Wednesday, January 11, 2012

तो: ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस सगळ्यांशी.
ती:अरे पण मी काय केलेय आता? मी तर एकदम साधी वागतेय.
तो: तेच तर ना.....
"सामान्य रहाणं हिच एक असामान्य गोष्ट आहे...आणि तितकीच कठीण नि वाईट आहे"
तू जितकी चांगली वागशील ना तितका तू स्वत:वर अन्याय करून घेतेयंस.
अपेक्षा वाढतात गं सगळ्यांच्या आपल्याकडून.....
आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो ना तर दोष आपल्याकडे येतो.
चूक जगाची नसते.....
"लोकांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी हे आपणच आपल्या कृतीतून ठरवत असतो"
ती: हम्म्म.....तू पण ना.....खरंच वेडू आहेस.
काय करू मग मी आता? वाईट तरी कशी वागू?
अरे झाडताना कधी मुंग्या दिसल्या ना तरी त्यांना धक्का नाही लावत रे...
तो: ते पण खरेच आहे म्हणा....
"वाईट वागायला पण वाईट असावं लागतं"
तुझं मनच मुळात निर्मळ...मग तू बिचारी तू तरी काय करणार?
पण..........
सोड,जाऊ दे.आहे तशीच वाग....
"गोड पाण्याच्या नदीमुळे समुद्र कशी ना कधी गोड होइलच....."
ती: (गालातल्या गालात हसली.)
तो: ये चांगलं वाग सांगितलं ना....?????
तू पण खूप दुष्ट आहेस हा.....काही चांगली वगैरे नाहीयेयस...
ती:(चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) ???????
तो: "अशी हसत नको जाउस.....
तुझं हसणं वेड लावतं मला."
पुन्हा ती तशीच वाईट वागली.....
पुन्हा तशीच गालातल्या गालात लाजली.

No comments:

Post a Comment