लाडक्या चिऊस,
सासरी चाललीय पोर त्याची,
म्हणून आभाळ कसं फाटलंय,
इवलीशी होती जन्मली तेव्हा,
पाठवताना तिला आता उरात दाटलंय.
बापाची लेक... बापाला पोराहून जवळची,
पोरीला आई हून बापाची मांडी जवळची,
ईवलीशी बोटं धरून आली होती घरात,
"बाबा बाबा" आवाज तिचा घुमत होता जोरात.
बघता बघता आज चिऊ एवढी मोठी झाली,
पावसात भिजणारी परी आज हळदी मध्ये न्हाली,
सुखात रहा गं पोरी....जीव लाव संसारात,
सासू सासऱ्यांना देव मान...शोधू नको देव्हार्यात.
जमेल तसं....हवं तसं...पण त्याच्यावर मनापासून प्रेम कर,
साथ दे प्रत्तेक क्षणी...संकटात त्याचा हात धर,
काळजी घ्या हो...पोरीच्या माझी,तिला फुलासारखं ठेवलंय,
पोटात घाला चुका...तिला तळहाताच्या फोडासारखं जपलंय.
आठवण ठेव गं पोरी,
बापाला या विसरून नको जाउस,
सुखाने कर तुझा संसार.....
धीर देईल तो तुला...मागे वळून नको पाहूस.....
No comments:
Post a Comment