Wednesday, July 4, 2012

आज रंगली मेहफिल कवितांची,
त्यात शब्दांनीहि हजेरी लावली..
भावना हि होत्या साथिला,
अन अश्रूंचीहि रांग लागली...
आज रंगली मेहफिल कवितांची,
त्यात आठवणींची हि गर्दी झाली ...
होतो तो फक्त एकटा मी...
अन बाकी सा-याची उणीव भासली..

आज रंगली मेहफिल कवितांची,
त्यात मनानेही एक कविता केली...
त्या कवितेत होती, ती फक्त तू...
अन हृदयानेही त्या कवितेला,
मनापासून दाद दिली...

आज रंगली मेहफिल कवितांची,
माझी मीच ती ऐकली,
शब्द,भावना, अश्रू आणि आठवणी,
ह्यांच्याच साथीने,
आजही रात निघून गेली...
आजही रात निघून गेली...

No comments:

Post a Comment