Saturday, November 26, 2011

बंधन हवय की नको
ह्या द्विधा अवस्थेत आयुष्भर जगायच
आणि मोठ्या अभिमानाने
... एक Live-in-Relationship मिरवायच

दूध, पेपर, इस्त्रिवाला, घरभाड
सगळ अर्ध अर्ध वाटुन घ्यायच
आणि अश्या अर्ध्या समाधानाने
एक Live-in-Relationship मिरवायच

नवरा बायको नाहीत
पण अस समजुन एकत्र मात्र रहायच
आणि असल्या गोड गैरसमजात
एक Live-in-Relationship मिरवायच

एकमेकाना space द्यायची
जाब जबाब नाही विचारायच
आणि शय्या सुख मात्र हक्काने उपभोगुन
एक Live-in-Relationship मिरवायच

लग्न म्हणजे लादलेल बंधन, फुकट समर्पण,
वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा अस म्हणायच
आणि संस्कृति आपली बुळचट विचारांची म्हणुन
एक Live-in-Relationship मिरवायच

understanding, interest दोन्ही मग संपत
नाहीच जमल दोघांच तर पळवाटा ठेवायच
आणि स्वहताचिच समजूत काढून
पुन्हा एक नविन Live-in-Relationship बनवायच

एक सुंदर नात अस
Trial & Error basis वर पारखायच
आणि तू चुक मी बरोबर अस म्हणुन
पुन्हा एक Live-in-Relationship मिरवायच

म्हणायला म्हणतात सगले ह्याला
Live-in-Relationship
But When It did not work
तेव्हा असते आरोप प्रत्यारोपांची भली मोठी लिस्ट

मनासारखा साथीदार
असा Experiment करून नसतो मिळत
खर सांगायच तर
हा Concept च आपल्याला नाही पटत

Balancing Act करण्याची
मजा काही औरच असते
मी Emotional तू Practical
एकमेकाना Compliment करत असते

पण पाशि्चमात्त्य संस्कृतीच आंधळ अनुकरण करण
हा तर आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे
Live-in-Relationships करून भागल्यावर
लग्न हाच आम्हाला एकमेव आधार आहे

एक सुंदर नात मनापासून जगण्यातच
खरी मजा असते
Live-in-Relationship करण्यापेक्षा
कुठलही Relation अखेर पर्यंत Live ठेवण्यात
खरी कसोटी असते
कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,

जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.

आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,

आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं.

कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,

कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.

दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.

कोणी गेलं म्हणुन.......
एक अप्रतिम प्रेम कहाणी ...........

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते,
त्याचं जरा जास्तच तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं, पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला कडकाच होता बिचारा पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..
शेवटी न ...राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली..
ती खुष होती, तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती तसाही तो सामन्यच होता जेमतेम नोकरी भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं, पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला.. ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि, मी परदेशी चालले आहे पुन्हा कधीच परत येणार नाही तु मला विसर आजपासुन आपले मार्ग निराळे माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला, संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या, त्याने ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा, इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..’ पुढे या जिद्दीने पेटुन उठ्ला तो, झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला, मित्रांनी मदत केली चांगले लॊक
भेट्ले त्याचे दिवस पालटले तो खुप श्रींमत झाला.. स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला उभा राहिला.. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला, पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती ती सोडुन गेल्याची तिनं नाकारल्याची आपल्या गरीबीचा अपमान केल्याची तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं भिजल त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.. त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहीलं.. हे तिचेच’ आई-वडील.!!
त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रींमती पहावी, त्यानी आपली गाडी पहावी, आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा असं त्याला मनोमन वाटतं होत..
तिला धडा शिकवण्याच्या, अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे
थकल्या खाद्यांने चालतच राहातात, हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो, तसाच हसरा चेहरा आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला, धावतच गेला कबरीकडे, तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही तिला ' कर्करोग’ झाला होता तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात, आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली, तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता..,.........
बाबा खर सांग तू माझ्या आवडीसाठी..
तुझ्या किती आवडी सोडल्या ..
माझ्या सुखासाठी तुझ्या न सुटना-या सवई मोडल्या ?
माझ्या एका सहलीच्या पैश्यासाठी ..
रिक्शा सोडून बस ने गेलास कामाला ..
... घेत होता नवे कपडे मला
अन स्वत : तीच पैंट फाटेपर्यंत घालायचा ...
खर सांगशील तुझा जमाखर्च कसा रे भागवायचा ?
जमवलिस कवडी कवडी ..
दिलीस मला भेल अन रेवडी...
बाबा मी मोठी
होत गेले
अन तू म्हातारा
मला येत गेली अक्कल
अन तुला पडल टक्कल
विसरलास कधी माझ्या साठी होत होता घोड़ा
आता मलाच सांगत असतो झालीस न घोडी
हे तुझ माझ अस वेगळ होत नात
खर सांगशील माझ्या सुखासाठी
आईलाही तू कधी दिला नाही गजरा
पण माझ्या पु-या केल्या गरजा
बाबा आता मी झालोय मोठा
तुझ्या सुखाला नाही राहणार तोटा
तुझ्यासाठी आता इथून पुढे झिजेल
तुझ अपुर स्वप्न पूर्ण होताना दिसेल
तू फ़क्त एक काम कर
आता कामावर जायच तेव्हढ बंद कर
घरी बसून आता आराम कर'
खुप दिवस आईशी निवांत बोलला नसेल
तिला घेउन लाम्ब जायचा एखादा प्लान कर
बाबा आता मी मोठी झालेय
मुली कशा पटवाव्या… मराठी मुलं
किंवा मुली तसे
जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या
बाबतीत.
तशीही प्रत्येकाच ीच इच्छा असते
एकदा तरी प्रेमात
पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे
तुज
पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे
आपलं
’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न
ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं
आणि मग हात चोळत बसावं लागतं. प्रेम कोणावर
करावं
हा तर सगळ्यात मोठा कधीही न
सुटणारा प्रश्न. सगळ्यात
सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे
अगदी सेफ
असते. पण होतं काय,
की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत
मुलाला) लहान पणी शेंबुड
पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं
असतं,
मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक
पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही,
त्या मुळे
सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिल
ी जाते..
ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या बाबतीत
खरी असते,
अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात
झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच
लोकं खरे
शहाणे असतात. आता यात
दिलेल्या कलुप्त्या या फार
जुन्या काळच्या आहेत.. तरी पण
आजही त्या पर्फेक्ट
ऍप्लिकेबल आहेत. १) बसमधे
आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट
काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं,
आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर
खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे
सुटे पैसे
काढून देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबून
कुठपर्यंत
केस नेता ते. २)ट्रेनमधेभरपूर मराठी वाचनीय
साहित्य
घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली,
तर
ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक
जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल,
आणि मग
ओळख …. वगैरे…. ३) खूप लोकप्रिय
सिनेमाची तिन
तिकिटे काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे
याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु
व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट
पहातोय
असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडेबघत रहा.
हाउस फुल्लचा बोर्ड लागला की दोन सुंदर
तरुणी , ज्यांच्याकडे
तिकिटं नाहीत अशांना हेरून त्यांना तिकिटं आहे
त्याच किमतीत ऑफर करा..
आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण
आला नाही म्हणून…. आता इथे दोन तिकिटंएक्स
्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे
मुली एकट्या कधीच सिनेमाला जात नाही्त, एक
तर बॉय फ्रेंड तरी असतो,
किंवा एखादी मैत्रीण
तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर
आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा..
जर
एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे..
मी ब्लॅक
मधे घेतली आहेत असं म्हणून चढ्या किमतीत
कुणाही माणसाला विकून टाका. ४)
टॅक्सी साठी उभे
आहात, आणि बऱ्याच वेळानंतर
टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट
ऑफर
करा.. ५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत
असतांना एकदम जोरात पाउस येतो,
आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार
होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच
आडोसा नाही,
तेंव्हा प्रवास
करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन
चला काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..
६)
एखादी आपल्या घराच्या आसपास
रहाणारी सुंदरी हेरुन
ठेवा. तिची रोजची प्रवास
करण्याची गाडी हेरुन ठेवा,
आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने प्रवास
करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर
रिक्शा वगैरे
साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्यावेळाचे
पण
पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त
असेल.
७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस
लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक,
साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात
जाणं सुरु करा. चेहेऱ्यावरशक्य तेवढे बावळट भाव
ठेऊन हातात,
फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा,
की तिच्या नजरेस
तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास
बसला की तुम्ही इतरांसारखेनाही, तेंव्हा हळूच
ओळख
वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण
येता का सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान
बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघून
हात
जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं….
८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स
कधीच चुकवू
नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर फिरायला खूप
आवडतं. ९)
टिपीकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच
भेटतातच, इथे
पण तशीच दोन तिकिटं
एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते. १०)
दुचाकी वर
लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच
जातोय,
चला तुम्हाला सोडून देतो, असं म्हणून लिफ्ट
द्यावी.
हल्ली चेहेरा ओढणीने झाकून प्रवास
करण्याची पद्धत
आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते..
" मुली " विषयावर एक कविता :-








.
समजून सगळं नासमज बनतात या मुली ।

चांगल्या चांगल्या मुलांना वेडं लावतात या मुली ।।
अनोळखी मुलांना आपला म्हणतात या मुली ।।

पण आपल्याच ओळखीच्यांना ओळख दाखवत नाहीत
या मुली।।
बोलायला गेलो तर Line मारतोय म्हणतात या मुली।।

मग नाहीच बोललो तर Attitude दाखवतोय असं म्हणतात
या मुली।।
मुद्दयाचे बोलणे थोडं असते तरी खुप चपर - चपर करतात
या मुली।।

पण जेव्हा खरचं बोलायची गरज असते तेव्हा नजर
खाली करुन रुमाल खराब करतात या मुली।।
पावसात भिजायचे असते तरी चिखल पाहुन नाक मुरडतात
या मुली।।

थंडी गुलाबीच चांगली असते असे म्हणतात मग दोन-चार
स्वेटर घालुनही कुडकुडतात या मुली।।
वाचून ही कविता चांगल्याच भडकतील या मुली।।

तरी मग कदाचित मनात विचार करुन थोडं तरी बरोबर
आहे म्हणतील याच मुली।।
Finally, खरचं खुप complicated असतात या मुली।।

पण तरी मुलांना का आवडतात याच मुली... ?
सांग ना कसं विसरू मी तुला...........

श्वास आहेस तू माझा,
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.

माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श,
मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.
तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
.................................तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
....................................तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून,तुम
्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
....................................तो बाप असतो
lovemarriage करायला कोणी निघाल
तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप
ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस
ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी,धायमोकळून
रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो.
वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता लाईक करून शेयर पण
करा.............आणि वडिलांचे प्रेम जगाला कळू
न सांगता कळणारे, अन कळून हि न सांगता येणारे...
असे हे प्रेम असते...
डोळ्यात नेहमी दिसणारे,पण वाचता न येणारे...
असे हे प्रेम असते...
काळजीतून कळणारे,पण कळूनही न वळणारे...
असे हे प्रेम असते...
कधी कधी बोलून हि न मिळणारे,अन कधी कधी न बोलतास आपलेसे करणारे...
असे हे प्रेम असते...
जीवाला जीव लावणारे,अन कधी कधी जीवासाठी जीव हि देणारे..
असे हे प्रेम असते...
असे हे प्रेम असते...
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत
जाते,
प्रश्न कधी कधी
कळत नाहीत
आणि उत्तर चुकत
जाते,
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता,
पण
प्रत्येक वेळी
नवनवीन गाठ
बनत जाते,
दाखविनाऱ्याला
वाट माहित नसते,
चालणाऱ्याचे ध्येय
मात्र हरवून
जाते,
दिसतात तितक्या
सोप्या नसतात
काही गोष्टी,
"अनुभव"
म्हणजे काय
हे तेव्हाच कळते.
लव्हलेटर.......
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्षा
इझी आणि बेटर
असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड
गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं
बटर असतं
.
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर
नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट
मधली पेन असतं
आणि
जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन
नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर
खेटर असतं.!
.
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून
भेदरलेलं रॅबिट
असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड
असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट
बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप
वॉटर असतं.!
.
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं
जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं
डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा
लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं
बार्टर असतं.!
.
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे
एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट
क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं
वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं
अगदी प्रायव्हेट मॅटर असतं.....
एक घास सुखाचा
अन एक घास दुखाचा,
पण त्याहून निराळा,सगळ्यात वेगळा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

पाहुणे येती घरा,पहिली मागणी तिची,
मुलगीला पाहण्याआधी एक झलक तिची,
दारू न पिणाऱ्यासाठी आधार खूप तिचा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

पोह्यांसोबत घ्या नाहीतर बिस्कीट सोबत घ्या,
स्वतः हि घ्या आणि समोरच्यालाही द्या,
एकच असेल कटिंग घेतला तर वाटून वाटून घ्या,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

मित्रांच्या मैफिलीत वाटा खूप त्याचा,
साक्षीदार तो....हातावर दिलेल्या टाळीचा ,
सुख वाटणारा,तर कधी दु:ख घटवणारा,
धकाधकीच्या जीवनात कुटुंबाला एकत्र बसवणारा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

सकाळीची सुरुवात ह्यानेच करा,
विसरा ओ सगळे टेन्शन,
पिऊन हिला दिवस जाईल बरा,
शांत जागेत,आरामात एक एक घोट घ्या जरा,
एक निरागस घोट...त्या चहाचा....

चिअर्स....शुभ प्रभात......

Monday, October 31, 2011

आई मी विचार करतोय जन्म गेऊ कि नको याचा ,
विचार करतोय या दुनियात पाऊल ठेवू का नको याचा

बघ ना इथे किती शांत,
बघ ना इथे किती निवांत,
इथे ना कुणाची कटकट,ना कुणाची किटकिट
आणि बाहेर बघ....सगळ्यांची नुसती चिडचिड.

इथून बाहेर आलो ना कि,
माझ्या इवल्याश्या जीवाकडेही तुम्ही खूप काही मागणार,
"डॉक्टर-इंजिनिअर व्हायचं हा बाळा" असेही सांगणार,
आल्या आल्या मी तुमच्या इतक्या अपेक्षा कश्या झेलू?
छोटुसा मी.....तुमच्या मागण्या ऐकू कि खेळण्यांनी खेळू?

मी थोडासा मोठा झालो कि पाठीवर दप्तर येणार,
कारण डोनेशन देऊन तुम्ही शाळेत मला अॅडमिशन घेणार,
हल्ली म्हणे मुलांपेक्षा त्यांच्या दप्तराचं वजन जास्त असतं,
मीही मग इतर मुलांसारखा पाठीवर दप्तर घेऊन गाढव होणार.

अजून थोडा मोठा झालो कि,कॉलेज सुरु होणार,
लपवून लपवून मग मीही कधीतरी डिस्कोला जाणार,
कुणी चुगली केली तर घरी येऊन तुमचा मार खाणार,
माझ्याही डोळ्यासमोर कधी तरी "तिचा" चेहरा येणार,
तीही कधी तरी अशी अलगत मला मिठीत घेणार,
पण ती निघून गेली कि मी "देवदास" होणार.

कधी महागाई तर कधी दंगली भडकणार,
मीही सामान्य माणूस....नेमका मीच त्यात अडकणार.
नोकरी लागावी म्हणून मी उन्हात फिरणार,
शेवटी लाच देऊनच कुठेतरी नोकरी मिळवणार,
लाच देऊन नोकरी मिळवली म्हणून मी पण मग लाच घेणार.

एखादी सुंदर मुलगी बघून लग्न करणार,
तिच्या गरजा जास्त....मग अजून लाच घेणार,
आमच्याही घरात नंतर कधी तरी पाळणा हलणार,
इवलासा जीव आमच्याही घरात मग पाउल ठेवणार......
मग पुन्हा सगळं हेच चक्र सुरु होणार.....

आई म्हणूनच....मी विचार करतोय जन्म गेऊ कि नको याचा ,
विचार करतोय या दुनियात पाऊल ठेवू का नको याचा.

आई म्हणाली,
"बाळा,परिस्थितीने बदलण्यात नसतो रे पुरुषार्थ,
परिस्थिती बदलतो ना....तोच खरा पुरुषार्थ"

Wednesday, October 19, 2011

लाडक्या चिऊस,

सासरी चाललीय पोर त्याची,
म्हणून आभाळ कसं फाटलंय,
इवलीशी होती जन्मली तेव्हा,
पाठवताना तिला आता उरात दाटलंय.

बापाची लेक... बापाला पोराहून जवळची,
पोरीला आई हून बापाची मांडी जवळची,
ईवलीशी बोटं धरून आली होती घरात,
"बाबा बाबा" आवाज तिचा घुमत होता जोरात.

बघता बघता आज चिऊ एवढी मोठी झाली,
पावसात भिजणारी परी आज हळदी मध्ये न्हाली,
सुखात रहा गं पोरी....जीव लाव संसारात,
सासू सासऱ्यांना देव मान...शोधू नको देव्हार्यात.

जमेल तसं....हवं तसं...पण त्याच्यावर मनापासून प्रेम कर,
साथ दे प्रत्तेक क्षणी...संकटात त्याचा हात धर,
काळजी घ्या हो...पोरीच्या माझी,तिला फुलासारखं ठेवलंय,
पोटात घाला चुका...तिला तळहाताच्या फोडासारखं जपलंय.

आठवण ठेव गं पोरी,
बापाला या विसरून नको जाउस,
सुखाने कर तुझा संसार.....
धीर देईल तो तुला...मागे वळून नको पाहूस.....
उत्तम मिसळ मिळणारी ५1 ठिकाणे

१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळ
३...) मामलेदार, ठाणे

४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड

६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड

७) श्री- शनिपारा जवळ

८) नेवाळे- चिंचवड

९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.

१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.

११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन

१२) जुन्नर बस स्थानक.

१३) फडतरे, कलानगरी.

१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर

१५) गोखले उपहार गृह, ठाणे

१६) भगवानदास, नाशिक

१७) फडतरे मिसळ कोल्हापुर

१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे

१९) प्रकाश, दादर

२०) दत्तात्रय, दादर

२१) वृंदावन, दादर

२२) आस्वाद, दादर

२३) आनंदाश्रम, दादर

२४) मामा काणे, दादर

२५) आदर्श, दादर

२६) समर्थ दादर(पूर्व)

२७) माधवराव, सातारा

२८) विनय (गिरगाव)

२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड

३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक

३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक

३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक

३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक

३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक

३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक

३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक

३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक

३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे

३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे

४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर

४१) चोरगे मिसळ कोल्हापुर

४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर

४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर

४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,

४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.

४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर

४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)

४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम

४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल

५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"

५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची
थोडं जगून तर बघ...


स्वत:च्या दुखात चूर असणं तर नेहमीचचं..

कधीतरी इतरांची अनाम दुख अनुभवून बघ..

स्वताला कधी आजमावून बघ..

स्वताच्याच दुखात थोडं हसून बघ..



दुखात हरवून जाऊन..

जगणं विसरण्याइतकं आयुष्य स्वस्त नाही..

अनमोल जीवनाला एक स्पर्श तर करुन बघ..



साद घालतील तुला गीत तुझेच..

शब्द ज्यांचे कधी तू विसरली होतीस..

जमेल सुरांची मैफल पुन्हा..

स्वतामधला आवाज ऐकून तर बघ..



पुन्हा रंग उजळून येतील..

तूच अपुर्‍या सोड्लेल्या चित्राचे..

कुंचले घेऊन ,थोडे रंग भरुन बघ..



खुणाऊ लागेल मोकळे आकाश तुला..

पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी..

पायातल्या सगळ्या बेड्या तोडून टाक..

बंधनं सगळी झुगारुन दे..

तुझ्या पंखांना थोडं आत्मविश्वासाचं बळ देऊन बघ..



नव्या वाटांवरचे निशिगंध फुलू लागतील..

आठवणींच्या वाटेवर थोडं थांबून बघ..

हिरवळीकडॅ एकदा पाहून..

नवीन श्वास अंतरात भरुन तर बघ..



शक्य आहे सगळं..

जगता येण्यासारखं खुप आहे आणखी..

थोडं चाकोरीबाहेर जाऊन तर बघ..

स्वताला नवीन जन्म घेण्याची..

एक संधी देऊन बघ...
जन्माला आली तरी स्वागत होत नाही,
कन्या आहे म्हणून आनंद होत नाही,

परक्याचे धन म्हणून पिता उदास होई,
वंशाचा दिवा नाही म्हणून आई उदास होई,

शिकून यमुनेची निर्मलता गंगेची धार होते,
कमावती म्हणून घराचा आधार होते,

लग्नाच्या बाजारात उभे राहावे लागते,
कन्या आहे म्हणून टोमणे सहन करावे लागते,

आई वडिलांना होते लग्नाची घाई,
सतत वर पक्ष विचारतो लग्न करता का ताई??

पसंत केले जाते ती शिकली म्हणून,
तरी हुंडा मागणी होते वर पक्षाकडून,

लग्न होई थाटात , येते सासरी हसत ,
पैशासाठी मात्र छळली जाते सतत,

एके दिवस जीवनाला ती खूप कंटाळते,
जीवन संपवण्यासाठी मृत्यला कवटाळते ,

अशी हि व्यथा आहे भारतदेशातील कन्येंची,
तरीही बदलत नाही विचारधारा समाजाची ....
Maja 1ka mitra ne tyach girlfriend la lihlele letter............


तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे ♥
एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल
आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे
तु सुद्धा आता
दुसरा कुनी शोधला असशील
रोज रोज त्याला
माझ्यासारखा पिळला असशील
तुला माहीत आहे
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो
एका मुलीला पटवायला
किती घाम गाळावा लागतो
तुला लिहीलेल्या प्रेमपत्रांची
आजही आठवन ताजी आहे
पुढचे प्रेम करायला
मला त्यांची गरज आहे
आपल्या प्रेमापायी तुला दिलेले
सर्व GIFT सुद्धा हवे आहे
अर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना
विकत घ्यायला मी तयार आहे
तुझ्यावर केलेला सर्व खर्च
आजही माझ्याकडे तयार आहे
CHECK घ्यायचा की CASH घ्यायची
यावर विचार सुरु आहे
अरे हो…
तुझा तर माझ्यावर
कोनताही खर्च नसेल
कारन पर्स नेहमी घरी विसरने
तुझे आजही सुटले नसेल
तुझ्याकडे मी दिलेला
माझा फोटो मला हवा आहे
मुलींना IMPRESS करायला
तोच तर एक दुवा आहे
तुझ्याकडुन मिळालेल्या सर्वच वस्तुंचा
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील
तुला जसे PROPOSE केले होते
तसेच मी तिला पन करील
म्हनुन मला माझे
सर्व तु परत कर —
मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो, माझ्यावरही कुणाचं नियंत्रण असायचं..
नकळत का होईना मी हि हरवून जायचो, कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो.
दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो, हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो.
नाहीच फोन तर मिस कॉल तरी द्यायचो, रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ,
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो....

सगळंच आता भूतकाळात विरून गेलं, माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,
दुरावताना मला खूप खूप खूपच वेदना दिल्या, पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं....
जाता जाता खूप काही शिकवून गेलं, भावनाची कदर, हवी हवीशी ती जवळीक, अश्रूचा मूळ स्वाद आणि मुख्यतः.........'प्रेम...
आपण समजत नाही कधी मोल नात्यांचं आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं आज खरंच समाधान वाटतंय कि मी ही कधी प्रेम केलं होतं...
क मुलगी एका गाडीतून एका मुलाला ओव्हरटेक करते.

मुलगा : (जोरात ओरडून ) ए....... म्हैस.

मुलगी : तू गाढव... मूर्ख... बिनडोक..

एवढं बोलत असतानाच तिची गाडी एका म्हशीला धडकते आणि अपघात होतो.

.

.

.

तात्पर्य : मुलींना त्यांच्या भल्याचं सांगितल तरी कळत नाही...
अंधारी असते रात्र पण
कधीचं अडखळत नाही
दुखः आहे फार मनात पण
कधीचं रडत नाही
ना कधी आपुलकीने
कुणी काही विचारले
ना कधी प्रेमाने
कुणी काही सांगीतले
कुणीचं नव्हते कधी माझे
जगताना माला साथ देई
मावळत्या सुर्यासोबत
दिवस आहे जात
सोबतीला मात्र ही
गर्द काळोखी रात
सारे काही अंधारात हरवून जाते
एक सल मात्र मनात राहते
का कधी कोणी नाव
माझे पुकारत नाही
विचारेल का कधी सहज कुणी
कशासाठी अजुन जागतो आहे
की का अजुन तु झोपला नाही ????
काही अनुभव ...........

कधीचं कोणाच्या भावनांशी खेळू नये
कारण कदाचित तुम्ही हा खेळ जिंकाल
पण त्या व्यक्तीला कायमचे गमवाल....

सहनशक्ती खरचं अशी का असते ?
यासाठी नाही की वाईट लोकं जास्त आवाज करतात म्हणून
यासाठी की काहीही झाले तरी लोकं नेहमी शांतचं असतात...

मी त्या लोकांचा सदैव आभारी असेल ज्यांनी माला
नकार दिला आणि शक्य असूनही कधीचं मदत केली नाही
कारण त्यामुळेचं मी बरेचं काही शिकलो आणि आज
कुणाचीही मदत न घेता एकटाचं काहीही करु शकतो

काहिंचा चेहरा आनंदी असणे याचा अर्थ असा नाही की त्यांना दुखः नाही
याचा अर्थ असाही असू शकतो कि त्यांनी दुखाःशी समझोता केला आहे

जर तुमच्या कडे दिवा आहे तर हर एक तुमच्या मागे येईल
पण अंधारात तर सावली सुध्दा साथ सोडून देते

दुसर्‍यासोबत हरणे एकदम सोपे असते पण त्याला कायमचे जिंकणे एकदम अवघड
कधी एके काळी मनाच्या बेटावर त्यात
निर्माण होणार्‍या सार्‍या भावना राहत होत्या.......
आनंद , दुखः , ज्ञान , समाधान , प्रेम ......सगळेचं...
एकदा काय झाले ... आकाशवाणी झाली की काही दिवसात ते बेट बुडणार...
म्हणून सगळ्यांनी नावा बनवा आणि निघा..... फक्त प्रेमाला सोडून सारे कामाला लागले....
फक्त प्रेम राहीले.... प्रेमाला वाटले आपण शेवट पर्यंत राहू...
जेव्हा बेट बुडायला लागले .... तेव्हा प्रेमाला वाटले की कोणाची मदत घ्यावी....
श्रीमंती समोर आपल्या नवेतचं बसत होती....
प्रेम म्हणाले " श्रीमंती तु मला मदत करशील का मला पण घेवून चल ? "
" शक्य नाही ,माझ्या नावेत आधीचं सोने ,चांदी, जड्जवाहीर
आहेत त्यात तुला अजिबात जागा नाही ......"
तीथेचं जवळ गर्व पण होता त्याच्या रुबाबदार नावेत
प्रेमाने त्याकडे मदतीची याचना केली.....
" प्रेमा मी तुला मदत नाही करु शकत... कारण प्रेमाचा ओलावा
माझ्या नावेचे नुकसान करेल..........!" गर्व उत्तरला
दुखः ही तेथेचं होते प्रेम म्हणाले .....
" दुखाः माला सोबत येवू दे ......."
" मी एकाकीचं चांगला ....... " दुखः म्हणाले........!
आनंदाला विचारायला प्रेमाने हाका मारली पण
आनंद स्वतःत मशगूल होता... त्याला ऐकूही आले नाही......
तेवढ्यात आवाज आला " ये प्रेमा माझ्या सोबत ये "
प्रेमाने पाहीले तर अतिउत्साह होता........
कुठे जाणार हे न विचारताचं प्रेम त्या सोबत निघाले ...
ते एका रखरखीत निर्जन बेटापर्यंत आले आणि
अतिउत्साह अचानक गायब झाला...
त्या बेटापासून काही अंतरावर ज्ञान होते
प्रेमाने त्याल विचारले " माझी मदत कोण करेल ?"
" तुझी मदत फक्त वेळचं करु शकेल " ज्ञान म्हणाले
" वेळ करेल ........ पण वेळ माझी मदत का करेल ?" प्रेमाने विचारले ?
ज्ञान थोडे हसले मग गंभीरतेने बोलले .......
" कारण वेळ हाच असा एक आहे जो प्रेमाचे महत्व आणि मुल्य जाणतो
आणि त्याला जपतो....... कधी आज बनुन वर्तमानात.........,
कधी आठवण करत भूतकाळात.................
तर कधी स्वप्न होवून भविष्यात ..........!!!!!!!!!
एकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.

तिथे एक मुलगी येते....

मुलगी : आता पर्यंत तुम्ही जितकी सिगारेट ओढली आहात तेच जर पैसे जमा केले असते तर समोर उभी असलेली मार्साडीज कार तुमची असती...
... मुलगा : तुम्ही सिगारेट ओढता
मुलगी : नाही
मुलगा : मग ती कार तुमची आहे का ?
मुलगी : नाही , अस का विचारत आहात ?
मुलगा : ती कार माझी आहे ....

तात्पर्य : नको तिथे जास्त शहाणपणा दाखवला कि असा पोपट होतो ...
एक २४ वर्षाचा तरुण
मुलागा आणि त्याचे वडील train ने जात
असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं
कपल बसलेल
असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर
बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे
जात आहेत..” त्याचे बाबा फक्त
हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल
वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण
आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर
बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते
ढग आपल्या सोबत धावत आहेत...”
तेव्हा समोर
बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”त
ुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे
का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा
मुलगा जन्मापासूनच अंध
होता आणि त्याला दोनच दिवसांपासून
दिसायला लागले.”
(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य
कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू
शकते..)
पाऊस आणि छत्री यांचे नक्की नातेँ काय ? हे समजने थोडे कठीण आहे.
माझा मते त्यांचे नातेँ त्या छत्रीमध्ये असलेल्या व्यक्तीवर अंवलबून असते.
जसे,
... जर त्या छत्रीमध्ये एकमेकांवर प्रेम करणारे व्यक्ती असतील तर ते नातेँ प्रेमाचे.
जर त्या छत्रीमध्ये दोन अनोळखी माणसे असतील तर ते नातें विश्वासाचें.
जर त्या छत्रीमध्ये दोन मित्र असतील तर ते नातें मैत्रीचेँ.
जर त्या छत्रीमध्ये आई आणि मुले असतील तर ते नातेँ वासल्याचेँ.


नातेँ कुठलेही असो त्या छत्रीमध्ये असणारी प्रत्येक व्यक्तीचा उद्देश मात्र एक असतो, आणि तो म्हणजे स्वःता भिजणे आणि दुसऱ्याला सूरक्षित ठेवणे.
थोड्यात सांगायचे झाले तर, स्वःता उन्हांचे चटके सहन करणे आणि दुसऱ्यानां सावली देणेँ.
तरी पण काही नातीं अशी असतात त्याना ओळखनेँ खूप कठीन असतेँ.
म्हणून पाऊस आणि छत्री याचेँ नक्की नातें काय हे समजणे थोडे जरा कठीणच आहे ?????
जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
... न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री"......!!!!
कधीतरी रडत असतो, ते कोणाला दिसत नाही ...
कधीतरी काळजीत असतो , ते कोणाला दिसत नाही ...
कधीतरी आनंदी असतो, तेही कोणाला दिसत नाही ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.पण कधीतरी मैत्रिणी बरोबर फिरायला जा ...
साले सगळे ओळखीचे तिथेच मरायला येतील
मुलाच्या खोलीत सापडणाऱ्या काही गोष्टी

“लग्नाच्या आधी”

१)परफ्युम
... २)प्रेम पत्रे
३)भेट वस्तू
४)ग्रीटिंग्स
५) नोकिया ई ७१ किंवा आय फोन

आणि
“लग्नानंतर”
१)वेदना शामक गोळ्या (पेन किलर)
२)लोन पेपर्स
३) न भरलेली भरपूर सारी बिल्स
४)आणि अगदीच साधा आणि काम चलाऊ मोबाईल

“हे शाश्वत सत्य मान्य असेल तर लाईक करा”
काही नाही थोडा पाऊस पडत होता,
थोडासा भिजलो, कपडे भिजले,
हात ओले,
mobile ओला,
काय नवल message boxes पण भिजलेले,,
type करू लागले तर बोटे पण भिजलेली,
मग काय..?
लिहिलेले शब्दपण चिंब भिजलेले,
मग प्रेमात चिंब भिजलेल्या माणसांना,
हि भिजलेली कविता पाठवली,
कविता वाचणारी माणसे सुद्धा स्वप्नात भिजलेली,
तेव्हा लक्षात आले अरे हि तर भिजलेल्या पावसाची कविता भिजलेली..!!
आहेस तू सावरायला म्हणून पडायलाही आवडतं!
आहेस तू हसवायला म्हणून रडायलाही आवडतं!
आहेस तू मनवायला म्हणून रुसायलाही आवडतं!
आहेस तू समजवायला म्हणून चूकायलाही आवडतं!
आहेस तू सोबतीला म्हणून जगायलाही आवडतं!
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

तो माझा निरागसपणा कोठे तरी हरवला आहे,
शाळे मधला तो समीर आता एम्प्लोइ बनला आहे,

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .

काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली.

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी..
जुन्या अल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात,
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ??

कधीतरी मार्च मधे चीनूच्या वाढदिवसाला
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे,
हल्ली मात्र रोज फोटो काढतो..
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???

त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वतःच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ??
पाकीटातल्या ५०० रुपयापेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ??

१०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो,
आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ??
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की, का मनात खोल घर करून जातात..
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ???
ती फ़क्त आईच!!!

"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई

उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते
...ती आई

नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते
ती आई

काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई

पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई

परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई

आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई

आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच!!!.........


‎*तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील
का..?
ती म्हणाली माशाला विचार
पाण्यावाचून राहशील
का...?
हसून
पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...? *
*ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..?
गंमत म्हणून
तिला विचारलंतू
माझ्यावर खरच प्रेम
करतेस का...? ...
ती म्हणाली, पाणावलेल्य
ा डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का ?

Friday, August 12, 2011

तिची आणि माझी na खूप जुनी मैत्री होती....
इतकी ना कि एकमेकांना भेटल्यावर चिंता काढून खरच समोर आहोत का check करायचो... ;)
.
किती मस्त असत ना जीवन...
असेच दिवस जात होते... मी engineeing मध्ये somaiya कॉलेज ला आणि ती दत्ता मेघे ला लागली ...
मग भेटायला असा कधी वेळा मिळाला चा नाही...
.
मग रोज call करून कधी messege करून... बोलायचो..
फार मजा यायची...
कधी तरी भेटलो ना कि इतका मन भरून यायचा ना...
फार म्हणजे फार बर वाटायचा...
.
दिवस जात होते... पाहिलं वर्ष झाला...
मैत्री फुलात होती...
खूप छान दिवस जात होते...
मी कधी मैत्री शिवाय काही पहिले नाही.... आणि आहे त्यात फार खुश होतो...
.
मैत्री मध्ये पहिली priority मलाच द्यावी असा आग्रह... ;)
.
पण असत ना कि जीवन काट्यांचा...
झालंही तसच...
.
बरेच दिवस झाले माझा आणि तिचा बोलन नाही झालं...
तिने मला अचानक मला call केला...
but lecture चालू होता so मी call उचलला नाही...
मग तिचा messege आला "मी commmited आहे..."..
.
डोकं सटकल माहित नाही का???
मग महिना झाला मी call केलाच नाही...
तीचे रोज call होते ...
पण मन कधी झालाच नाही....
.
मग अचानक एका दिवस ठाण्याला class ला जाताना भेटली...
आणि तीने पाहता क्षणी समोर आली आणि जोराची कानाखाली मारली...
आणि म्हणाली हिचा एका गोष्ट आहे जी मी तुझ्या वर हक्काने करू शकते...
.
मूर्ख परत जर मला त्रास दिला न तर बघ...

आणि मग स्वताचा रडायला लागली..
आणि म्हणाली तो messege तर मी असाच पाठवला...
आणि तू खरा मानला...
.
आणि मग मला हि रडयालाचा आला...
जणू मला एका खरच खरा मित्र मिळाला होता.

Saturday, August 6, 2011

तुझशिवाय.........

जीवन हे जगण्यासाठी
जगण हे तुझसाठी
तू फ़क्त मझसाठी

तुझशिवाय जगण जमणार नाही
जीवनातून ही वजाबाकी होणार नाही

तुझशिवाय जगण व्यर्थ आहे
तु मला भेटण यातच जीवनाचे सार्थ आहे

तुझशिवाय जगण्याला अर्थ नाही
मरत जगण मला जमत नाही
असाव कुणीतरी…..
तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….
असाव कुणीतरी…..
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
मी जवळ नसतानामाज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
कुठेतरी.. कुठेतरी.. असेल ती !
जिथे जग आहे माझे, सोबत तिच्या..
जिथे मी, जिथे ती, जिथे भावना माझ्या नि तिच्या ||
जिथे होई सकाळ पापण्यांच्या किरणांनी तिच्या..
जिथे ऐके अंगाई चंद्र, मखमली कुशीत तिच्या ||
जाने न कोठे जग ते आहे, न जाने ती आहे वा नाही |
जिथे श्वास आहे हरवलेला, ओढीने तिच्या |
जिथे हरवलो, आहे गहिवरलो गोड स्वप्नात तिच्या ||
जिथे ती, ती, म्हणता.. डूबले मीपण आसमंतात तिच्या |
जिथे अवघे आयुष्य हासे, " मूर्खा " या शब्दात तिच्या ||
जाने न कोठे जग ते आहे, न जाने ती आहे वा नाही |
धेय्या पासून वाटा शोधत आहे..
धेय्यच हरवले आहे कोठेतरी, वाटांमध्ये !
कुठेतरी.. कुठेतरी.. असेल ती स्वप्नपरी..
माझी प्रेयसी..........

माझी प्रेयसी गोरी आहे
जणू चीकन तंदुरी आहे ,
तिच्यावीषयी काही बोलण्याची
मला मात्र चोरी आहे .

माझी प्रेयसी गोड आहे
हापूस आंब्याची फोड आहे
नवर्याला मुठीत ठेवीन अशी
तीला भारी खोड आहे .

माझी प्रेयसी सोज्वळ आहे
डोळ्यात तिच्या काजळ आहे
माझ्या वीषयी तिच्या
मनात तळमळ आहे

माझी प्रेयसी भित्री आहे
वटवट सावित्री आहे .
तीचे माझे पटणार नाही
ह्याची मला खात्री आहे .

माझी प्रेयसी मस्त आहे
स्वभाव तिचा थोडस सुस्त आहे .
तिच्यापेक्षा मी बावळट आहे
म्हणून ती निर्धास्त आहे .

माझी प्रेयसी हट्टी आहे
स्वभाव तीचा थोडासा कपटी आहे
एका शुल्लक कारणावरून
कालपासून आमची कट्टी आहे .
जरा चुकीचे... तरी बरोबर......
जरा चुकीचे, तरी बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
भीडले नाहीत डोळे तोवर, बोलू काही......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
हवे-हवे ते हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; पोरींवर बोलू काही......

"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
आज "हिचे" रे "तिचे"ते नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही....
Color Of Love - तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा ?

प्रत्येक माणूस प्रेम करतो. प्रत्येकाची प्रेम करायची स्टाईल वेगळी असते आणि प्रत्येकाच्या प्रेमाचा रंगही वेगळा असतो.


तांबडा !
"मै तुम्हारेलिये जान दे भी सकता हू और ले भी सकता हू" हे या तांबड्या प्रेमींचं ब्रीदवाक्य.
एकदा प्रेमात पडले तर त्यांना दुसरं काही दिसत नाही. यांचा माथा नेहमीच गरम असतो. यांना आवडणार्‍या व्यक्तीकडे दुसर्‍या कोणी फक्त बघितलं तरी यांच लाल-लाल रक्त ऊकळू लागतं. दुसरं कोणी आपल्या वाटेत येऊ नये यासाठी ते काहीही करू शकतात..

तांबड्या मुलींना सगळ्याच मुली स्पर्धक वाटतात. त्यामुळे इतर मुलींनी वाढवलेले केस हे आपल्याला ऊपटण्यासाठीच आहेत अशी त्यांची समजुत असते. लग्नानंतर तांबड्या बायकांना आपला नवरा म्हणजे एक ढोल वाटतो. त्याने जराजरी आजूबाजूला बघितले तरी त्या आपल्या ढोलाची चामडी तापवून, लाटण्याने बडव बडव बडवतात.

दोन तांबडे कधीही एकत्र राहू शकत नाहीत. चुकूनही जर अशी कल्पना कोणाच्या डोक्यात आली तर "जानी दुश्मन" सारखे चित्रपट जन्माला येतात !
******************************​******************************​******************************​******


नारिंगी !
ते रोज जीमला जातात आणि मुलीला इम्प्रेस करण्यासाठी यांच्या गळ्यात वाघाचं नख असलेली जाडी चेन, मनगटाला एक सोन्याचा साखळदंड आणि हातात २०-२५ हजाराचा मोबाईल सर्रास दिसतो. तांबड्यांसारखे भडक नसले तरी या भगव्यांचा मूड नेहमी बदलत असतो. कधी ज्वालामुखीसारखे तप्त तर कधी संत्र्यासारखे थंड असतात. असे बरेच भगवे शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. अंगाने मजबूत असले तरी मनाने हे तेव्हढेच हळवे असतात. मुलगी पटावी यासाठी ते मारुतीला सांगड घालतात! आपलं नशीब आजमावायचं असेल तर कुठल्यातरी बाबाला त्यांच्यासमोर भोंदू म्हणून पहा. पुढची जबाबदारी मात्र माझी नसेल.

एखाद्या प्रेमी त्रिकोण असलेल्या हिंदी पिक्चरला जाताना जी एक तास फक्त मेकअप करेल आणि सिनेमा चालू असताना तोच मेकअप हुंदके देऊन रडून पुसून टाकेल ती १०१ टक्के नारिंगी नार होय. अशा या शेंदरी मुली डोक्याने दगड असतात. सहाजिकच त्या सुंदर असतात. त्यांचा प्रेम करणे हाच उद्योग असतो. काही वाक्य टाकायची असतील तर त्या हिंदीत बोलतात. "तुमपे मैने जितना प्यार किया उतना और कोई नही कर सकता" वगैरे वगैरे. या भगव्या मुली दिवसातुन चार-पाचदा तरी "दिलके तुकडे" वगैरे करत असतील.

दोन भगवेही एकत्र संसार करू शकत नाहीत.
******************************​******************************​******************************​******


पिवळा!
मुळातच मुळमुळीत असलेल्या पिवळया प्रेमींच सगळं काही गुपचूप असतं. हे पिवळे प्रेमी एकमेकाला भेटायच्या अशा काही जागा शोधून काढतात की बास रे बास.

पिवळ्यांना थापा मारायची भलतीच सवय असते. म्हणजे त्यामागे त्यांचा काही वाईट हेतू नसतो, पण कोणाला आपलंस करून घ्यायला त्यांच्याकडे फारसे उपाय नसतात. "मी तुला सोन्याने मढवेन", "मी फक्त तुझाच आहे" अशी वाक्य या पिवळ्यांना कोणी शिकवीत नाही.

दोन पिवळे सुखाने एकत्र नांदू शकतात कारण दोन्ही जणं दुसर्‍याच्या भल्यासाठीच थापा मारत असतात. एखादी थाप पचली नाही तरी फारसा फरक पडत नाही, दुसरी थाप तयारच असते !..
******************************​******************************​******************************​****************


हिरवा!
बर्‍याच कारणांमुळे बदनाम झालेला हिरवा, प्रेमाच्या बाबतीत मात्र वेगळाच आहे. हिरवे प्रेमी गडद पण शांत असतात. त्यांना भांडण करायला आवडत नाही. आपल्या प्रेमीची चेष्टा करायला त्यांना प्रचंड आवडतं. त्यांना नाटकात काम करायलाही खूप आवडतं. गावातलं उत्सवाचं नाटकं असो, कुठल्या कंपनीचं नाटक असो किंवा खरं खुरं आयुष्य असो.

हिरव्या मुली रुसव्या फुगव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रेमजीवनातली पन्नाशी नुसती रुसण्यात जाते. त्या कशावरूनही रुसू शकतात. "त्याचा" दिवसातून चारदाच फोन येणे, त्याने दुसर्‍या मुलीकडे बघणे, पहिल्या भेटीची तारीख विसरणे, नवर्‍याने आपल्या माहेरच्या कुत्र्याचा वाढदिवस विसरणे, त्याने त्याच्या आईची स्तुती करणे यासारख्या घोर अपराधांना क्षमा नसते. त्यांना समजावता समजावता हाराकिरी पत्करलेल्या अनेक तरुणांना अभ्यास, नोकरी, व्यवसाय यांसारख्या अत्यंत वाईट सवयी लागल्याचे मी खूपदा पाहिले आहे.

दोन हिरवे आपोआपच एकत्र येतात. एकाने चेष्टा करणं आणि दुसर्‍याने रुसून बसणं यातच त्यांच प्रेम बहरतं !
******************************​******************************​******************************​**************


निळा!
निळे प्रेमी बर्फासारखे थंड आणि पाण्यासारखे चंचल असतात. त्यांना आपण कवी आहोत अशी पूर्ण खात्री झालेली असते. त्यामुळे कोणाला इम्प्रेस करायला ते कविता लिहितात आणि त्याला किंवा तिला वाचावयास भाग पाडतात. प्रत्येक कवितेत तु, तुला, तुझसाठी, ओठ, प्राण, फुला, भ्रमर असे नवकवींनी ओरबाडलेले शब्द १००% दिसतात. मग समोरच्यालाही "वा काय छान कविता आहे" असं झक मारत म्हणावं लागतं. बरं आणि हा कवितेचा खडा लागला तर लागला, नाही तर तोच ऊचलून दुसरीकडे मारायचा.
दोन निळे शक्यतो कधी कवी सम्मेलन भरवत नाहीत !
******************************​******************************​******************************​**************



पारवा !
पारवा रंग तुम्ही कधी पाहिला आहे का? पारवे प्रेमीही असेच अदॄश्य असतात. ते एखाद्यावर प्रचंड प्रेम करतात पण ती व्यक्ती समोर आली कि तोंडाला टाळं लागतं.

म्हणजे अशांना शाळेत वर्गातली एखादी मुलगी आवडते. शाळा झाली की तीच मुलगी ज्युनीयर कॉलेजला जाते. हा पण तिथेच दाखला घेतो. मग तिचे मित्र वाढू लागतात. पण "तिने एकदा माझ्याकडे बघून स्माईल दिली" यात त्याचं अख्खं वर्ष जातं. मग बारावी होते आणि ती सिनियर कॉलेज, मेडीकल किंवा इंजिनीरिंगला जाते. आपला हिरो मात्र बारावीतल्या मार्कांमुळे परत बारावी किंवा दुसर्‍या कुठल्याशा "क्ष" कॉलेजात जातो. खूप प्रयत्न करून तो तिचा नंबर मिळवतो, रिप्लाय येत नसूनही रोज मेसेज फॉरवर्ड करतो, पण तिला मात्र रोज कॉल करणारा कोणी भेटलेला असतो. पण याचं मात्र प्रेम काही कमी होत नाही. मित्रांबरोबर त्याला "ती" किती आवडते, फक्त हेच तो बोलतो. त्याचे मित्रही पारवेच असतात ! त्यांनीही कधिही न केलेल्या "अरे, तिला सिनेमाला येतेस का विचार", "तिला कॉफी साठी भेट की" किंवा "अरे डायरेक्ट विचारून टाक... हाय काय नी नाय काय.." अशा काही टिप्स देतात आणि स्वत:चा विरंगुळा करून घेतात. हा मात्र त्या सगळ्या गोष्टींचा सिरिअसली सिरिअस विचार करतो. असेच दिवस सरकत जातात आणि एक दिवस तिच्या साखरपुड्याची खबर कळते. काही दिवसांनी लग्नही होतं. "मै बस उसे खुष देखना चाहता हूं" हा डायलॉग कोणा पारव्यानेच लिहिलाय यात काही शंका नाही. काही दिवसांनी त्याला दुसरी कोणी "आवडवावी" लागते पण तिला मात्र तो कधीच विसरत नाही.

दोन पारवे आपणहून एकत्र येणं म्हणजे दोन लाजाळुच्या फांद्यानी एकमेकाला जोरात टाळी देण्यासारखं झालं. त्यामुळे पारवे एकत्र येण्यासाठी कोणा कॅटॅलिस्टची गरज लागते. पारव्यांचं एकत्र येण हे कोणा माणसामुळे किंवा घटनेमुळेच होऊ शकतं. म्हणूनच "लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात" यावर त्यांचा सोईस्करपणे विश्वास असतो.....
******************************​******************************​******************************​************


जांभळा !
जांभळ्यांचं प्रेम एकदम extreme असतं. प्रेमासाठी किंमती भेट देणे हे त्यांना आपलं कर्तव्यच वाटतं. दुकानात गेल्यावर ते प्रत्येक गोष्टीची पहिल्यांदा किंमत बघतात, मग सगळ्यात महाग वस्तू शोधून ती विकत घेतात आणि आपल्या मित्रांना आपण तिच्यासाठी किती "हज्जार" खर्च केले हे अगदी दिमाखाने सांगतात. त्यांना टापटीप रहायला आवडतं. ते अत्यंत आतल्या गाठीचे असतात. तांबड्यांसारखे धर की मार अशी पद्धत नसते. भगव्यांसारखे ते मजबूतही नसतात त्यामुळे ते diplomatically दुसर्‍याची वाट लावतात. पिवळ्यांसारखं भलत्याच ठिकाणी गुपचुप प्रेम करायला त्यांना आवडत नाही. एकांत हवा असेल तर ते कुठल्यातरी शांत पण भारी रेस्टॉरंटमधे जातात. हिरव्यांसारखी आपल्या प्रेमाची चेष्टा करायलाही त्यांना आवडत नाही आणि गंमत म्हणून कधी केलीच तर ते लगेच "Just Kidding" म्हणून पुढचे रुसवे फुगवे टाळतात. निळ्यांसारखी कविता करायला जमत नसली तरी चांगली कविता त्यांना नक्कीच ओळखता येते. अशी कुठली कविता त्यांना मिळाली तर ती कविता ते तिला किंवा त्याला फॉरवर्ड करतात. बस.. पारव्यांसारखे ते लाजरे नसतात. कोणी आवडलं की त्या व्यक्तीला ते डायरेक्ट विचारुन टाकतात.

दोन जांभळ्याचं एकत्र रहाणंही कठीण असतं. दोन जांभळे बर्‍याचदा प्रथम एकत्र येतात पण दोघेही extremist असल्याने भांडणं होतात. जांभळ्यांचं निळ्यांशी चांगलं पटतं कारण निळे शांत असतात. आठवड्यातून एकदा कविता वाचावी लागते एव्हढाच काय तो प्रोब्लेम....
..............................​..............................​.....



पांढरा |.....
"घरचा वैद्य" सारखी पुस्तकं वाचताना जसं प्रत्येक आजारातलं एकतरी लक्षण आपल्यात आहे असं वाटतं किंवा सगळ्या राशींचं भविष्य वाचताना..."अरे, मला असा अनुभव येतोय" असं वाटतं, तसं जर हे प्रेमाचे रंग वाचताना तुम्हाला वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही पांढरे प्रेमी आहात.

काही पांढरे, प्रेमाचे सगळे रंग वापरुन संसाराचं छान चित्र बनवतात किंवा काहीजण जसे सगळे रंग मिळून पांढरा रंग होतो तसे कोरेच रहातात. प्रेमाची रंगपंचमी खेळूनही जर समोरचा "हो" म्हणत नसेल तर मग असे पांढरे मगाचच्या कवितेत हे शेवटचं कडवं जोडतात....

केले जरी हे सगळे, तुझसाठी तरी मी परका
रंगलो रंगात सार्‍या, तरिही कागद मी पांढरा |.....

आता तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा?
यापैकिच एखादा की सर्वातिल थोडा थोडा मिसळून इन्द्रधनुषी असा ??
सर्वांनी सांगितलं

तुझं मन तिच्यापुढे व्यक्त कर

डोळ्यांनी नव्हे तर

शब्दांनी सारं स्पष्ट कर

सल्ला आवडला माझ्या मनाला

उचलला फोन, तिला कधी भेटायचं विचारायला

नंबर तिचा फिरवला

मनाचा समतोअल बिघडला

खरंच का तु सांगु शकशील

तिच्या मनांत नसलं तर

उगाच चांगली मैत्रीण गमावशील

मनाची ही बाजु मनालाच पटली

एक बेल तिच्या फोनची वाजली

नकाराची घंटा माझ्या मनाची खणखणली

दुसरी बेल वाजण्याचे वेळच येऊ नाही दिली

असंच का तु जगशील

सांगितल्याशिवाय मानातलं तिला

कसं तु समजावशील?

भावना तुझ्या सा-या मनातल्या

सांगणं तुला नकार या पैकी

एकच उत्तर तुझे आहे

मनाचं द्वंद्व माझ्या आत चालू झालं

सकारात्मक - नकारात्मक भांडण सुरु झालं

लढाई फारच लांब रंगली

दोन्ही पक्षांच्या विचारांची हानी मात्र झाली

सरतेशेवटी सकारात्मकतेची बाजु जिंकली

उचलुन फोन करावा हीच

बाजु मनाला पटली

उशीर करणे योग्य नव्हते

फोन करणे जरुरी होते

सवयीप्रमाणे बोटे बटणांवर फिरली

लगेचच बेल होनची खणखणली

हॅलो म्हणुन समोरुन कुणीतरी बोलमं

आवाज ओळखीचा, म्हणुन हाय म्हटलं

कुशल मंगल सारं विचारलं

विषय कसा काढु हेच नाही कळलं

दोन्हीकडे मग शांतता पसरली

संधी चांगली होती झटकन स्विकारली

काहीतरी सांगणार आहे मी तुला

सांग लवकर काहीतरी ऐकायचय मला

तु सुंदर आहेस , आवडतेस मला

का ऐवढा वेळ लागला सांगायला तुला

तोंडावर पाण्याची धार कोसळली

गाढ झोपेतुन जाग मला आली

गुलाबी पहाटेची साखरस्वप्ने खरी ठरतात

हेच मला ती रात्र सांगुन गेली...
ओ.....ओ....ओ.... हर हर महादेव
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी.......
ओ....ओ....ओ.....
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी
झटकून टाक ती राख नव्याने जाग,
पेटू दे आग मराठी आता...
डोळ्यात फुटे अंगार भगव रक्तात,
जागू दे आज भवानी माता....
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी......
हर हर महादेव ||धृ||

प्रतीप्श्चंद्र लेखेव वर्धीष्णूर विश्वावान्दिता,
साहस्नोः शिवासैश्या मुद्रभाद्राय राज्यते,
हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश,
दाही दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष.........
जय भवानी......जय शिवाजी.........
लढण्या संग्राम आज हा,
बळ दे ह्या मनगटी आम्हा,
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी........... ||१||

असतोमां सदगमय: तमसोमां ज्योतिर्गमय:.......
मृत्योमा अमृत: गमय:,
उठा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा
मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त....
0.. स्स्स तलवार नाचते रणी
ऐसा पेटतो राग,जगा मारा जीव हा फुले
महाराष्ट्राची बाग,...........
जगण्या सिद्धांत आज हा,शक्ती दे शतपटी आम्हा,
चल चल रे ओठ घालती
साद मराठी आता,
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी.........||२||

झटकून टाक ती राख नव्याने जाग,
पेटू दे आग मराठी आता.....
डोळ्यात फुटे अंगार भगव रक्तात,
जागू दे आज भवानी माता....
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी........
हर हर महादेव
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी......
सरदार, राजपूत, ठाकूर ह्याप्रमाणे घाटी हा शब्दसुद्धा
अदबीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना
जय भवानी......जय शिवाजी.........
हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी......||३||
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.

त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...

हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ' तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..'

या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन,प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती.

.एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ' तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..

अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."

तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....

ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग' झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..
..
.

तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं...
लहानपणापासुन त्याचं जगणं जरा जगावेगळंच होतं.
त्याला त्याचं असं एक आकाश हवं होतं की जिथं कोणाचेही कसलेही नियम नसतील.
कुठल्याही अटी नसतील.
कुठलही क्षितिज नसेल.
जिथं फक्त त्याची स्वप्न असतील....

स्वप्न ? .........काय असतात स्वप्न ?
जे आपल्याला घडावंसं वाटतं त्याला स्वप्न म्हणायचं का जे घडणार नाहीये त्याला ?

काहीही असो...
स्वप्न बघायला आणि ती पुर्ण होणार असतील तर करायला ताकद लागते.
त्याच्यात होती ही ताकद आणि त्याला आभिमान पण होता त्याचा.
एक दिवस ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याला उमजलं की,
खरी ताकद पुर्ण करायला लागत नाही, ती लागते ते दुस-याची स्वप्न आपली मानुन पुर्ण करायला आणि त्या स्वप्नाळू जीवाला नविन स्वप्न द्यायला.

त्याच्या स्वप्नासाठी तीनी तिचं घरटं सोडलं आणि ती त्याच्या घरट्यात आली.
स्वप्न न बघणं एक वेळ सोप्प असतं पण सोडुन देणं खुप अवघड....
आपलं घरटं मागं सोडताना ती खुप काही सोडुन आली होती.....
खुप आठवणी... खुप क्षण...

तिच्या घरट्यात तिनी पहिल्यांदा डोळे उघडल्यानंतर, आईचे भरलेले डोळे बघुन
आईच्या कुशीत शिरल्याचा क्षण...
विजेच्या कडकडाटाला घाबरुन बाबांच्या कुशीत शिरल्याचा क्षण...
तिच्या इवल्याशा चोचीत आईनी भरवलेलातो मायेचा क्षण...
तिला उडता यावं म्हणुन तिच्या आईबाबांनी केलेल्या धडपडीचा क्षण....
तिनी पहिल्यांदा उडुन सगळं आकाश हिंडुन जग जिंकल्याचा क्षण...

त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं,
पण ’आपण इतक्या सहज आपलं जग सोडु शकतो का ?’ हा प्रश्न त्याच्यामनात आला आणि...
त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले. त्याचे डोळे शांत होते... शांत कसले सुन्न होते.
तिच्या उपकराच्या ओझ्याखाली दबलेला तो सुन्न डोळ्यातुन इतकंच म्हणाला की...
"तु हे सगळं कसं करु शकली ?"

ती म्हणाली,
" तुला नाही कळणार.... त्यासाठी बाई असावं लागतं ! "


मध्ये काही क्षण गेले...
ती होती म्हणुन कुठेही सुखात जगत होते. पण एकमेकांसोबत कुठेही जगणारे ते पिलासाठी मात्र असं कुठेही जगायला तयार नव्हते.
त्यांना पिलासाठी एक छानसं आणि मोठ्ठं घर द्यायचं होतं.
त्यामुळे जगाची यत्किंचीतही फिकीर न करणा-या त्या दोघांसाठी प्रत्येक काडीला किंमत होती.
पिलाला द्यायचं घरटं आता थोडंसं राहीलय, ह्या वेडानी भारावलेले ते शेवटच्या चार काड्या आणायला बाहेर पडले ते, पावसाळी हवा पडलीये हे माहित असुनही...
ती पिलाला छातीशी धरुन...
आणि तो, दोघांचं असणं हृदयाशी धरुन घरट्यासाठी घरट्याबाहेर पडला ते स्वप्नांचे पंख लाऊनच.
ह्या स्वप्नांचं थोडं विचित्रच असतं. जगावेगळं जग असतं ते...
त्याचे सुर वेगळे असतात.
गंध वेगळे असतात. त्यांचे ॠतु वेगळे असतात.

निसर्गाचे नियम त्याला ठाऊकच नसतात कदाचीत.
पण निसर्गाला तरी स्वप्नांचा हळवेपणा कुठे ठाऊक असतो ?
नाहीतर पिलासाठी जीव ओतुन गुंफलेल्या त्या घरट्यावर अशी वीज का कडाडली असती ?
ती वीज कडाडलीही इतक्या अमानुषपणे की हजारो पावसाळे पाहिलेला तो वटवृक्षही त्याच्याच आधारानी उभ्या असलेल्या वेलीला घाबरुन बिलगला.

पाउस पडायच्या आधिच त्याच्या भांबावलेल्या डोळ्यात त्यांच्या घराचं स्वप्न बुडत होतं.

त्याला माहितीच नव्हतं की स्वप्न ही एखाद्या नाजुक फुलांवर पडलेल्या दवबिंदुंसारखी असतात.
ती फक्त पहायची असतात.
त्यांना स्पर्श करायला गेलं की ती मातीत मिसळुन जातात.... .......फुलांसकट !

मातीचा गंध जीवाला वेडाउन टाकतो, ते उगाच नाही...
कारण तो कोणाच्या तरी स्वप्नांचा गंध असतो.

त्या ओल्या वातावरणातही त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले. तो पुन्हा एकदा सुन्न झाला होता.
पिलाला छातीशी धरुन ती पुन्हा घरट्यापाशी पोहचली होती. तिनी एक क्षण.. एकच क्षण त्या घरट्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी घरटं सोडुन ती त्याच्याकडे झेपावली.
त्याचे थरथरते हात तिनी ओंजळीत धरुन त्याला शांत केलं आणि त्याला जवळ घेऊन ती घरट्यात परतली सुद्धा...

निसर्गाला स्वप्नांचा हळवेपणा ठाऊक नसतो तसं त्याचं सामर्थ्य पण माहित नसतं. फुलावरचं ते दवबिंदु साधंहललं सुद्धा नव्हतं.
तिचं पिल्लु सुरक्षित होतं. तो सुरक्षित होता. त्याचं घरटं सुरक्षित होतं.
पाचसाचं थैमान तिनं तिच्या पंखांवर थोपवुन धरलं होतं. ते तिघंही एकाच विश्वासानं तिच्याकडे पहात होते.
"तु हे सगळं कसं करु शकतेस ?" ह्या त्याच्या अपेक्षित प्रश्नाला तिनं नेहेमिचंच उत्तर दिलं.
"तुला नाही कळणार.... त्यासाठी बाई असावं लागतं !"



स्वप्न डोळ्यात असतात तोपर्यंतच ठीक असतं. ती एकदा श्वासात मिसळली की त्यांच्याशिवाय जगणंच कठीण होतं. आपण आपल्या पिलाला त्याचं स्वतःचं असं एक आकाश द्यायचं असं त्या दोघांनी ठरवलं आणि त्या दवबिंदुच्या ओझ्यानी फुलंच वाकलं.
पिलासाठीच पिलाला सोडुन त्यांना रोज लांब उडावं लागणार होतं.... ते ही पिलाला रोज दुस-याच्याच घरात सोडुन.... स्वप्न तुम्हाला मरु देत नाहीत, पण ती तुम्हाला जगुही देत नाहीत.
तिला तिच्या स्वप्नातलं आकाश खुणावत राहीलं आणि नऊ महिने आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण पिलाला जवळ ठेवणारी ती निग्रही झाली.
त्यांनी पिलाला त्या घरट्यात सोडलं आणि जड पंखांनी ते निघाले.
तो खुप अस्वस्थ झाला होता. त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले होते. तो अजुन एकदा सुन्न झाला होता.
अशा वेळेला त्याला नेहेमीचाच एक आधार होता.... तिचा !

मोठ्या विश्वासानी त्यानी तिच्याकडे पाहिलं...पण...
पण ती स्वतःच कोसळली होती....... ........खचली होती. त्याच्यासाठी स्वतःचं घरटं सोडताना असलेली तिच्या पायातली ताकद संपली होती.
त्या निसर्गाला थोपवुन धरणारे तिचे पंख गळुन पडले होते.
ती रडत होती. खुप रडत होती.
तिची ही अवस्था बघुन तो उठला आणि पिलाला आणण्यासाठी निघाला.
ती म्हणाली, "थांब राजा, थोडंसं थांब. ते समोरचं आकाश खेचुन आणु आणि मग पिलाकडे येऊ. ते वाट बघत असेल आपली आणि त्याच्या आकाशाची. माझ्यावर विश्वास ठेव. आपल्याला जमेल ते."

त्याला कळेना... काहीच कळेना...
ना तिचं रडणं... ना खचणं... ना उठणं आणि ना उडणं.... तो म्हणाला,
" मला नाही कळणार... खरंच नाही कळणार... ह्यासाठी कदाचीत बाई असावं लागेल. "

ती म्हणाली,
खरंय तुझं... तुला नाही कळणार... कारण हे कळायला बाई तर असवं लागेलच पण त्याही पेक्षा आई असावं लागेल."



कुठलाच पुरुष कधी बाई होऊ शकत नाही, .... आई तर नाहीच नाही !
मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो
लाल मिरची हिरवा देट वेळ मिळाली की देवळात भेट

झाडाला फुल नाही तर पाणी घालतिस कशाला

मनात प्रेम नाही तर बघून हसतिस कशाला.

बटन मारल्या शिवाय
लाईट पेटत नाय

डोळा मारल्या शिवाय
पोरगी पटत नाय. ;-)
अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...
कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!
प्रत्येकाला असते आई.
जी सेवा करते आपुली खुप परिश्रम करते आपुल्यासाठी.
तरी स्मित असते तिच्या ओठी.
ती आहे आपुली आई.
सर्वाची माऊली
पित्याहुन आवडते आई.
जी देते जगाला सावली.
गुरुची गणणा होते.
देवापासुन सुरु
त्याच्या आधी असते.
आपली मायगुरु
आपल्यावर अंनत उपकार आहे त्या आईचे.
मरुनही फेडु शकत.
उपकार त्या मायेचे.
"आ" म्हणजे आत्मा.
"ई" म्हणजे ईश्वर.
याचा संगम म्हणजे आई.
भरभरुन आर्शिवाद
आपल्याला देई
कशी करु मी तिची उतराई.
माझी प्रिया
जराशी हासरी
जराशी लाजरी

वर्णाने सावळी
डोळ्यांत काजळी

रूपाने गोजिरी
थोडीशी बावरी

केसांच्या बटांना
जागा चेहऱ्यावरी

हाती कंगणांचा
खणखणाट भारी

थोडीशी लहरी
माझी स्वप्नपरी

हास्य तिचे असे
जणू निर्झरापरी

अशी माझी प्रिया
सर्वांहून न्यारी
बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.
त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.
नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.
त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली.
तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.
पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.
ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.
खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला.
स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.
त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो आमच्याकडे धरतो.
लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा.
पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.
पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही लाज नाही वाटली त्याला.
पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ केलं त्यानं मला.
शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.
गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही म्हणून आमचं कधीच नाही नडलं.
आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.
पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो.
"आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं.
बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.
एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.
पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून मान्य.
वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय.
त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता गवसतोय.
बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.
त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.
नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.
त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली.
तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.
पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.
ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.
खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला.
स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.
त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो आमच्याकडे धरतो.
लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा.
पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.
पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही लाज नाही वाटली त्याला.
पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ केलं त्यानं मला.
शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.
गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही म्हणून आमचं कधीच नाही नडलं.
आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.
पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो.
"आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं.
बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.
एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.
पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून मान्य.
वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय.
त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता गवसतोय.
रे भारता !
रे भारता ! कोण करेल आता तुझी रे रक्षा !
नशिबी तुझ्या यवनांचे राज्य आणि
दुबळ्या भारतीयांची दुबळी नीती
कोण कुठली बाई पण
आज आहे तुझी अन भिशिक्त राणी
आणि लेकुरे तिची आज बोलत आहेत
शब्द त्याग आणि सेवेचे
व्यर्थ वाटते आज बलिदान त्या
नर वीरांचे आणि देश प्रेमींचे
अरे रडत असतील आज स्वर्गात
ज्यांनी केले तुझ्या साठी
बलिदान अपुल्या प्राणांचे
कोठे आहेत आज वंशज त्या
वीर अभिमन्यू आणि अर्जुनाचे
कोठे आहेत आज मावळे त्या
तानाजी आणि shivajiche
आज दिसतात सगळीकडे फक्त
अवलादी देशद्रोही आणि स्वार्थ प्रेमींच्या
आज का खवळून नाही उठत
सेना स्वाभिमानी मनगटाच्या
आणि का दिसत नाहीत आज
लेकी राणी झाशीच्या
वांझ झाल्या का रे आज
कुशी वीर मातांच्या
कधी होणार रे सूर्योदय
तुला तारणार्या दिवसाचा
आणि कधी रे होणार अंत
या निर्लज्ज आणि नालायक
राज्य सत्तेचा !
मी म्हंटल 'अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसविण्यासाठी,तुझी अश्रू पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा'
तीनेही लाजत म्हंटल 'हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे
मग कसं कोण जाने, ती माझ्या मिठीत विरून गेली,
वीरगळून गेली, अगदी माझ्याही नकळत
आता मी; मी राहिलो नव्हतो, न ती; ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती.
मग न जाने का, नजर माझीच लागली.
मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत
त्या भाबडीने हात तिचा कापला होता
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता
पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची
सोंग केलं होतं ग मी सारं
फक्त तुला जळवण्यासाठी
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी
आज तिच्या सोबत माझही प्रेत जळतंय
जीव सोडला आहे
तरीही काळीज रडतंय
काळीज रडतंय...
धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज
धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज

आदिल्शाचे सरदार शहाजी महाराज

शिवाजीचा नौदल प्रमुख दौलत खान

शिवाजीच विश्वासू नौकर -मदारी मेहतर

अफझलखानाचा वकील -कृष्णाजी भास्कर

शिवाजीचा वकील -काजी हैदर


औरंगजेबाचा सरदार -मिर्झाराजे जयसिंग

शिवाजीचा तोफागोल्याचा सैन्य प्रमुख -इब्राहीम खान

शिवा -न्हावी

किल्याचा प्रमुख महार

हेर -बेहार्जी - रामोशी

समुद्र नौकांचा सरदार
प्रेम हे होतनसत
प्रेम हे करावलागत
आपल अस कुणिचनसत
आपलस कराव लागत
एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायचअसत
नाहिच हाती आलतर
त्याचवादळात
मनसोक्त मरायला शिकायचअसत
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ..
दोन मनाचा फक्त शब्दांचा मेळ,
दोन हृदयाचा फक्त तालमेल,
दोन भावनांचा फक्त फक्त मेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.
दूर असून सुद्धा जवळ असण्याचा मेळ,
फक्त अवाजावारून दुःख ओळखन्याचा मेळ,
ती नाराजी ओळखन्याची खेळ,
ती वेळ साधून प्रेम करण्याचा खेळ,
सारा सारा फक्त भावनांचा खेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.
माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ते म्हणजे
"अपेक्षा."
जन्माला आल्या आल्या त्या तान्हुल्या बाळाकडून आपणा अपेक्षा करायला सुरुवात करतो.
ज्याने पण अ,आ,इ,ई हि बाराखडी बनवली ना त्याने पण मुद्दामच "अ" हे अक्षर पहिल्या क्रमांकावर लिहिलेय.
जेणेकरून लहान मुल जेव्हा शाळेत जाईल आणि बाराखडी शिकेल तेव्हाच त्याला पहिल्यांदाच कळेल कि
"अ" कश्यातला???........."अपेक्षा" मधला.
"आ" कश्यातला??.........."आशा" मधला .
अपक्षांचे ओझे दोघांनाही जगू देत नाही,
"ज्याच्या कडून अपेक्षा केली जाते" त्याला सुद्धा
आणि
"जो" अपेक्षा करतो त्याला सुद्धा.

आयुष्यात दोनच गोष्टी असतात.
एक "देणं" आणि दुसरे "घेणं"
पण.....
"देणं" हे बहुतेकदा दुर्लक्षित करायचे हे ठरलेले असते
आणि
"घेणं" हे हक्काचे मानलेले असते.

"देणं" हे नुकत्याच झालेल्या ताज्या जखमेसारखे असतं,नेहमी बोचत राहणारं आणि त्यामुळे सारखे लक्षात राहणारं
आणि "घेणं" हे विस्कटलेल्या केसासारखे असतं,कशी चुकून आरश्यात पाहिलं तरच लक्षात येणारं.
एक साधं उदाहरण घ्या ना,
तुम्ही मित्राला १०० रुपयांची नोट उधार दिली तर ती चांगली लक्षात राहते
आणि तिचा नोट तुम्ही उधार घेतली,कि ती सहसा विसरायला होते.

किती हा शब्द "सुख,दु:ख,आनंद,त्रास,समाधान" यांसाठी नसतोच,
"सुख,दु:ख,आनंद,त्रास,समाधान" या भावनांसाठी एकक नसते,
किती सुखी आहेस?......किती दु:ख होतंय?.....किती समाधानी आहेस?
काय उत्तर देणार या प्रश्नांचे????
परमेश्वराने ना संपणारे आभाळ बनवले ना ते ह्याच कारणासाठी बनवले असेल बहुतेक,जेणे करून तुम्ही या प्रश्नाची उत्तरं देऊ शकाल,
किती सुखी आहेस?......किती दु:ख होतंय?.....किती समाधानी आहेस?
असा प्रश्न कुणी विचारले ना कि,त्या आभाळाकडे बोटं दाखवायचे आणि उत्तर द्यायचे.
"त्या" आभाळा एवढा सुखी आहे.
"त्या" आभाळा एवढं दु:ख आहे.

आपल्याला कुणी विचारले ना कि,"काय हवंय तुला?".कि आपण मनाला विचारतो,
आणि मग मन एक यादी जमा करून देते,
पुन्हा समोरच्या व्यक्तीने विचारले,"इतकच हवय ना?अजून काही नको ना?"
मग पुन्हा आपण मनाला विचारतो,
आणि मग मन पुन्हा अजून एक छोटीशी यादी आणून देतं.
खरेतर
प्रश्न पण छोटा असतो आणि त्याचे उत्तर पण छोटे आणि सोप्पे असते.

प्रश्न असतो,"ये मना,तुला काय हवंय?"
आणि
उत्तर असते,
"सगळं".
नात मैत्रीचं ...
ना रक्ताच ना वचनात अडकलेलं
ना ठरवलेलं ना ठरवून केलेलं
नात मैत्रीचं ... ...

मन मोकळ्या मनाचं ..
विचार स्वातंत्राच ..
हव ते बोलण्याचं .
नात मैत्रीचं ... ...

कधीच न तुटणार ..
तुटल तरी जुडणार ..
जीवनाचं अर्थ सांगणार ...
नात मैत्रीचं ... ...

आजन्म सोबतीच ..
एका हाकेच ..
सुख दुक्खाच ...
आपल्या हक्काचं...
नात मैत्रीचं ... ...

प्रतिक आरशाच ..
जुळ्या भावांच ...
एकाला ठेच ...
दुसऱ्याला लागायचं ...
नात मैत्रीचं ... ...

जगायला शिकवणार ...
पाठीशी उभ राहणार ...
सर्व चुका माफ करणार...
दिलदार म्हणवणार ...
नात मैत्रीचं ... ...
आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत:
आयुष्यभर हरत राहिला तो - बाप
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं
मानत आली ती - आई
आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न ...........



वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं..

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं

म्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो

चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला

नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण

दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण

मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं

विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?

Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी

प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली

हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली

प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते

कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,

ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते
ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, सार मनात गेले शब्द राहून.....

इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या कविकुमारची........
आठवणीच्या वादळामध्ये गुरफटलो असताना
डोळ्यातून अश्रू वाहत असतना.
अन तिचा फोन आला....................

उचलून कानाजवळ आवाज ऐकताना
बंद होवून जातो hello बोलताना.
अन तिचा फोन आला ..................

दुखवलेल्या मनाला कसेतरी सावरताना
अश्रू पुसत मग फोन लावताना.
अन तिचा फोन आला....................

चमकून जाते विज शब्द तिचे ऐकताना
कसं जगावे जिवन आयुष्यात ती नसताना.
अन तिचा फोन आला...........................​.......

स्वताच्या लग्नाची बातमी सांगत होती
रडू नका एवढे सांगायला विसरली नव्हती.
अन तिचा फोन आला....................

प्रत्येक वर्षी त्यादिवशी वाटते फोन बंद करावा
भिती वाटते येणारा फोन तिचा तर नसावा.
अन तिचा फोन आला....................
अधुरी एक कहाणी कधी पूर्ण होईल का?

अधुरी एक कहाणी कधी पूर्ण होईल का?
एकमुलगी होती साधी सरळ
थोडीसी खट्याळ ....नेहमी स्वप्नानाच्या दुनियेतरंगलेली....आणि एक
मुलगा होता स्वाभिमानी हुशार
नेहमी स्वतःमध्येगुंतलेला ....अशीच
...दोघांची एकदा ओळख
झाली .....आणि त्यांची छान

मैत्रीझाली....त्यातूनच त्याचं फोन
call आणि sms चालू
झाले....ती मुलगी रोज त्यामुलाला फोन
आणि sms करायची....जर ती त्याला एक
दिवस जरी फोन किंवा smsनाही केला तर
तो तिच्यावर
रागवायचा .तिला विचारायचा " का ग काल

तू फोन नाहीकेला मी वाट पाहत
होतो तुझ्या फोनची ".ती त्याला त्याला म्हणायची कि "नाही sorry
काल नाही जमल फोन
करायला ".तिच्या ह्या उत्तरावर
तो समाधानीनसायचा... त्यातूनच
तो तिला साधपण दाखवायचा...रोज त्यांचे

फोन आणि smsचालू
राहिले ...त्या मुलीला त्याच्याशिवाय
करमत नसे...तिने किती हि ठरवलंकि आपण
त्याला जास्त sms
नाही करायचं...तरी हि त्याला sms
केल्याशिवायतिला करमत
नसे ..ती त्याला sms करायची...... त्याचं
बोलन वाढू

लागलहोत ....ती एकटी असली कि त्याचाच
विचारात गुंतायची...किती हि ठरवलं
कि नाहीत्याचा विचार करायचा तर हि ....
ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत
जातहोती....कारण ती त्याच्या प्रेमात
पडली आहे हे तीच तिलाच
कळलनाही ............त्याच्या विचारात

असताना त्याचे बोलण आठवून स्वतःशीच
एकटीहसायची ....गाण गुणगुणत बसायची."
पाहिले न मी तुला, तू मला न
पाहिलेना कळे कधी कुठे मन वेडे
गुंतले "आतातिला त्याची सवय
झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस
वाटायचं...

आणि तिलात्याच्यशी बोलल्याशिवाय
राहवत नसे ....त्याच्या आवाजात
ती आनंदीव्हायची....हळू हळू ती त्याच
पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कस
आहे?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत
होते ..तो तिलाविचारायचा..." अग तुला कस

कळल कि माझ मूड खराब आहे
ते ...?.ती त्यालाम्हणायची "
मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू
शकत "..अशाने तीत्याच्यात आणखी गुंतू
लागली...त्याच्याशिवाय तिच्या मनात
कोणी नसे.....तिलात्याच्याबद्दल सगळ

माहित आहे होत.... तो कसा आहे ?
त्याचा स्वभाव कसा आहे? त्याच
दिनक्रमच तिला माहित झाल
होत ..तो कधी जेवतो....
घरी किती वेळअसतो... मित्रान बरोबर
किती वेळ
असतो ...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटतहोत
कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण

तस काही नव्हते.असचएकदा तिने
त्याला फोन केला....दोघांच्या पण
गप्पा छान
रंगल्या होत्या..आता तिला त्याच्या मनातल
जाणून घ्यायचं होत....पण
काही केल्या तिला तेजमत नव्हते...मग
त्यानेच तिला विचारले " तू लग्न

कधी करतेस ?".त्यावर तीचटकन
त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर
नाही अजून वेळ आहे बघू "....मगतीने
त्याला विचारलं " तू कधी करतोस
लग्न"..तो तीला म्हणाला "
मी लग्नकरणार नाही. मी एकटाच

बरा आहे..".ती खूप दुखी होते...
काही क्षण तिलाकाहीच सुचत
नाही ..हा असा का बोलत आहे..पण
स्वतःला सावरून ...
ती परतत्याला विचारते... " तू
असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात
काही घडलआहे का?"..तो अपसेट होऊन

तिला म्हणतो " होय , आणि आता मला कोणीच
नको मीएकटाच बरा आहे खूप सुखी आहे
". त्याच्या आयुष्यात खूप काही घडल
आहे असेतिला वाटू लागल..मग ते दोघे
तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू
लागतात ... आणि ती त्याच

कोमजलेला चेहरा फुलवते..." सांग
कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार
तुला लाजणाऱ्या फुलातला ?"तिचा हा स्वभाव
त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून
जातो. "तू खूप चांगली आहेस... तुझ

चांगलच होईल..."पण ती मनातल्या मनात
म्हणत असे..... माझे चांगले होईल पण
जेव्हा तू माझ्या सोबत असशील"करण
ती त्याला दुखी पाहू शकत
नव्हती ........आता तिला तीच प्रेम
व्यक्त करण जमत नव्हते...अजून हि ते

दोघे तसेच रोज बोलत आहे....रोज फोन
आणि sms चालू आहे....त्याला कळत
नव्हते ती त्याच्यावर जीवापाड प्रेम
करत आहे एका निष्पाप
मनानेतिला अशा आहे कि आज न
उद्या त्याला तीच प्रेम
कळेल ..आणि ती त्याला सगळ सांगेल.....पण

अजून
हि तो मुलगा तिला काही बोलला नाही....
ती वाट पाहत आहे
त्याची .....आणि स्वतःला प्रश्न करत
बसले आहे ..." प्रेमवेडी राधा, साद
घाली मुकुंदालपसी कोठे गोपाळा,
गोविंदा...तिला मिळेल का त्याच
प्रेम..................?

आपल्या भावना ती व्यक्त करू शकेल
का त्याला ....?का अशीच वाट पाहत बसेल
त्याची ....? माझी
ही अधुरी एक कहाणी पूर्ण होईल का? आणि त्या मुलीने काय केल पाहिजे की
त्या मुलाला तिचे प्रेम समजले पाहिजे कृपया आपल्या उत्तराची वाथ बघत आहे
स्वप्नांत माझ्या तू येशील का?
हातात हात तु देशील का?
प्राणप्रिया माझी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

थंडगार वारा कानात हळूच सांगे,
रममाण व्हावे मी प्रिये तुझ्यासंगे ,
हृदयात जागा मला देशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

वाटे पक्षापरी उडून तुझ्याजवळ यावे ,
नि:सुंदर ते रूप तुझे पाहतच रहावे ,
मनाची राणी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

सर्व दु:खे विसरुनी जाऊ ,
सुखी जीवनप्रवास कापत राहू ,
सुखदु:खात साथ तू देशील का?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

हृदय माझे पण प्रत्येक श्वासात तू ,
शरीर माझे पण त्याची आत्माच तू ,
अर्धांगिनी माझी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

जगी सर्वसुखी संसार आपला होईल ,
बंधनरूपी प्रेमाचे प्रतिक गणले जाईल ,
जन्मभर हे बंधन तू निभवशील का?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?
माझ्या आयुष्यात येणारी परी
खरच कशी हो असेल?
माझ्या इवल्याशा साम्राज्याची
खरच का सम्राज्ञी ती शोभेल?

नाकी डोळी रेखीव असेल की
मनानेही तेवढीच सुंदर असेल?
माझ्या इवल्याशा घरट्याला का
आपल मानणारी असेल?

शृंगार करणारी असेल की
कंबरपण कसणारी असेल?
संसाराच्या गाड्याला ती का
अखंड साथ देणारी असेल?

खूप बडबड करणारी असेल का
माझही कधी ऐकून घेणारी असेल?
मी लपविलेल्या अश्रूना का
पदरात पाडून घेणारी असेल?

असे खुळे प्रश्न सध्या
काळ्या आकृतींना विचारतोय
मित्रसुद्धा चेष्टेने विचारतात
"मधेच कोणाशी बोलतोय?"

काय सांगू त्याना मी
तुझीच वाट पाहतोय
जिला कधीच पहिले नाही
तिच्यावर जीवपाड प्रेम करतोय
कधी काळी सदैव माझ्यासोबत राहणारी,
तर कधी माझ्या नजरेला नजर देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी,
तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी माझा तोल जाताच मला सावरणारी,
तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मला आनंदी पाहूऩ समाधानी होणारी,
तर कधी मला दु:खी पाहून अश्रु ढाळणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी हा जन्म तुझ्यासाठीच घेतला असे म्हणनारी,
तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून अबोला धरणारी,
तर कधी मी दारू प्यालो म्हणून माझ्याशी भांडणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी त्या व्यसनांपासून दूर रहा असा सल्ला देणारी,
तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर रहा अशी सक्त ताकिद देणारी,
ती आज मात्र 'त्याच' मित्रासोबत निघून गेली....
आयुष्य म्हणजे नेमक काय याचा विचार केला तर जाणवत की, लॉटरीच तीकीटच की..! गावी शेजारी एक अशिक्षित आजोबा राहतात. आजोबा प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला १ रुपयाचं लॉटरीच तिकीट विकत घेतात. बक्षिसाची रक्कम असते १५ लाख रुपये. दर महिन्याच्या १५ तारखेला लॉटरीच्या... टपरी वर जाऊन लॉटरी लागली का ते पाहतात. लॉटरी लागली नाही तरी येताना पुन्हा १ रुपयाचं तिकीट घेऊन येतात. आजपर्यंत १० वर्ष झाली. पण एकदाही आजोबाना ...लॉटरी लागली नाहीये. एकदा न राहवून मी विचारलं "आजोबा...कशाला खर्च करता लॉटरीवर...! इतक्या वर्षात एकदाही लागली नाहीये....!" आजोबा मंद हसले...आणि म्हणाले .."बाळा..लॉटरी लागावी म्हणून मी तिकीट नाही कधी काढत..१ तारखेला लॉटरीच तिकीट काढला की १५ तारखेपर्यंत मी मला १५ लाख मिळाले तर काय काय करेन याची स्वप्न पाहतो. १५ तारखेला लॉटरी लागली नसली की पुन्हा १ रुपयाचं तिकीट काढतो..आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत स्वप्न पाहतो...! असा २ रुपयात माझा प्रत्येक महिना छान जातो...! बाळे ही स्वप्नच मला जगायची उमेद देतात......!" " स्वप्नात मी आज्जी बरोबर सगळे देश फिरून येतो...रोज सकाळी लंडन मधे तर रात्री पॅरीसच्या टॉवर वर आम्ही कॉफी घेतो...जिवंतपणी आजीला कधी मुंबईला पण नेऊ शकलो नाही..पण आता मात्र तिला सगाळीकेडे नेतो...तिला हवा ते घेऊन देतो...कालच मला म्हणाली की जीन्स ची पॅंट आणून द्या...! " "दुसर्याना त्रास न देता मनातल्या मनात स्वप्न बघितली तर काय वाईट ...? " मी म्हणाले..."आजोबा पण स्वप्न मोडली की त्रास नाही का होत...?" आजोबा म्हणाले.."अगो..मग लॉटरी लागेपर्यंत वाट पाहायची आणि वाट पाहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून नवीन स्वप्न बघायची...२ रुपयात..महिना छान घालवायचा..."
तान्ह्या बाळाची डायरी
३ जून. मी आईच्या गर्भात आहे. आईने बाबांना हि गोड बातमी दिली. बाबा खुश झालेत.
८ ऑगस्ट. मला पिटुकले हातपाय, डोके आणि पोट आहे.
१४ सप्टें. माझ ultrascan झाल. किती छान! मी मुलगी आहे.
१५ सप्टें. मी मृत झालेय, माझ्या आईवडिलांनी मला मारलय
का? मी मुलगी होते म्हणून? सर्वांना आई हवी असते, लग्नासाठी बायको हवी असते, प्रेम करायला प्रेयसी हवी असते, मग पोटी, मुलगी का नको असते? समंजस बना, नुसते सुसंकृत नको.

कदाचित आता तुमचे विचार बदले असतील
कॉलेजमधे अनेक सुंदर मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते…..
kavita karane Sopp ki PREM...?
Kavita chukali tar Kagad Fadta yeto,
Pan...
PREM chukkal tar,
Aayushyachya Patravalya Hotat...!
Right mitrano.....
असाव कुणीतरी…..
तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….
असाव कुणीतरी…..
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
मी जवळ नसतानामाज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
एकदा तिला सहज म्हट्ल,
तु सोबत असलिस कि मला जग छोट वाट्त,
लगेच म्हणाली विकत घेउन टाक,
मि सोबत नसले कि ज्यास्त भावात विकुन टाक.

* एकदा तिच्या जवळ बसुन
तिला म्हट्ल,
तुझे डोळे खुप खोल आहेत.
चावट पणे म्हण्ते कसे .
थोडा लांब सरकुन बस पडशील
. ....तिला म्हट्ल
पण मला पोहता येत
म्हन्ते कशी.
प्रयत्न करुन बघ
कित्येकाना असच वाट्त होत.

* तिला एकदा सहज विचारल
तुल भिति नाहि वाट्त
आपल्याला कोणि बघेल याचि.
काय म्हणालि असेल ?
वाट्तेना कोणि बघेल याचि!
आणि कुणिहि बघत नाहि याचि हि.
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार
असलेल्यांनी ......
नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी
आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "मला
तुझ्याशी काही बोलायचं आहे." तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत
होती, सगळे शब्द जुळवून मी तीलासांगितलं, मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे
विचारल,- "का?" तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय आहे, हे तिल जानुनघ्यायच होत; पान माज़् मन दुसर्य स्त्रीवर
आलय हे मि तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो. माझा बँक बलन्स, कार, घर, सगळ मी तिला
देऊ केलं: पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या
दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला. तिला माझ्याकडून
काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनीही
नॉर्मल रहावं अशी तिची इच्छाहोती. तिची कारणे साधी होती. महिन्याभरातआमच्या मुलाची
परिक्षाहोती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे रोज
महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना
व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक
दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम
पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही
फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम
पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला. दुसया दिवसी ती
माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस नीटबघितलेच नाही हे मला
जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा
अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून
किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला
जाणवलं. रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं तीच वजन कमी झालंय.
हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तीच कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच पालन करताना
मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा
मुलगा खूप खुश होता. आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच
संपली होती. जी परत आयुष्यात येत होती. महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी
निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत
नसल्याच
स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही ऐकायाच

नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता. मी वेगाने
CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा गुच्छ होता. मी
बेडरूम मध्ये पोहचलो, तर माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ
घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे
करायला हव ते केल नाही. जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.
आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते. पती-पत्नीच्या नात्यात कार , बंगला ,
प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही. महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि
विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचार--- " आपल वैवाहिक आयुष्य
खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे--
जे प्रेमाच आहे, जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर
पश्चाताप.....
तू जाण्याचे इशारे जेव्हा जाणवती,
नकळत तेव्हा माझे डोळेही पाणावती.

सहन होत नाही विचार, तुझ्याहून दूर राहण्याचा,
छंदच जडलाय जणू मला तुला रोज पाहण्याचा.

तू काढलेल्या चिमट्याची वेदनाच जाणवत नाही,
तू नसशील सोबत ही कळच खरी सोसवत नाही.

शनिवारी जातो जड पावलांनी घरी,
वाटतं कि असूच नये सुट्टी रविवारी.

सुट्टीची सकाळ मित्रांमध्ये, दुपार घरात जाते निघून.
सांज मात्र एकांतात गुपचूप जाते निजून.

अर्ध्या रात्री आठवतात न हसण्यासारखे Jokes ही ,
स्वतःवर झालेले comments जरी हसले सारे लोकही.

हसणं रुसणं बसणं बोलणं सारं काही एकाचसाठी,
Proposes किती नाकारून मन हि झुरतय तुझ्याचसाठी.

हसता हसता रडतो, रडता रडता हसतो मधेच,
प्रेम आहे हे प्रेम, वेड वैगरे नाही उगीच.

सर्व Login ID साठी तुझंच नावं Password आहे,
माझ्या वहीत मीच फिकटसा तुझंच रंग गडद आहे.

तू जाशील सोडून जग माझे, मला हा विचारच पटत नाही.
तुझ्याहून दूर राहण्याची माझ्यात हिम्मतच साठत नाही.
"आयुष्य....."
============================


चांगले वाईट प्रसंग आणि
......कडू गोड आठवण...
आयुष्य म्हणजे अनुभवांची
एक मोठी अनमोल साठवण..

"माझे आयुष्य कष्टाचे"..
असे प्रत्तेकाला वाटे..
दिसत नाहीत जोपर्यंत..
दुसर्याला बोचलेले काटे...

आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर,
असतो एक धोका...
सावध रहा - संधी पहा..
मगच मारा चौका...

आयुष्यावर प्रेम करणे...
हे लक्षात ठेवा महत्वाचे तत्व,
कारण, शेवटी मृत्यू आहे ,
म्हणूनच आयुष्याला आहे महत्व.

आयुष्यावर प्रेम करावे..
असे सांगतात विचारवंत..
काहीतरी जगायचं राहून गेलं....अशी
कदाचित राहिली असावी खंत..

आयुष्य राहिले तर .. पैसा मिळवण्याची
देऊ शकाल हमी...
पण पैशामागे धावून धावून..
नका करू .. आयुष्य कमी..

आयुष्यात कधीही कायम नसते,
सुख-दुःखाची वेळ..
म्हणूनच संकटांना भिवून .. संपवू नका,
आपल्याच आयुष्याचा खेळ..

कठीण आहे सांभाळणे,
प्रत्तेक माणसाचे मन...
म्हणूनच...आयुष्यात जोडलेली माणसं..
हेच खरे धन..

जीवनावर चिंतन करायला....
माणसाला आज वेळच नाही..
म्हणूनच संदीप-सलील सुचवतात...
माहितीये मला की तू आधीच कुनाचा तरी झालयास
म्हणून मी म्हणणार नाही कि तू माझा हो ...
फक्त म्हणणे आता एवढच की जसा होतास तसाच राहा
भासवु नकोस की "तू माझ्या आयुष्यातून गेलायेस"
माझा हट्ट नाही कि तुझे माझ्यावर प्रेम असूच दे
हट्ट आता इतकाच कि मनातील तुझे प्रतिबिंब तसेच राहू दे
माहितीये मला कि डोळे तुझे वाट माझी कधीच पाहणार नाही
पण डोळे माझे वाट तुझी कधीच आयुष्यात चुकवनार नाही ..
माहितीये मला कि माझ्यामुळे हास्य तुझ्या चेहऱ्यावर कधीच खुलणार नाही ...
पण विसरू नकोस कि मी ही आता आयुष्यभर हसणार नाही ...
माहितीये मला कि तुझ्या हृदयावर आता दुसऱ्याच कोणाचा अधिकार आहे
पण माझ्या त्या गोड आठवणीतल्या तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे
अस हृद्य तयार करा की .....
त्याला कधी तडा जाणार नाही .....
अस हृद्य तयार करा की .....
हृदयाला त्रास होणार नाही .....

असा पर्श करा की .....
त्याने जखम होणार नाही ......

अशी मैत्री करा की .....
त्याचा शेवट कधी होणार नाही .........
आयुष्य असच जगायचं असतं........
कुठून सुरु झालं हे माहित नसलं, तरी कुठे थांबायचं हे माहित असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
दुःख आणि अश्रुंना मनात कोंडून ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं, आयुष्य असच जगायचं असतं.
मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी, मागून मागून काय मागितलस् असच म्हणायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं..........................​........
इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...

कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?...

इतकी सुंदर का दिसते ती?..................