Wednesday, July 4, 2012


विनवणी ... प्रेयसीची !




शब्दांनी जे तू ना वदले,
नयनांनी ते मज कळले !
गुपित हृदयीचे जे लपविले,
तव चेहऱ्याने मज कळविले !

तू भले कितीहि नाकारले,
तव चालचलानांनी मज दर्शविले !
चोरून मज करिसी इशारे ,
प्रत्युत्तर देता लाजसी का रे ?

कुणी वाखाणता मम रूपा रे,
होऊनी उदास रुसशी का रे ?
संशयाने मग तुझे न बोलणे,
प्रेम नाही तर काय म्हणावे ?

No comments:

Post a Comment