Saturday, August 6, 2011

रे भारता !
रे भारता ! कोण करेल आता तुझी रे रक्षा !
नशिबी तुझ्या यवनांचे राज्य आणि
दुबळ्या भारतीयांची दुबळी नीती
कोण कुठली बाई पण
आज आहे तुझी अन भिशिक्त राणी
आणि लेकुरे तिची आज बोलत आहेत
शब्द त्याग आणि सेवेचे
व्यर्थ वाटते आज बलिदान त्या
नर वीरांचे आणि देश प्रेमींचे
अरे रडत असतील आज स्वर्गात
ज्यांनी केले तुझ्या साठी
बलिदान अपुल्या प्राणांचे
कोठे आहेत आज वंशज त्या
वीर अभिमन्यू आणि अर्जुनाचे
कोठे आहेत आज मावळे त्या
तानाजी आणि shivajiche
आज दिसतात सगळीकडे फक्त
अवलादी देशद्रोही आणि स्वार्थ प्रेमींच्या
आज का खवळून नाही उठत
सेना स्वाभिमानी मनगटाच्या
आणि का दिसत नाहीत आज
लेकी राणी झाशीच्या
वांझ झाल्या का रे आज
कुशी वीर मातांच्या
कधी होणार रे सूर्योदय
तुला तारणार्या दिवसाचा
आणि कधी रे होणार अंत
या निर्लज्ज आणि नालायक
राज्य सत्तेचा !

No comments:

Post a Comment