प्रेम हे त्याच्यावर/तिच्यावर करा
जी आपल्या वर हि ती व्यक्ती प्रेम करत असेल
----------------------------------------------------------------------
एक मुलगी होती
मनाने खूप चांगली
पण नशिबाने तिच्याशी
क्रूर थट्ट मांडली
तिने ज्याच्यात पाहिले
भविष्याचे चित्र
तो म्हणाला आपण
राहू नुसतेच मित्र
मग तिला वाटले
जगणे आता संपले
वाढण्या आधिच आनंदाचे
रोप माझे खुंटले
आता तिला लागला
एकटे राहण्याचा छंद
आपल्याच कोषात तिने
केले स्वतःला बंद
एकदा एक मित्र
तिला अडवून म्हणाला
काय हरवले?
का बांधलेस का असे स्वतःला?
तू गमावलास व्यक्ती
ज्याचे प्रेम तुझ्यावर नव्हते
त्याने गमावले प्रेम
तुझे जीवापाड जे होते
हे ऐकताच ती हसली,
विचार करत बसली
स्वतःच घातलेल्या
बंधनांची दोरी हळूच सुटली.
मुलगी आता सुखात जगू लागली
कारण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा जोडीदार लाभला होता...
दुसरीकडे मित्राने मात्र
आपल्यावर प्रेम करणारी गमावली होती ...
आवडली तर नक्की शेयर करा
No comments:
Post a Comment