Tuesday, January 31, 2012

ती अशीच अचानक भेटली
तिचं नाव काय...
गाव काय
काही काही माहित नव्हतं
उगीच थबकायची
चाहूल घ्यायची
काहीही न बोलता
निघून जायची
गर्दीत मिसळून लपंडाव मांडायची
स्वतःच रुसून स्वतःशीच भांडायची
कधी म्हणाली होती
' ये चार फुले घेऊन भेटायला मला माझाच गंध होऊन '
काय ते तिचं तिलाच माहित
मुक्यानंच बोलायची
खूप सांजेच्या क्षितीजासारखा
असायचा तिचा हुरूप
कधी भिजल्या डोळ्यांची ...
उभी सामोरी कधी वळून पाहणारी ...
हळवी ... पाठमोरी
कधी अधीर अधीर ओथंबल्या घानांसारखी
तर कधी पावसानंतरच्या ...
निःशब्द मनासारखी
गंधित मध्यरात्रीसारखं
बेनाम एक नातं काळजाचा
खोपा करून कसं तिने जपलं होतं...
.काही काही माहित नव्हतं तिचं नाव काय ...
गाव काय काही काही
माहित नव्हतं ती अशीच अचानक भेटली
ती अशीच अचानक भेटली...

No comments:

Post a Comment