एक घास सुखाचा
अन एक घास दुखाचा,
पण त्याहून निराळा,सगळ्यात वेगळा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....
पाहुणे येती घरा,पहिली मागणी तिची,
मुलगीला पाहण्याआधी एक झलक तिची,
दारू न पिणाऱ्यासाठी आधार खूप तिचा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....
पोह्यांसोबत घ्या नाहीतर बिस्कीट सोबत घ्या,
स्वतः हि घ्या आणि समोरच्यालाही द्या,
एकच असेल कटिंग घेतला तर वाटून वाटून घ्या,
एक निरागस घोट...त्या चहाचा....
मित्रांच्या मैफिलीत वाटा खूप त्याचा,
साक्षीदार तो....हातावर दिलेल्या टाळीचा ,
सुख वाटणारा,तर कधी दु:ख घटवणारा,
धकाधकीच्या जीवनात कुटुंबाला एकत्र बसवणारा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....
सकाळीची सुरुवात ह्यानेच करा,
विसरा ओ सगळे टेन्शन,
पिऊन हिला दिवस जाईल बरा,
शांत जागेत,आरामात एक एक घोट घ्या जरा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....
चिअर्स....शुभ प्रभात......
No comments:
Post a Comment