मैत्री वरील आपले प्रेम
नेहमी असेच फुलत रहावे
तू नेहमी हसत रहाविस
आणि तुला हसवत मी रहावे..
-
कधी तू रुसून बसाविस
कधी मीही रुसून राहीन
रुसूनही सुद्धा मग आपण
एकाच वेळी सॉरी बोलावे..
-
कधी तू खोटं बोलावेस
मी ऐकत राहीन तुला
कधीतरी मीही बोलेन
तेंव्हा माफ़ कर मला..
-
डोळ्यांतुनी तुझ्या कधी
मी अश्रु ढाळू देणार नाही
आले जरी कधी चुकून
मातीमोल होवू देणार नाही..
-
पुढे काळही संपून जाईल
आणि शेवटी वेळही संपेल,
पण तरीही निरंतर राहील,
ती फक्त आपली मैत्री.
नेहमी असेच फुलत रहावे
तू नेहमी हसत रहाविस
आणि तुला हसवत मी रहावे..
-
कधी तू रुसून बसाविस
कधी मीही रुसून राहीन
रुसूनही सुद्धा मग आपण
एकाच वेळी सॉरी बोलावे..
-
कधी तू खोटं बोलावेस
मी ऐकत राहीन तुला
कधीतरी मीही बोलेन
तेंव्हा माफ़ कर मला..
-
डोळ्यांतुनी तुझ्या कधी
मी अश्रु ढाळू देणार नाही
आले जरी कधी चुकून
मातीमोल होवू देणार नाही..
-
पुढे काळही संपून जाईल
आणि शेवटी वेळही संपेल,
पण तरीही निरंतर राहील,
ती फक्त आपली मैत्री.
No comments:
Post a Comment