Saturday, November 26, 2011

बंधन हवय की नको
ह्या द्विधा अवस्थेत आयुष्भर जगायच
आणि मोठ्या अभिमानाने
... एक Live-in-Relationship मिरवायच

दूध, पेपर, इस्त्रिवाला, घरभाड
सगळ अर्ध अर्ध वाटुन घ्यायच
आणि अश्या अर्ध्या समाधानाने
एक Live-in-Relationship मिरवायच

नवरा बायको नाहीत
पण अस समजुन एकत्र मात्र रहायच
आणि असल्या गोड गैरसमजात
एक Live-in-Relationship मिरवायच

एकमेकाना space द्यायची
जाब जबाब नाही विचारायच
आणि शय्या सुख मात्र हक्काने उपभोगुन
एक Live-in-Relationship मिरवायच

लग्न म्हणजे लादलेल बंधन, फुकट समर्पण,
वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा अस म्हणायच
आणि संस्कृति आपली बुळचट विचारांची म्हणुन
एक Live-in-Relationship मिरवायच

understanding, interest दोन्ही मग संपत
नाहीच जमल दोघांच तर पळवाटा ठेवायच
आणि स्वहताचिच समजूत काढून
पुन्हा एक नविन Live-in-Relationship बनवायच

एक सुंदर नात अस
Trial & Error basis वर पारखायच
आणि तू चुक मी बरोबर अस म्हणुन
पुन्हा एक Live-in-Relationship मिरवायच

म्हणायला म्हणतात सगले ह्याला
Live-in-Relationship
But When It did not work
तेव्हा असते आरोप प्रत्यारोपांची भली मोठी लिस्ट

मनासारखा साथीदार
असा Experiment करून नसतो मिळत
खर सांगायच तर
हा Concept च आपल्याला नाही पटत

Balancing Act करण्याची
मजा काही औरच असते
मी Emotional तू Practical
एकमेकाना Compliment करत असते

पण पाशि्चमात्त्य संस्कृतीच आंधळ अनुकरण करण
हा तर आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे
Live-in-Relationships करून भागल्यावर
लग्न हाच आम्हाला एकमेव आधार आहे

एक सुंदर नात मनापासून जगण्यातच
खरी मजा असते
Live-in-Relationship करण्यापेक्षा
कुठलही Relation अखेर पर्यंत Live ठेवण्यात
खरी कसोटी असते
कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,

जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.

आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,

आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं.

कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,

कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.

दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.

कोणी गेलं म्हणुन.......
एक अप्रतिम प्रेम कहाणी ...........

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते,
त्याचं जरा जास्तच तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं, पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला कडकाच होता बिचारा पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..
शेवटी न ...राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली..
ती खुष होती, तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती तसाही तो सामन्यच होता जेमतेम नोकरी भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं, पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला.. ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि, मी परदेशी चालले आहे पुन्हा कधीच परत येणार नाही तु मला विसर आजपासुन आपले मार्ग निराळे माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला, संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या, त्याने ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा, इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..’ पुढे या जिद्दीने पेटुन उठ्ला तो, झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला, मित्रांनी मदत केली चांगले लॊक
भेट्ले त्याचे दिवस पालटले तो खुप श्रींमत झाला.. स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला उभा राहिला.. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला, पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती ती सोडुन गेल्याची तिनं नाकारल्याची आपल्या गरीबीचा अपमान केल्याची तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं भिजल त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.. त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहीलं.. हे तिचेच’ आई-वडील.!!
त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रींमती पहावी, त्यानी आपली गाडी पहावी, आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा असं त्याला मनोमन वाटतं होत..
तिला धडा शिकवण्याच्या, अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे
थकल्या खाद्यांने चालतच राहातात, हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो, तसाच हसरा चेहरा आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला, धावतच गेला कबरीकडे, तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही तिला ' कर्करोग’ झाला होता तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात, आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली, तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता..,.........
बाबा खर सांग तू माझ्या आवडीसाठी..
तुझ्या किती आवडी सोडल्या ..
माझ्या सुखासाठी तुझ्या न सुटना-या सवई मोडल्या ?
माझ्या एका सहलीच्या पैश्यासाठी ..
रिक्शा सोडून बस ने गेलास कामाला ..
... घेत होता नवे कपडे मला
अन स्वत : तीच पैंट फाटेपर्यंत घालायचा ...
खर सांगशील तुझा जमाखर्च कसा रे भागवायचा ?
जमवलिस कवडी कवडी ..
दिलीस मला भेल अन रेवडी...
बाबा मी मोठी
होत गेले
अन तू म्हातारा
मला येत गेली अक्कल
अन तुला पडल टक्कल
विसरलास कधी माझ्या साठी होत होता घोड़ा
आता मलाच सांगत असतो झालीस न घोडी
हे तुझ माझ अस वेगळ होत नात
खर सांगशील माझ्या सुखासाठी
आईलाही तू कधी दिला नाही गजरा
पण माझ्या पु-या केल्या गरजा
बाबा आता मी झालोय मोठा
तुझ्या सुखाला नाही राहणार तोटा
तुझ्यासाठी आता इथून पुढे झिजेल
तुझ अपुर स्वप्न पूर्ण होताना दिसेल
तू फ़क्त एक काम कर
आता कामावर जायच तेव्हढ बंद कर
घरी बसून आता आराम कर'
खुप दिवस आईशी निवांत बोलला नसेल
तिला घेउन लाम्ब जायचा एखादा प्लान कर
बाबा आता मी मोठी झालेय
मुली कशा पटवाव्या… मराठी मुलं
किंवा मुली तसे
जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या
बाबतीत.
तशीही प्रत्येकाच ीच इच्छा असते
एकदा तरी प्रेमात
पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे
तुज
पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे
आपलं
’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न
ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं
आणि मग हात चोळत बसावं लागतं. प्रेम कोणावर
करावं
हा तर सगळ्यात मोठा कधीही न
सुटणारा प्रश्न. सगळ्यात
सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे
अगदी सेफ
असते. पण होतं काय,
की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत
मुलाला) लहान पणी शेंबुड
पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं
असतं,
मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक
पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही,
त्या मुळे
सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिल
ी जाते..
ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या बाबतीत
खरी असते,
अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात
झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच
लोकं खरे
शहाणे असतात. आता यात
दिलेल्या कलुप्त्या या फार
जुन्या काळच्या आहेत.. तरी पण
आजही त्या पर्फेक्ट
ऍप्लिकेबल आहेत. १) बसमधे
आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट
काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं,
आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर
खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे
सुटे पैसे
काढून देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबून
कुठपर्यंत
केस नेता ते. २)ट्रेनमधेभरपूर मराठी वाचनीय
साहित्य
घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली,
तर
ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक
जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल,
आणि मग
ओळख …. वगैरे…. ३) खूप लोकप्रिय
सिनेमाची तिन
तिकिटे काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे
याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु
व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट
पहातोय
असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडेबघत रहा.
हाउस फुल्लचा बोर्ड लागला की दोन सुंदर
तरुणी , ज्यांच्याकडे
तिकिटं नाहीत अशांना हेरून त्यांना तिकिटं आहे
त्याच किमतीत ऑफर करा..
आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण
आला नाही म्हणून…. आता इथे दोन तिकिटंएक्स
्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे
मुली एकट्या कधीच सिनेमाला जात नाही्त, एक
तर बॉय फ्रेंड तरी असतो,
किंवा एखादी मैत्रीण
तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर
आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा..
जर
एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे..
मी ब्लॅक
मधे घेतली आहेत असं म्हणून चढ्या किमतीत
कुणाही माणसाला विकून टाका. ४)
टॅक्सी साठी उभे
आहात, आणि बऱ्याच वेळानंतर
टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट
ऑफर
करा.. ५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत
असतांना एकदम जोरात पाउस येतो,
आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार
होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच
आडोसा नाही,
तेंव्हा प्रवास
करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन
चला काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..
६)
एखादी आपल्या घराच्या आसपास
रहाणारी सुंदरी हेरुन
ठेवा. तिची रोजची प्रवास
करण्याची गाडी हेरुन ठेवा,
आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने प्रवास
करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर
रिक्शा वगैरे
साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्यावेळाचे
पण
पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त
असेल.
७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस
लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक,
साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात
जाणं सुरु करा. चेहेऱ्यावरशक्य तेवढे बावळट भाव
ठेऊन हातात,
फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा,
की तिच्या नजरेस
तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास
बसला की तुम्ही इतरांसारखेनाही, तेंव्हा हळूच
ओळख
वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण
येता का सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान
बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघून
हात
जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं….
८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स
कधीच चुकवू
नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर फिरायला खूप
आवडतं. ९)
टिपीकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच
भेटतातच, इथे
पण तशीच दोन तिकिटं
एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते. १०)
दुचाकी वर
लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच
जातोय,
चला तुम्हाला सोडून देतो, असं म्हणून लिफ्ट
द्यावी.
हल्ली चेहेरा ओढणीने झाकून प्रवास
करण्याची पद्धत
आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते..
" मुली " विषयावर एक कविता :-








.
समजून सगळं नासमज बनतात या मुली ।

चांगल्या चांगल्या मुलांना वेडं लावतात या मुली ।।
अनोळखी मुलांना आपला म्हणतात या मुली ।।

पण आपल्याच ओळखीच्यांना ओळख दाखवत नाहीत
या मुली।।
बोलायला गेलो तर Line मारतोय म्हणतात या मुली।।

मग नाहीच बोललो तर Attitude दाखवतोय असं म्हणतात
या मुली।।
मुद्दयाचे बोलणे थोडं असते तरी खुप चपर - चपर करतात
या मुली।।

पण जेव्हा खरचं बोलायची गरज असते तेव्हा नजर
खाली करुन रुमाल खराब करतात या मुली।।
पावसात भिजायचे असते तरी चिखल पाहुन नाक मुरडतात
या मुली।।

थंडी गुलाबीच चांगली असते असे म्हणतात मग दोन-चार
स्वेटर घालुनही कुडकुडतात या मुली।।
वाचून ही कविता चांगल्याच भडकतील या मुली।।

तरी मग कदाचित मनात विचार करुन थोडं तरी बरोबर
आहे म्हणतील याच मुली।।
Finally, खरचं खुप complicated असतात या मुली।।

पण तरी मुलांना का आवडतात याच मुली... ?
सांग ना कसं विसरू मी तुला...........

श्वास आहेस तू माझा,
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.

माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श,
मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.
तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
.................................तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
....................................तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून,तुम
्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
....................................तो बाप असतो
lovemarriage करायला कोणी निघाल
तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप
ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस
ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी,धायमोकळून
रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो.
वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता लाईक करून शेयर पण
करा.............आणि वडिलांचे प्रेम जगाला कळू
न सांगता कळणारे, अन कळून हि न सांगता येणारे...
असे हे प्रेम असते...
डोळ्यात नेहमी दिसणारे,पण वाचता न येणारे...
असे हे प्रेम असते...
काळजीतून कळणारे,पण कळूनही न वळणारे...
असे हे प्रेम असते...
कधी कधी बोलून हि न मिळणारे,अन कधी कधी न बोलतास आपलेसे करणारे...
असे हे प्रेम असते...
जीवाला जीव लावणारे,अन कधी कधी जीवासाठी जीव हि देणारे..
असे हे प्रेम असते...
असे हे प्रेम असते...
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत
जाते,
प्रश्न कधी कधी
कळत नाहीत
आणि उत्तर चुकत
जाते,
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता,
पण
प्रत्येक वेळी
नवनवीन गाठ
बनत जाते,
दाखविनाऱ्याला
वाट माहित नसते,
चालणाऱ्याचे ध्येय
मात्र हरवून
जाते,
दिसतात तितक्या
सोप्या नसतात
काही गोष्टी,
"अनुभव"
म्हणजे काय
हे तेव्हाच कळते.
लव्हलेटर.......
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्षा
इझी आणि बेटर
असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड
गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं
बटर असतं
.
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर
नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट
मधली पेन असतं
आणि
जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन
नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर
खेटर असतं.!
.
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून
भेदरलेलं रॅबिट
असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड
असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट
बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप
वॉटर असतं.!
.
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं
जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं
डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा
लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं
बार्टर असतं.!
.
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट
क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं
वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं
अगदी प्रायव्हेट मॅटर असतं.....
एक घास सुखाचा
अन एक घास दुखाचा,
पण त्याहून निराळा,सगळ्यात वेगळा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

पाहुणे येती घरा,पहिली मागणी तिची,
मुलगीला पाहण्याआधी एक झलक तिची,
दारू न पिणाऱ्यासाठी आधार खूप तिचा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

पोह्यांसोबत घ्या नाहीतर बिस्कीट सोबत घ्या,
स्वतः हि घ्या आणि समोरच्यालाही द्या,
एकच असेल कटिंग घेतला तर वाटून वाटून घ्या,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

मित्रांच्या मैफिलीत वाटा खूप त्याचा,
साक्षीदार तो....हातावर दिलेल्या टाळीचा ,
सुख वाटणारा,तर कधी दु:ख घटवणारा,
धकाधकीच्या जीवनात कुटुंबाला एकत्र बसवणारा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

सकाळीची सुरुवात ह्यानेच करा,
विसरा ओ सगळे टेन्शन,
पिऊन हिला दिवस जाईल बरा,
शांत जागेत,आरामात एक एक घोट घ्या जरा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

चिअर्स....शुभ प्रभात......