Monday, July 30, 2012

मैत्रिचा सुगंध……
ज्या जमावात त्याने मित्र शोधून घेतले
खरे म्हणजे जे मिळाले त्यांचा त्याने स्वीकार केला [!]
त्याच्या ओंजळीतील शब्दाच्या फुलांचा वास
त्याना घेऊ दिला !
मग त्यांनी का नाक बंद करून घेतले ?
अचानक !!
ज्यांना त्याने मित्र म्हणून समजले
ते असेकसे उलटे निघाले ….?
त्याला दूर लोटताना
त्यांना कसे हसू आले ?
त्यांनी त्याला का सोडले वार्यावर
नि फक्त घेतला त्याचा उपयोग करून
स्वताच्या जाहिरीतीसाठी …!!
ज्या जमावात त्याने मित्र शोधून घेतले
की त्याला मित्र शोधता नाही आले [?]
तो असा मित्रासाठी तहानलेला ….
खर्या मैत्रीच्या शोधात …
त्याच्या ओंजळीतील फुले फक्त त्यांच्यासाठीच आहेत
वास असलेली …..!
खास मित्रांसाठी …!!
त्याला येतोय मैत्रीचा सुगंध
दूर रानावनातून
नि तो धावतोय रानभर ….
कधीचा …आयुष्यभर …!!
खुळ्यासारखा …….!
मैत्रीच्या सुगंधाच्या वासाचा पाठलाग करीत
कस्तुरीमृगासारखा …..
ह्या माणसाच्या जमावात
त्याला नाही समजत की
मैत्रीचा सुगंध त्याच्याच मनात
नि तो शोधतोय जमावभर
माणसाच्या जंगलात……!!

No comments:

Post a Comment