मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो, माझ्यावरही कुणाचं नियंत्रण असायचं..
नकळत का होईना मी हि हरवून जायचो, कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो.
दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो, हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो.
नाहीच फोन तर मिस कॉल तरी द्यायचो, रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ,
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो....
सगळंच आता भूतकाळात विरून गेलं, माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,
दुरावताना मला खूप खूप खूपच वेदना दिल्या, पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं....
जाता जाता खूप काही शिकवून गेलं, भावनाची कदर, हवी हवीशी ती जवळीक, अश्रूचा मूळ स्वाद आणि मुख्यतः.........'प्रेम...
आपण समजत नाही कधी मोल नात्यांचं आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं आज खरंच समाधान वाटतंय कि मी ही कधी प्रेम केलं होतं...
No comments:
Post a Comment