Tuesday, January 31, 2012

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर,
तुला मनात ठेवून...
विसरून दुखं सारे,
अन,
आपल्यात झालं गेलं,
ते सगळं हि विसरून...

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या प्रेमाच्या,
गोड आठवणींना बरोबर घेऊन...
वाट हि मोठी माझी,
पण,
माहित नाही ग मला,
पोचवेल हि कुठे नेहून...

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या आधारविना,
जाईन मी इतका दूर...
शोधात रहाशील मला,
तू इकडे...
अन,
येईन मी,
त्या गगनाला भिडून..

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या शेवटच्या,
शब्दांना हृदयात ठेऊन,
ठाऊक होते मला,
तू बोललेले,
ते शब्द,
होते सारे खोटे...
कारण,
ते दिसत होते मला,
तुझ्या डोळ्यात राहून राहून...

फक्त तुझ्याच खातर,
मानले मी,
तुझे ते खोटे शब्द हि खरे...
अन,
फक्त तुझ्याच खातर,
निघालो मी तुझ्या आयुष्यातून...
चालू लागलो,
एका नव्या वाटेवर...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून.......

No comments:

Post a Comment