एक अप्रतिम प्रेम कहाणी ...........
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते,
त्याचं जरा जास्तच तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं, पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला कडकाच होता बिचारा पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..
शेवटी न ...राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली..
ती खुष होती, तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती तसाही तो सामन्यच होता जेमतेम नोकरी भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं, पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला.. ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि, मी परदेशी चालले आहे पुन्हा कधीच परत येणार नाही तु मला विसर आजपासुन आपले मार्ग निराळे माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला, संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या, त्याने ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा, इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..’ पुढे या जिद्दीने पेटुन उठ्ला तो, झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला, मित्रांनी मदत केली चांगले लॊक
भेट्ले त्याचे दिवस पालटले तो खुप श्रींमत झाला.. स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला उभा राहिला.. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला, पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती ती सोडुन गेल्याची तिनं नाकारल्याची आपल्या गरीबीचा अपमान केल्याची तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं भिजल त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.. त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहीलं.. हे तिचेच’ आई-वडील.!!
त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रींमती पहावी, त्यानी आपली गाडी पहावी, आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा असं त्याला मनोमन वाटतं होत..
तिला धडा शिकवण्याच्या, अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे
थकल्या खाद्यांने चालतच राहातात, हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो, तसाच हसरा चेहरा आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला, धावतच गेला कबरीकडे, तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही तिला ' कर्करोग’ झाला होता तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात, आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली, तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता..,.........
No comments:
Post a Comment