हरवून जाते
एक सल मात्र मनात राहते
का कधी कोणी नाव
माझे पुकारत नाही
विचारेल का कधी सहज कुणी
कशासाठी अजुन जागतो आहे
की का अजुन तु झोपला नाही ????
No comments:
Post a Comment