Saturday, November 26, 2011

" मुली " विषयावर एक कविता :-








.
समजून सगळं नासमज बनतात या मुली ।

चांगल्या चांगल्या मुलांना वेडं लावतात या मुली ।।
अनोळखी मुलांना आपला म्हणतात या मुली ।।

पण आपल्याच ओळखीच्यांना ओळख दाखवत नाहीत
या मुली।।
बोलायला गेलो तर Line मारतोय म्हणतात या मुली।।

मग नाहीच बोललो तर Attitude दाखवतोय असं म्हणतात
या मुली।।
मुद्दयाचे बोलणे थोडं असते तरी खुप चपर - चपर करतात
या मुली।।

पण जेव्हा खरचं बोलायची गरज असते तेव्हा नजर
खाली करुन रुमाल खराब करतात या मुली।।
पावसात भिजायचे असते तरी चिखल पाहुन नाक मुरडतात
या मुली।।

थंडी गुलाबीच चांगली असते असे म्हणतात मग दोन-चार
स्वेटर घालुनही कुडकुडतात या मुली।।
वाचून ही कविता चांगल्याच भडकतील या मुली।।

तरी मग कदाचित मनात विचार करुन थोडं तरी बरोबर
आहे म्हणतील याच मुली।।
Finally, खरचं खुप complicated असतात या मुली।।

पण तरी मुलांना का आवडतात याच मुली... ?

No comments:

Post a Comment