Monday, July 30, 2012

लेक' माझी लाडाची ....!

आईला पुन्हा पोर झाली
बापाने तिला लई मारली
आई बिचारी हमसून रडली
देवाला शिव्या दिऊ लागली !

पोरगी म्हणजी जीवाला ताप
म्हणत आईला मारतुया बाप
पण मला बाप जवळ घेतु
सोनीचा का गं राग करतू ?

एक दिवशी मी आईला विचारलं
आईंच्या डोळ्यात पाणी तराळल
"लेकीचा जनम वंगाळ असतुया
जन्मभर तिला मरण असतया" !

"पण लेकरा 'बा' ला सांगू नकू
लेक माझी लई मया करतीया
नाय पाजलं तरी गप्प झोपतीया
अंर 'लेक' हाय म्हणून जग हाय
पण तुझ्या 'बा' ला कसं रं पटत नाय" !

माझ्या बी डोळ्यात पाणी आल
माझ्या बहिणीला मी जवळ घेतलं
गोऱ्या गोऱ्या गालाच मुक्क घेतलं
अन जन्मभर दुखः न देण्याचे वचन दिलं !

No comments:

Post a Comment