Wednesday, January 11, 2012

कधी कधी मूळ जखमेपेक्षा पण त्यानंतर मिळणाऱ्या सहानुभूतीचे शब्द जास्त टोचतात... कारण सहानुभूती देणारा प्रत्येक जण अगदी निर्मल मनाने सांत्वन करतो असे नाही... त्यातल्या बऱ्याच जणांना ना सहानुभूती देण्यात वेगळाच मोठेपणा वाटतो... अश्या लोकांच सांत्वन हे हळदी सारखा असतं.. ते जखमेवर लावलं ना की आणखी झोंबत... सत्य एकच... की ज्याची त्याची जखम, किती दुखते, हे तोच सांगू शकतो... काही जखमा लवकर भरतात, काही उशिरा अन काहींचे व्रण आयुष्यभर सोबत राहतात... जखम भरल्यावर खपली निघते.. जोपर्यंत ती फक्त जखमेवरची निघते तोपर्यंत ठीक.. पण काही जखमा शरीराबरोबरच मनाचीही खपली काढतात.. आणि त्याच जास्त दुखतात...

No comments:

Post a Comment