Wednesday, July 4, 2012

मलाही वाटते की प्रेमात पडावे ।
मलाही वाटते की प्रेमात पडावे ।
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि त्याच्यासाठी मीही किँचीतसे झूरावे ।
महिन्यातून एकदा त्याने उगाचच रूसावे,
मी मनवता-मनवता त्याने खुदकन हसावे ।
मलाही वाटते की प्रेमात पडावे ।
मी त्याला रोज रडवावे I
आणि त्याने मला लगेच मिठीत घ्यावे I
राञभर फोनवर त्याने मला सतवावे,
दिवसभर मी त्याला भेटीसाठी पटवावे ।
मलाही वाटते की प्रेमात पडावे ।
कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई म्हणून मी त्याच्यावर रागवावे ।
दोन दिवस अबोला पाळुन एकमेकांना आठवावे ।
मग छोटेसे प्रेमपञ त्याने मला पाठवावे ।
यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे ।।

No comments:

Post a Comment