Monday, October 31, 2011

आई मी विचार करतोय जन्म गेऊ कि नको याचा ,
विचार करतोय या दुनियात पाऊल ठेवू का नको याचा

बघ ना इथे किती शांत,
बघ ना इथे किती निवांत,
इथे ना कुणाची कटकट,ना कुणाची किटकिट
आणि बाहेर बघ....सगळ्यांची नुसती चिडचिड.

इथून बाहेर आलो ना कि,
माझ्या इवल्याश्या जीवाकडेही तुम्ही खूप काही मागणार,
"डॉक्टर-इंजिनिअर व्हायचं हा बाळा" असेही सांगणार,
आल्या आल्या मी तुमच्या इतक्या अपेक्षा कश्या झेलू?
छोटुसा मी.....तुमच्या मागण्या ऐकू कि खेळण्यांनी खेळू?

मी थोडासा मोठा झालो कि पाठीवर दप्तर येणार,
कारण डोनेशन देऊन तुम्ही शाळेत मला अॅडमिशन घेणार,
हल्ली म्हणे मुलांपेक्षा त्यांच्या दप्तराचं वजन जास्त असतं,
मीही मग इतर मुलांसारखा पाठीवर दप्तर घेऊन गाढव होणार.

अजून थोडा मोठा झालो कि,कॉलेज सुरु होणार,
लपवून लपवून मग मीही कधीतरी डिस्कोला जाणार,
कुणी चुगली केली तर घरी येऊन तुमचा मार खाणार,
माझ्याही डोळ्यासमोर कधी तरी "तिचा" चेहरा येणार,
तीही कधी तरी अशी अलगत मला मिठीत घेणार,
पण ती निघून गेली कि मी "देवदास" होणार.

कधी महागाई तर कधी दंगली भडकणार,
मीही सामान्य माणूस....नेमका मीच त्यात अडकणार.
नोकरी लागावी म्हणून मी उन्हात फिरणार,
शेवटी लाच देऊनच कुठेतरी नोकरी मिळवणार,
लाच देऊन नोकरी मिळवली म्हणून मी पण मग लाच घेणार.

एखादी सुंदर मुलगी बघून लग्न करणार,
तिच्या गरजा जास्त....मग अजून लाच घेणार,
आमच्याही घरात नंतर कधी तरी पाळणा हलणार,
इवलासा जीव आमच्याही घरात मग पाउल ठेवणार......
मग पुन्हा सगळं हेच चक्र सुरु होणार.....

आई म्हणूनच....मी विचार करतोय जन्म गेऊ कि नको याचा ,
विचार करतोय या दुनियात पाऊल ठेवू का नको याचा.

आई म्हणाली,
"बाळा,परिस्थितीने बदलण्यात नसतो रे पुरुषार्थ,
परिस्थिती बदलतो ना....तोच खरा पुरुषार्थ"

Wednesday, October 19, 2011

लाडक्या चिऊस,

सासरी चाललीय पोर त्याची,
म्हणून आभाळ कसं फाटलंय,
इवलीशी होती जन्मली तेव्हा,
पाठवताना तिला आता उरात दाटलंय.

बापाची लेक... बापाला पोराहून जवळची,
पोरीला आई हून बापाची मांडी जवळची,
ईवलीशी बोटं धरून आली होती घरात,
"बाबा बाबा" आवाज तिचा घुमत होता जोरात.

बघता बघता आज चिऊ एवढी मोठी झाली,
पावसात भिजणारी परी आज हळदी मध्ये न्हाली,
सुखात रहा गं पोरी....जीव लाव संसारात,
सासू सासऱ्यांना देव मान...शोधू नको देव्हार्यात.

जमेल तसं....हवं तसं...पण त्याच्यावर मनापासून प्रेम कर,
साथ दे प्रत्तेक क्षणी...संकटात त्याचा हात धर,
काळजी घ्या हो...पोरीच्या माझी,तिला फुलासारखं ठेवलंय,
पोटात घाला चुका...तिला तळहाताच्या फोडासारखं जपलंय.

आठवण ठेव गं पोरी,
बापाला या विसरून नको जाउस,
सुखाने कर तुझा संसार.....
धीर देईल तो तुला...मागे वळून नको पाहूस.....
उत्तम मिसळ मिळणारी ५1 ठिकाणे

१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळ
३...) मामलेदार, ठाणे

४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड

६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड

७) श्री- शनिपारा जवळ

८) नेवाळे- चिंचवड

९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.

१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.

११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन

१२) जुन्नर बस स्थानक.

१३) फडतरे, कलानगरी.

१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर

१५) गोखले उपहार गृह, ठाणे

१६) भगवानदास, नाशिक

१७) फडतरे मिसळ कोल्हापुर

१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे

१९) प्रकाश, दादर

२०) दत्तात्रय, दादर

२१) वृंदावन, दादर

२२) आस्वाद, दादर

२३) आनंदाश्रम, दादर

२४) मामा काणे, दादर

२५) आदर्श, दादर

२६) समर्थ दादर(पूर्व)

२७) माधवराव, सातारा

२८) विनय (गिरगाव)

२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड

३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक

३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक

३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक

३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक

३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक

३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक

३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक

३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक

३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे

३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे

४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर

४१) चोरगे मिसळ कोल्हापुर

४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर

४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर

४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,

४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.

४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर

४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)

४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम

४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल

५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"

५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची
थोडं जगून तर बघ...


स्वत:च्या दुखात चूर असणं तर नेहमीचचं..

कधीतरी इतरांची अनाम दुख अनुभवून बघ..

स्वताला कधी आजमावून बघ..

स्वताच्याच दुखात थोडं हसून बघ..



दुखात हरवून जाऊन..

जगणं विसरण्याइतकं आयुष्य स्वस्त नाही..

अनमोल जीवनाला एक स्पर्श तर करुन बघ..



साद घालतील तुला गीत तुझेच..

शब्द ज्यांचे कधी तू विसरली होतीस..

जमेल सुरांची मैफल पुन्हा..

स्वतामधला आवाज ऐकून तर बघ..



पुन्हा रंग उजळून येतील..

तूच अपुर्‍या सोड्लेल्या चित्राचे..

कुंचले घेऊन ,थोडे रंग भरुन बघ..



खुणाऊ लागेल मोकळे आकाश तुला..

पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी..

पायातल्या सगळ्या बेड्या तोडून टाक..

बंधनं सगळी झुगारुन दे..

तुझ्या पंखांना थोडं आत्मविश्वासाचं बळ देऊन बघ..



नव्या वाटांवरचे निशिगंध फुलू लागतील..

आठवणींच्या वाटेवर थोडं थांबून बघ..

हिरवळीकडॅ एकदा पाहून..

नवीन श्वास अंतरात भरुन तर बघ..



शक्य आहे सगळं..

जगता येण्यासारखं खुप आहे आणखी..

थोडं चाकोरीबाहेर जाऊन तर बघ..

स्वताला नवीन जन्म घेण्याची..

एक संधी देऊन बघ...
जन्माला आली तरी स्वागत होत नाही,
कन्या आहे म्हणून आनंद होत नाही,

परक्याचे धन म्हणून पिता उदास होई,
वंशाचा दिवा नाही म्हणून आई उदास होई,

शिकून यमुनेची निर्मलता गंगेची धार होते,
कमावती म्हणून घराचा आधार होते,

लग्नाच्या बाजारात उभे राहावे लागते,
कन्या आहे म्हणून टोमणे सहन करावे लागते,

आई वडिलांना होते लग्नाची घाई,
सतत वर पक्ष विचारतो लग्न करता का ताई??

पसंत केले जाते ती शिकली म्हणून,
तरी हुंडा मागणी होते वर पक्षाकडून,

लग्न होई थाटात , येते सासरी हसत ,
पैशासाठी मात्र छळली जाते सतत,

एके दिवस जीवनाला ती खूप कंटाळते,
जीवन संपवण्यासाठी मृत्यला कवटाळते ,

अशी हि व्यथा आहे भारतदेशातील कन्येंची,
तरीही बदलत नाही विचारधारा समाजाची ....
Maja 1ka mitra ne tyach girlfriend la lihlele letter............


तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे ♥
एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल
आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे
तु सुद्धा आता
दुसरा कुनी शोधला असशील
रोज रोज त्याला
माझ्यासारखा पिळला असशील
तुला माहीत आहे
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो
एका मुलीला पटवायला
किती घाम गाळावा लागतो
तुला लिहीलेल्या प्रेमपत्रांची
आजही आठवन ताजी आहे
पुढचे प्रेम करायला
मला त्यांची गरज आहे
आपल्या प्रेमापायी तुला दिलेले
सर्व GIFT सुद्धा हवे आहे
अर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना
विकत घ्यायला मी तयार आहे
तुझ्यावर केलेला सर्व खर्च
आजही माझ्याकडे तयार आहे
CHECK घ्यायचा की CASH घ्यायची
यावर विचार सुरु आहे
अरे हो…
तुझा तर माझ्यावर
कोनताही खर्च नसेल
कारन पर्स नेहमी घरी विसरने
तुझे आजही सुटले नसेल
तुझ्याकडे मी दिलेला
माझा फोटो मला हवा आहे
मुलींना IMPRESS करायला
तोच तर एक दुवा आहे
तुझ्याकडुन मिळालेल्या सर्वच वस्तुंचा
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील
तुला जसे PROPOSE केले होते
तसेच मी तिला पन करील
म्हनुन मला माझे
सर्व तु परत कर —
मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो, माझ्यावरही कुणाचं नियंत्रण असायचं..
नकळत का होईना मी हि हरवून जायचो, कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो.
दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो, हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो.
नाहीच फोन तर मिस कॉल तरी द्यायचो, रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ,
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो....

सगळंच आता भूतकाळात विरून गेलं, माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,
दुरावताना मला खूप खूप खूपच वेदना दिल्या, पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं....
जाता जाता खूप काही शिकवून गेलं, भावनाची कदर, हवी हवीशी ती जवळीक, अश्रूचा मूळ स्वाद आणि मुख्यतः.........'प्रेम...
आपण समजत नाही कधी मोल नात्यांचं आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं आज खरंच समाधान वाटतंय कि मी ही कधी प्रेम केलं होतं...
क मुलगी एका गाडीतून एका मुलाला ओव्हरटेक करते.

मुलगा : (जोरात ओरडून ) ए....... म्हैस.

मुलगी : तू गाढव... मूर्ख... बिनडोक..

एवढं बोलत असतानाच तिची गाडी एका म्हशीला धडकते आणि अपघात होतो.

.

.

.

तात्पर्य : मुलींना त्यांच्या भल्याचं सांगितल तरी कळत नाही...
अंधारी असते रात्र पण
कधीचं अडखळत नाही
दुखः आहे फार मनात पण
कधीचं रडत नाही
ना कधी आपुलकीने
कुणी काही विचारले
ना कधी प्रेमाने
कुणी काही सांगीतले
कुणीचं नव्हते कधी माझे
जगताना माला साथ देई
मावळत्या सुर्यासोबत
दिवस आहे जात
सोबतीला मात्र ही
गर्द काळोखी रात
सारे काही अंधारात हरवून जाते
एक सल मात्र मनात राहते
का कधी कोणी नाव
माझे पुकारत नाही
विचारेल का कधी सहज कुणी
कशासाठी अजुन जागतो आहे
की का अजुन तु झोपला नाही ????
काही अनुभव ...........

कधीचं कोणाच्या भावनांशी खेळू नये
कारण कदाचित तुम्ही हा खेळ जिंकाल
पण त्या व्यक्तीला कायमचे गमवाल....

सहनशक्ती खरचं अशी का असते ?
यासाठी नाही की वाईट लोकं जास्त आवाज करतात म्हणून
यासाठी की काहीही झाले तरी लोकं नेहमी शांतचं असतात...

मी त्या लोकांचा सदैव आभारी असेल ज्यांनी माला
नकार दिला आणि शक्य असूनही कधीचं मदत केली नाही
कारण त्यामुळेचं मी बरेचं काही शिकलो आणि आज
कुणाचीही मदत न घेता एकटाचं काहीही करु शकतो

काहिंचा चेहरा आनंदी असणे याचा अर्थ असा नाही की त्यांना दुखः नाही
याचा अर्थ असाही असू शकतो कि त्यांनी दुखाःशी समझोता केला आहे

जर तुमच्या कडे दिवा आहे तर हर एक तुमच्या मागे येईल
पण अंधारात तर सावली सुध्दा साथ सोडून देते

दुसर्‍यासोबत हरणे एकदम सोपे असते पण त्याला कायमचे जिंकणे एकदम अवघड
कधी एके काळी मनाच्या बेटावर त्यात
निर्माण होणार्‍या सार्‍या भावना राहत होत्या.......
आनंद , दुखः , ज्ञान , समाधान , प्रेम ......सगळेचं...
एकदा काय झाले ... आकाशवाणी झाली की काही दिवसात ते बेट बुडणार...
म्हणून सगळ्यांनी नावा बनवा आणि निघा..... फक्त प्रेमाला सोडून सारे कामाला लागले....
फक्त प्रेम राहीले.... प्रेमाला वाटले आपण शेवट पर्यंत राहू...
जेव्हा बेट बुडायला लागले .... तेव्हा प्रेमाला वाटले की कोणाची मदत घ्यावी....
श्रीमंती समोर आपल्या नवेतचं बसत होती....
प्रेम म्हणाले " श्रीमंती तु मला मदत करशील का मला पण घेवून चल ? "
" शक्य नाही ,माझ्या नावेत आधीचं सोने ,चांदी, जड्जवाहीर
आहेत त्यात तुला अजिबात जागा नाही ......"
तीथेचं जवळ गर्व पण होता त्याच्या रुबाबदार नावेत
प्रेमाने त्याकडे मदतीची याचना केली.....
" प्रेमा मी तुला मदत नाही करु शकत... कारण प्रेमाचा ओलावा
माझ्या नावेचे नुकसान करेल..........!" गर्व उत्तरला
दुखः ही तेथेचं होते प्रेम म्हणाले .....
" दुखाः माला सोबत येवू दे ......."
" मी एकाकीचं चांगला ....... " दुखः म्हणाले........!
आनंदाला विचारायला प्रेमाने हाका मारली पण
आनंद स्वतःत मशगूल होता... त्याला ऐकूही आले नाही......
तेवढ्यात आवाज आला " ये प्रेमा माझ्या सोबत ये "
प्रेमाने पाहीले तर अतिउत्साह होता........
कुठे जाणार हे न विचारताचं प्रेम त्या सोबत निघाले ...
ते एका रखरखीत निर्जन बेटापर्यंत आले आणि
अतिउत्साह अचानक गायब झाला...
त्या बेटापासून काही अंतरावर ज्ञान होते
प्रेमाने त्याल विचारले " माझी मदत कोण करेल ?"
" तुझी मदत फक्त वेळचं करु शकेल " ज्ञान म्हणाले
" वेळ करेल ........ पण वेळ माझी मदत का करेल ?" प्रेमाने विचारले ?
ज्ञान थोडे हसले मग गंभीरतेने बोलले .......
" कारण वेळ हाच असा एक आहे जो प्रेमाचे महत्व आणि मुल्य जाणतो
आणि त्याला जपतो....... कधी आज बनुन वर्तमानात.........,
कधी आठवण करत भूतकाळात.................
तर कधी स्वप्न होवून भविष्यात ..........!!!!!!!!!
एकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.

तिथे एक मुलगी येते....

मुलगी : आता पर्यंत तुम्ही जितकी सिगारेट ओढली आहात तेच जर पैसे जमा केले असते तर समोर उभी असलेली मार्साडीज कार तुमची असती...
... मुलगा : तुम्ही सिगारेट ओढता
मुलगी : नाही
मुलगा : मग ती कार तुमची आहे का ?
मुलगी : नाही , अस का विचारत आहात ?
मुलगा : ती कार माझी आहे ....

तात्पर्य : नको तिथे जास्त शहाणपणा दाखवला कि असा पोपट होतो ...
एक २४ वर्षाचा तरुण
मुलागा आणि त्याचे वडील train ने जात
असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं
कपल बसलेल
असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर
बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे
जात आहेत..” त्याचे बाबा फक्त
हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल
वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण
आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर
बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते
ढग आपल्या सोबत धावत आहेत...”
तेव्हा समोर
बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”त
ुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे
का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा
मुलगा जन्मापासूनच अंध
होता आणि त्याला दोनच दिवसांपासून
दिसायला लागले.”
(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य
कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू
शकते..)
पाऊस आणि छत्री यांचे नक्की नातेँ काय ? हे समजने थोडे कठीण आहे.
माझा मते त्यांचे नातेँ त्या छत्रीमध्ये असलेल्या व्यक्तीवर अंवलबून असते.
जसे,
... जर त्या छत्रीमध्ये एकमेकांवर प्रेम करणारे व्यक्ती असतील तर ते नातेँ प्रेमाचे.
जर त्या छत्रीमध्ये दोन अनोळखी माणसे असतील तर ते नातें विश्वासाचें.
जर त्या छत्रीमध्ये दोन मित्र असतील तर ते नातें मैत्रीचेँ.
जर त्या छत्रीमध्ये आई आणि मुले असतील तर ते नातेँ वासल्याचेँ.


नातेँ कुठलेही असो त्या छत्रीमध्ये असणारी प्रत्येक व्यक्तीचा उद्देश मात्र एक असतो, आणि तो म्हणजे स्वःता भिजणे आणि दुसऱ्याला सूरक्षित ठेवणे.
थोड्यात सांगायचे झाले तर, स्वःता उन्हांचे चटके सहन करणे आणि दुसऱ्यानां सावली देणेँ.
तरी पण काही नातीं अशी असतात त्याना ओळखनेँ खूप कठीन असतेँ.
म्हणून पाऊस आणि छत्री याचेँ नक्की नातें काय हे समजणे थोडे जरा कठीणच आहे ?????
जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
... न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री"......!!!!
कधीतरी रडत असतो, ते कोणाला दिसत नाही ...
कधीतरी काळजीत असतो , ते कोणाला दिसत नाही ...
कधीतरी आनंदी असतो, तेही कोणाला दिसत नाही ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.पण कधीतरी मैत्रिणी बरोबर फिरायला जा ...
साले सगळे ओळखीचे तिथेच मरायला येतील
मुलाच्या खोलीत सापडणाऱ्या काही गोष्टी

“लग्नाच्या आधी”

१)परफ्युम
... २)प्रेम पत्रे
३)भेट वस्तू
४)ग्रीटिंग्स
५) नोकिया ई ७१ किंवा आय फोन

आणि
“लग्नानंतर”
१)वेदना शामक गोळ्या (पेन किलर)
२)लोन पेपर्स
३) न भरलेली भरपूर सारी बिल्स
४)आणि अगदीच साधा आणि काम चलाऊ मोबाईल

“हे शाश्वत सत्य मान्य असेल तर लाईक करा”
काही नाही थोडा पाऊस पडत होता,
थोडासा भिजलो, कपडे भिजले,
हात ओले,
mobile ओला,
काय नवल message boxes पण भिजलेले,,
type करू लागले तर बोटे पण भिजलेली,
मग काय..?
लिहिलेले शब्दपण चिंब भिजलेले,
मग प्रेमात चिंब भिजलेल्या माणसांना,
हि भिजलेली कविता पाठवली,
कविता वाचणारी माणसे सुद्धा स्वप्नात भिजलेली,
तेव्हा लक्षात आले अरे हि तर भिजलेल्या पावसाची कविता भिजलेली..!!
आहेस तू सावरायला म्हणून पडायलाही आवडतं!
आहेस तू हसवायला म्हणून रडायलाही आवडतं!
आहेस तू मनवायला म्हणून रुसायलाही आवडतं!
आहेस तू समजवायला म्हणून चूकायलाही आवडतं!
आहेस तू सोबतीला म्हणून जगायलाही आवडतं!
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

तो माझा निरागसपणा कोठे तरी हरवला आहे,
शाळे मधला तो समीर आता एम्प्लोइ बनला आहे,

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .

काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली.

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी..
जुन्या अल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात,
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ??

कधीतरी मार्च मधे चीनूच्या वाढदिवसाला
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे,
हल्ली मात्र रोज फोटो काढतो..
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???

त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वतःच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ??
पाकीटातल्या ५०० रुपयापेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ??

१०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो,
आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ??
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की, का मनात खोल घर करून जातात..
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ???
ती फ़क्त आईच!!!

"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई

उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते
...ती आई

नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते
ती आई

काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई

पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई

परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई

आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई

आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच!!!.........


‎*तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील
का..?
ती म्हणाली माशाला विचार
पाण्यावाचून राहशील
का...?
हसून
पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...? *
*ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..?
गंमत म्हणून
तिला विचारलंतू
माझ्यावर खरच प्रेम
करतेस का...? ...
ती म्हणाली, पाणावलेल्य
ा डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का ?