Wednesday, July 4, 2012

प्रेम कसं असावं
हे नाभाकडून शिकावं, बरसवूनमोत्यांच्या धारा
त्याने धरणीला भिजवावं, नटवून हिरव्या शालुने
त्याने तिला सजवावं, उतरून क्षितिजावर कधीतरी
एक गोड चुंबन घ्यावं, प्रेमअसं असावं
...
प्रेम कसं करावं, हे नदीकडून शिकावं
आस मिलनाची घेऊन उरी, त्याच्यासाठी दरीखोऱ्यातून धावावं
कितीही वळणं आली तरी, अखेर हृदयी सागराच्याच समवाव
प्रेम असं असावं , प्रेम असं असाव...

No comments:

Post a Comment