Saturday, June 11, 2011

विसरून जावे सारे, जाणले मी, हेच बरे
ना मानावे कोणा आपुले, अंती ठरते हेच खरे

सुचते सारे तरल, तरी अबोल व्हावी बोली
ओठी असावे हसू, होता जरी नेत्रकड ओली
पुसता रांगोळी अंगणी, रंगकण तरीही ऊरे
ना मानावे कोणा आपुले, अंती ठरते हेच खरे

येते जरी तुझी आठव, हरेक माझ्या श्वासाला
दाटतो कंठ नेहमीच, माझा हरेक घासाला
तरी वाटते, आटून जावे, माझ्या मनीचे झरे
ना मानावे कोणा आपुले, अंती ठरते हेच खरे

मनाला काय पुसावे, काय घ्यावे-द्यावे मनाला
कोंडावी वाफ, रोखावे आसवांच्या घनाला
मात्र तुला पाहता क्षणी, ऊठती निश्चयावर चरे
ना मानावे कोणा आपुले, अंती ठरते हेच खरे

No comments:

Post a Comment