Saturday, June 11, 2011

प्रेम बिम सारंच असतं झूठ.
सरतेशेवटी एकंच सत्य, आपण एकटे नि अटळ असते ताटातूट.
प्रेमांत पडणं म्हणजे शब्दशः पडणं असतं.
सुरुवात आनंदाश्रूनी झाली तरी शेवटी मात्र आपल्या नशिबी रडणंच असतं.
एकत्रं जगण्या मरण्याच्या नुसत्या खायच्या आणा-भाका.
आणि अचानक एके दिवशी कळून चुकतात आपण केलेल्या साऱ्या चुका.
तिच्या डोळ्यातंच त्याला स्वतःचा चेहरा दिसतो.
पण तिनं नजर चुकवल्यावर मात्र त्याला स्वतःचा चेहराही अनोळखीच भासतो.
आता भविष्याची चिंता नसते त्याला,
पण तिला मात्र त्याच्यातंच तिचं भविष्य दिसतं.
व्यवहारी जगण्याच्या नादांत भविष्यांत हे प्रेम बिम मात्र पुरतं फसतं.
तिच्या प्रेमाखांतर तो आकाशातले चंद्र तारेहि तोडायला तयार असतो.
पण आता प्रत्येक चांदण्या रात्री अश्रूंनी त्याच्या डोळ्यांचा बांध फोडलेला असतो.
रोज रात्री डोळे सारी कुस भिजवतांत.
निजायचं विसरून फितूर, तिच्या खोट्या स्वप्नांनीही सुखावतांत.
कदाचित तिचीही अवस्था यापेक्षा वेगळी नसते.
दोघांचे पाणावलेले डोळे पाहून, नियती मात्र क्रूरपणे हसते.
आता सारं मागे सोडून, दोघेही मनापासून नव्यानं जगण्याचा प्रयत्न करतांत.
पण नव्या जीवनाच्या नव्या वळणावरही, जून्यांच आठवणी नव्यानं घर करतात.
पण नव्या जीवनाच्या नव्या वळणावरही, जून्यांच आठवणी नव्यानं घर करतात.

No comments:

Post a Comment