माहितीये मला की तू आधीच कुनाचा तरी झालयास
म्हणून मी म्हणणार नाही कि तू माझा हो ...
फक्त म्हणणे आता एवढच की जसा होतास तसाच राहा
भासवु नकोस की "तू माझ्या आयुष्यातून गेलायेस"
माझा हट्ट नाही कि तुझे माझ्यावर प्रेम असूच दे
हट्ट आता इतकाच कि मनातील तुझे प्रतिबिंब तसेच राहू दे
माहितीये मला कि डोळे तुझे वाट माझी कधीच पाहणार नाही
पण डोळे माझे वाट तुझी कधीच आयुष्यात चुकवनार नाही ..
माहितीये मला कि माझ्यामुळे हास्य तुझ्या चेहऱ्यावर कधीच खुलणार नाही ...
पण विसरू नकोस कि मी ही आता आयुष्यभर हसणार नाही ...
माहितीये मला कि तुझ्या हृदयावर आता दुसऱ्याच कोणाचा अधिकार आहे
पण माझ्या त्या गोड आठवणीतल्या तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे
No comments:
Post a Comment