बंधन हवय की नको
ह्या द्विधा अवस्थेत आयुष्भर जगायच
आणि मोठ्या अभिमानाने
... एक Live-in-Relationship मिरवायच
दूध, पेपर, इस्त्रिवाला, घरभाड
सगळ अर्ध अर्ध वाटुन घ्यायच
आणि अश्या अर्ध्या समाधानाने
एक Live-in-Relationship मिरवायच
नवरा बायको नाहीत
पण अस समजुन एकत्र मात्र रहायच
आणि असल्या गोड गैरसमजात
एक Live-in-Relationship मिरवायच
एकमेकाना space द्यायची
जाब जबाब नाही विचारायच
आणि शय्या सुख मात्र हक्काने उपभोगुन
एक Live-in-Relationship मिरवायच
लग्न म्हणजे लादलेल बंधन, फुकट समर्पण,
वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा अस म्हणायच
आणि संस्कृति आपली बुळचट विचारांची म्हणुन
एक Live-in-Relationship मिरवायच
understanding, interest दोन्ही मग संपत
नाहीच जमल दोघांच तर पळवाटा ठेवायच
आणि स्वहताचिच समजूत काढून
पुन्हा एक नविन Live-in-Relationship बनवायच
एक सुंदर नात अस
Trial & Error basis वर पारखायच
आणि तू चुक मी बरोबर अस म्हणुन
पुन्हा एक Live-in-Relationship मिरवायच
म्हणायला म्हणतात सगले ह्याला
Live-in-Relationship
But When It did not work
तेव्हा असते आरोप प्रत्यारोपांची भली मोठी लिस्ट
मनासारखा साथीदार
असा Experiment करून नसतो मिळत
खर सांगायच तर
हा Concept च आपल्याला नाही पटत
Balancing Act करण्याची
मजा काही औरच असते
मी Emotional तू Practical
एकमेकाना Compliment करत असते
पण पाशि्चमात्त्य संस्कृतीच आंधळ अनुकरण करण
हा तर आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे
Live-in-Relationships करून भागल्यावर
लग्न हाच आम्हाला एकमेव आधार आहे
एक सुंदर नात मनापासून जगण्यातच
खरी मजा असते
Live-in-Relationship करण्यापेक्षा
कुठलही Relation अखेर पर्यंत Live ठेवण्यात
खरी कसोटी असते
No comments:
Post a Comment